Pages

Friday, September 7, 2012



महिलांवरील अत्याचार वाढले
Bookmark and Share

PrintE-mail
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कबुली
पीटीआय
नवी दिल्ली
गेल्या काही वर्षां

त महिलांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्य़ांच्या कमालीची वाढ झाली असल्याची कबुली देत महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे केले. देशभरातील पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गृहमंत्री बोलत होते. लहान मुलांच्या अनैतिक व्यापाराच्या घटनांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले असून पोलिसांनी या प्रकरणीही दोषींविरोधात कठोर पावले उचलावीत, असे आदेशही गृहमंत्र्यांनी या वेळी दिले. सन २००९ ते २०११ या काळात महिलांवरील गंभीर गुन्ह्य़ांची संख्या लक्षणीय वाढली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
 पोलिसांनी देखील याप्रकरणी गंभीर दखल घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.देशात मुलांवरील गुन्हय़ांच्या तीव्रताही वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शिंदे म्हणाले की, सन २०११ मध्ये देशभरात सुमारे ६० हजार मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे. हा आकडा गंभीर असून पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यादृष्टीने ठोस कारवाई करावी. ते पुढे म्हणाले की, नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरने मुलांचा शोध लावण्यास उपयुक्त ठरेल, असे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाल्याचा दावा करीत लवकरच हे उपकरण देशभरातील सर्वच पोलीस ठाण्यांसह बालसंगोपन केंद्रांनाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.  दरम्यान, देशभरातील पोलीस दलांमध्ये महिलांची संख्या वाढविण्याबद्दलच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या पोलीसप्रमुखांना केली.

साभार; http://www.loksatta.com

No comments: