नवी दिल्ली। दि. ६ (लोकमत न्यूज नेटवर्क) मागील काही वर्षांत महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक असून, याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. इंटेलिजंन्स ब्युरोतर्फे पोलीस महासंचालक तसेच महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनानंतर शिंदे म्हणाले, महिलांविरोधांतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करायची असल्यास महिला पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सायबर स्पेसचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर, आसाममधील हिंसाचारानंतर सोशल मीडियाचा झालेला बेजबाबदार वापर, नक्षलवाद्यांचे आव्हान याचाही आढावा घेतला. 83,829 महिला पोलिस कोट्यवधी महिलांची सुरक्षा करतात.
60,000
गेल्यावर्षी ६0 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाले असून, मुलांच्या तस्करीला पायबंद घालण्याची गरज व्यक्त करताना हरविलेल्या मुलांचा तातडीने शोध घेण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. महिलांवरील अत्याचारात पश्चिम बंगाल आघाडीवर असून, तेथे गेल्यावर्षी महिला अत्याचाराचे २९,१३३ गुन्हे नोंदवण्यात आले देशातील एकूण बलात्काराच्या केसेसपैकी सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी महाराष्ट्रात ४४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
|
No comments:
Post a Comment