महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत वाढ
(07-09-2012 : 00:01:01) |
नवी दिल्ली। दि. ६ (लोकमत न्यूज नेटवर्क) मागील काही वर्षांत महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक असून, याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. इंटेलिजंन्स ब्युरोतर्फे पोलीस महासंचालक तसेच महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनानंतर शिंदे म्हणाले, महिलांविरोधांतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करायची असल्यास महिला पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सायबर स्पेसचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर, आसाममधील हिंसाचारानंतर सोशल मीडियाचा झालेला बेजबाबदार वापर, नक्षलवाद्यांचे आव्हान याचाही आढावा घेतला. 83,829 महिला पोलिस कोट्यवधी महिलांची सुरक्षा करतात. |
Friday, September 7, 2012
दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने विकले तान्हे बाळ!
दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने विकले तान्हे बाळ! |
दलालांच्या सापळ्यात सापडलेल्या महिलेचे कृत्य
सुहास बिऱ्हाडे ,मुंबई
नवऱ्याने घराबाहेर काढले, पोटात अन्नाचा कण नाही.. तीन लहान मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. छोटा मुलगा तर अवघा दीड महिन्याचा. पोरांना काय खाायला घालू या विवंचनेत असलेली ती आई अगतिक झाली होती.. मदतीच्या आशेने रस्त्यावरच इकडेतिकडे पाहात होती. दोन महिला तिच्यासमोरच उभ्या राहिल्या. कनवाळू नजरेनं त्यांनी तिला न्याहाळलं आणि तिला जणू देव भेटल्याचा भास झाला. त्या महिलांबरोबर ती चालू लागली. त्यांनी आसरा दिला, पण मुलांसह सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर पैसे लागतील, अशी अट त्यांनी घातल्यानं ती भेदरली. आता काय वाढून ठेवलंय, या चिंतेनं पुन्हा सैरभैर झाली. पण आसरा तर हवाच होता. तिची ही अवस्था ओळखून त्या महिलांनीच तिला उपाय सुचविला. दीड महिन्यांचं तान्हुलं बाळ विकायचं आणि हाती पैसे येतील, त्यात पुढचं आयुष्य जगायचं!.. नाइलाजाने ती तयार झाली.. आणि एका स्वयंसेवी संस्थेकडे सौदाही झाला. दीड लाखाचा.. सुहास बिऱ्हाडे ,मुंबई
..आणि, मुले विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला! या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार ‘लोकसत्ता’ला कळविला आणि टोळीची पाळेमुळे खणण्यासाठी जाळे टाकण्यात आले. कांदिवलीच्या चारकोप येथे एका असहाय्य मातेचे बाळ विकण्याच्या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटली! !
अमृता साळवी ऊर्फ अमृता झुबेर मोहम्मद खान (२०) ही महिला कांदिवलीच्या एकता नगर येथे नवऱ्यासोबत राहात होती. पाच वर्षांची सिमरन, दीड वर्षांचा अर्शद आणि अवघे ४५ दिवसांचे तान्हुले बाळ. तिचा नवरा वायरमनचे काम करायचा. आíथक परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यात गेल्या शनिवारी घरात भांडय़ाला भांडं लागलं आणि रागावलेल्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढले. भुकेल्या मुलांना खायला काय देणार या विवंचनेत फिरत असताना रेश्मा खान (३५) आणि ललिता पासवान (२२) या दोन महिला तिला भेटल्या. त्यांनी अमृताला आसरा दिला, पण पैशांसाठी तिसरे बाळ विकण्यासाठी गळ घातली. बाळ विकून थोडे पसे येतील त्यातून दोन मुलांचे संगोपन कर, असा सल्ला त्यांनी दिला. परिस्थितीपुढे हतबल झालेली अमृता तयार झाली..
![]() | ![]() | ![]() |
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कबुली
गेल्या काही वर्षांपीटीआय नवी दिल्ली पोलिसांनी देखील याप्रकरणी गंभीर दखल घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.देशात मुलांवरील गुन्हय़ांच्या तीव्रताही वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शिंदे म्हणाले की, सन २०११ मध्ये देशभरात सुमारे ६० हजार मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे. हा आकडा गंभीर असून पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यादृष्टीने ठोस कारवाई करावी. ते पुढे म्हणाले की, नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरने मुलांचा शोध लावण्यास उपयुक्त ठरेल, असे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाल्याचा दावा करीत लवकरच हे उपकरण देशभरातील सर्वच पोलीस ठाण्यांसह बालसंगोपन केंद्रांनाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, देशभरातील पोलीस दलांमध्ये महिलांची संख्या वाढविण्याबद्दलच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या पोलीसप्रमुखांना केली. साभार; http://www.loksatta.com |
Subscribe to:
Posts (Atom)