जटिल प्रश्न विधवांचे
भारतामध्ये
येत्या काही वर्षांमध्ये वृद्ध महिलांचे प्रमाण वाढणार असल्याचे जागतिक
आरोग्य संघटनेने अलीकडेच एका सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. या महिलांच्या
संरक्षणासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी
केंद्र सरकारने आतापासून तरतुदी करायला हव्यात, अशी सूचनाही या
सर्वेक्षणामध्ये करण्यात आली आहे. त्याच वेळी तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त
म्हणजे 8.8 टक्के विधवा आणि घटस्फोटित महिलांचे प्रमाण आढळून आले.
महाराष्ट्रातही विधवांचे, एकाकी आयुष्य जगणा-या महिलांचे प्रमाण मोठे असून
पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.