सर्वच थरातल्या बायका अतिशय उत्साहानं आणि अभिमानानं
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या वैभवलक्ष्मी व्रताचं पालन करत असतात आणि
या महागाईच्या दिवसांत एरव्ही खर्चासाठी हात आखडता घेणारे नवरेसुद्धा
बायकांना हे व्रत करायला प्रोत्साहनच देत असतात. व्रतं करून मिळालंच वैभव,
तर कशाला सोडा? असा हा दांभिकपणा कायमच सुरू असतो..
उद्यापनाला पाच सवाष्ण महिलांना बोलवायचं असतं. सवाष्ण बाई म्हणजे नवरा जिवंत असलेली बाई. बाई कितीही शिकलेली असो, कर्तबगार असो नवरा जिवंत असेल तरच ती धार्मिकदृष्टय़ा श्रेष्ठ ठरते! खरंतर नवरा असण्या-नसण्यावरून बाईचं सामाजिक स्थान ठरवणं ही गोष्ट माणुसकीला लांच्छनास्पद आहे; पण एकदा ‘धर्मपालन’ करायचं (म्हणजे दया, क्षमा, शांती, करुणा बाळगणं नव्हे, तर कर्मकांड करणं) तर यातून सुटका नाही. अगदी देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नीही त्यात समाविष्ट नाहीत तिथे इतर महिलांची बातच सोडा. वटसावित्रीच्या व्रतासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार याबाबतही लागू पडतात. ‘स्वत:च्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी वडाला सूत गुंडाळणे हा निव्वळ वेडगळपणा आहे. वडाचे झाड तुम्ही त्याची पूजा करा अथवा करू नका, जोपर्यंत उभे आहे, तोपर्यंत पांथस्थाला सावलीच देणार आणि ज्यावेळी जीर्णशीर्ण बनेल त्यावेळी पांथस्थावर कोसळूनही पडणार. सावली द्यावी का कोसळून पडावे, हे त्या वडाच्या झाडाला समजत नाही. अशा झाडाची पूजा स्वत:च्या मनोकामनापूर्तीसाठी करणे ही असत्याची पूजा आहे.’ कष्टानं आणि कर्तृत्वानं धनसंपदा जरूर मिळवावी. त्यासाठी व्रतवैकल्यांची संगत नको, असत्याची पूजा नकोच नको.
साभार; http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/52319.html
शिक्षण
घेतल्याने माणूस शहाणा होतो. त्याला स्वत:चं हित-अहित समजतं. भोवताली
घडणा-या घटनांचा सारासार विचार करता येतो. त्यातल्या चांगल्या गोष्टी
स्वीकारण्याचं आणि वाईट गोष्टी सोडून देण्याचं भान येतं. शिक्षणमहतीचे असे
गोडवे गाणारे बुद्धीचे भाट पारंपरिक व्रतवैकल्यांचा मोसम आला की मात्र
बिथरतात, असं साधारणपणे
दिसून येतं. मार्गशीर्ष महिन्याचा मोसम हे याचं उत्तम उदाहरण. या महिन्यात
दर गुरुवारी केल्या जाणा-या वैभवलक्ष्मी व्रताला उधाण येतं. सर्वच थरातल्या
बायका अतिशय उत्साहानं आणि अभिमानानं या व्रताचं पालन करतात आणि या
महागाईच्या दिवसांत एरव्ही खर्चासाठी हात आखडता घेणारे नवरेसुद्धा बायकांना
हे व्रत करायला प्रोत्साहनच देत असतात. व्रतं करून मिळालं वैभव, तर कशाला सोडा? तसा हा दांभिकपणा कायमच सुरू असतो म्हणा. पार्वतीनं तपश्चर्या केली तेव्हा तिला शंकर पती म्हणून लाभला, म्हणून लग्नाआधी गौरीहर पूजतात; पण प्रत्यक्षात कुठली बाई शंकरासारखा मनस्वी आणि भणंग नवरा स्वीकारेल, हा प्रश्नच आहे.
तांब्याच्या
कलशात घातलेल्या पाच प्रकारच्या झाडांच्या फांद्या म्हणजे ही वैभवलक्ष्मी.
यासाठी ज्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात ती फळझाडं असावीत, असा दंडक आहे. ज्या फांद्यांना उद्या फळं धरणार, त्या
तोडण्याचं काम सर्व भाविक मोठय़ा उत्साहानं करतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर
फांद्यांची तोड झाली तर येऊ घातलेल्या फळांचं किती मोठय़ा प्रमाणात नुकसान
होणार. फळांनी डवरलेली झाडं हे वैभव आहे आणि पर्यावरणाची गरजही; पण आपल्याला वैभव मिळावायचं तर झाली थोडी निसर्गाच्या वैभवाची नासाडी, तर बिघडलं कुठं? असा
विचार करून (किंवा हा विचारही मनात न आल्याने) कलशरूपानं प्रतिष्ठापना
केलेल्या देवीच्या समोर पाच प्रकारची फळं ठेवायची. अशा प्रकारे पाच
प्रकारची फळं उपलब्ध करून देण्यासाठी आपले व्यापारी बंधू व्रतकरी
भगिनींच्या मदतीसाठी ठिकठिकाणी तत्परच असतात. पाच फळं एका प्लास्टिकच्या
पिशवीत घालून त्याचं ‘पॅकेज’ तयार ठेवतात आणि
एरव्हीपेक्षा दीडपट किमतीला विकतात. सुटी फळ आणि फुलांच्या किमतींनी तर
मार्गशीर्ष महिन्यात (त्यातल्या त्यात व्रताच्या आदल्या दिवशी, बुधवारी) उच्चांक गाठलेला असतो. वैभव प्राप्त होणार, तर त्यासाठी थोडा-अधिक खर्च नको का करायला? (यात
एक मात्र नक्की होतं की फळा-फुलांच्या व्यापा-यांना व्रत न करताही वैभव
मिळतं!) खर्चात काटकसर करायची तर थोडी काळी पडलेली केळी आणि जराशी किडलेली
बोरंही चालवून घ्यायची. देवीला कुठं कळतो हा बार‘कावा’? ती फक्त फळं बघणार आणि वैभव देणार. आणि जरी तिच्या लक्षात आलं की ही फळं काही तितकीशी चांगली नाहीत, तरी ती ग्राहक मंचाकडे थोडीच तक्रार करणार! फार तर व्यापा-याला शिक्षा करायचा विचार करेल; पण हे व्यापारीही लक्ष्मीपूजन करून तिला खूश करत असतातच! व्रत संपन्न झालं की त्यात वापरलेल्या झाडांच्या फांद्या, फळं, पूजेच्या गोष्टी वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या असतात. कुजलेल्या फळा-फांद्यांनी पाणी प्रदूषित झालं की, मग वैभवलक्ष्मी जणू धन्य होते. वैभवलक्ष्मी व्रताची पोथी बाजारात सहज विकत मिळते. व्रतवैकल्यामुळे वैभव नेमकं कसं प्राप्त होणार, हे त्यात नसलं तरी व्रताची फलश्रुती म्हणजे -यांते खुणावतात. कारण सर्वानाच मिळेल त्या सोप्या ‘शॉर्टकट’नं
झटपट श्रीमंत व्हायचं असतं. व्रत करणा-यांची संख्या वाढावी म्हणून व्रताची
नवीन पोथी दरवर्षी घ्यावीच लागते आणि ते वाण दिलेल्या बाईला पुढच्या वर्षी
व्रताचं पालन करावंच लागतं. (मल्टी लेव्हल मार्केटिंग!)
व्यापा-यांप्रमाणेच पोथी छापणा-यांनाही ‘व्रताचा प्रसार करण्याचं पुण्यकर्म केल्यामुळे’ वैभवप्राप्ती होते हे मात्र नक्की! व्रताचं
उद्यापन करायचं म्हणजे आणखी धार्मिक कर्मकांड आलं. उद्यापनाला पाच सवाष्ण महिलांना बोलवायचं असतं. सवाष्ण बाई म्हणजे नवरा जिवंत असलेली बाई. बाई कितीही शिकलेली असो, कर्तबगार असो नवरा जिवंत असेल तरच ती धार्मिकदृष्टय़ा श्रेष्ठ ठरते! खरंतर नवरा असण्या-नसण्यावरून बाईचं सामाजिक स्थान ठरवणं ही गोष्ट माणुसकीला लांच्छनास्पद आहे; पण एकदा ‘धर्मपालन’ करायचं (म्हणजे दया, क्षमा, शांती, करुणा बाळगणं नव्हे, तर कर्मकांड करणं) तर यातून सुटका नाही. अगदी देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नीही त्यात समाविष्ट नाहीत तिथे इतर महिलांची बातच सोडा. वटसावित्रीच्या व्रतासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार याबाबतही लागू पडतात. ‘स्वत:च्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी वडाला सूत गुंडाळणे हा निव्वळ वेडगळपणा आहे. वडाचे झाड तुम्ही त्याची पूजा करा अथवा करू नका, जोपर्यंत उभे आहे, तोपर्यंत पांथस्थाला सावलीच देणार आणि ज्यावेळी जीर्णशीर्ण बनेल त्यावेळी पांथस्थावर कोसळूनही पडणार. सावली द्यावी का कोसळून पडावे, हे त्या वडाच्या झाडाला समजत नाही. अशा झाडाची पूजा स्वत:च्या मनोकामनापूर्तीसाठी करणे ही असत्याची पूजा आहे.’ कष्टानं आणि कर्तृत्वानं धनसंपदा जरूर मिळवावी. त्यासाठी व्रतवैकल्यांची संगत नको, असत्याची पूजा नकोच नको.
साभार; http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/52319.html
No comments:
Post a Comment