भारतीय संविधानाने जपलेली मानवी प्रतिष्ठा भारतीय संविधानाच्या अनुच्छद 1 अन्वये संघराज्याचे नाव इंडिया अर्थात भारत असे असूनही पूर्वि व सद्याही हिंदूत्ववादी विचारसरणी सर्वोच्चस्थानी मानणारे संघराज्य ""हिंदूस्थान'' म्हणूनच संबोधतात. दिल्ली/राजच्या क्षेत्रात मंत्री म्हणून शपथ घेतांना भारतीय संविधान जे कायद्य़ाव्दारे स्थापित झाले त्यानुसार शपथ घेतात, परंतु कार्यपध्दतीचा अवलंब करताना त्यांना भारत या सर्वसमावेषक शब्दाचा विसर पडून स्वत:च्या धर्माचा उल्लेख करून हिंदूस्थान म्हणतात. जसे हिंदू धर्मीय इतर धर्मीयांचा उल्लेख उणेपणाने करतात तिच कसोटी इतर भारतीय नागरिकांनी मनाशी बाळगून आपला संघराज्याचा उल्लेख हिंदूस्थान ऐवजी भारत असा करतात तेव्हा यात निश्चित मोठेपणा असून तेथे सुज्ञ भारतीय नागरिक आहेत असे म्हटले तर त्यात अतिशोक्तीनाही असे म्हणने योग्य ठरेल. भारत या शब्दाला फार मोठा इतिहास आहे, कारण पूर्वी समाज हा टोळी टोळीने राहत असे त्यापैकी भारत, तुर्वाष, दृष्य, यदू, पुरू आणि अनु ह्या टोळ्या होत्या असे ऋग्वेदात देखील पहावयास मिळते. सुदासाचा बाप दिवोदास याला भारत लोकांचा माणूस म्हणत असत. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या शब्द प्रयोगातील रचने बाबत ऋग्वेदातील पुराव्याचा आधार घेऊन त्याबाबत सखोल चिंतन करून संघराज्यास ऋषभाच्या 100 पुत्रापैकी वडील असणाऱ्या भरत याच्या नावावरून या अति सुंदर भूमिला भारत भूमी हे नाव मिळाले, हे सिध्द केले कारण थोर राजाच्या दैदिप्यमान कुळात शुद्र सुदास याचा जन्म झालेला होता हे बाबासाहेबांनी शुद्रापूर्वी कोण होते या त्यांच्या ग्रंथात सर्वबाबींचा उहापोह केलेला आहे तेव्हा आपल्या संघराज्याचे नाव कोणत्यामनाने हिंदूस्थान उच्चारण्या ऐवजी भारतीय संविधानाच अनुच्छेद क्रं 1 अन्वये इंडिया अर्थात भारत असे स्वाभिमानाने उच्चारणे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय सत्ता. हिंदू ग्रंथानूसार वर्णव्यवस्था अस्तित्वात असतांना समानता कशाला म्हणतात याची बाराखडी प्रमाणे तोंड ओळख करून घेण्याची आवश्यकता देखील कुणाला वाटली नाही, त्यामुळे ते जे वर्तन करतील तीच पूर्व दिशा ठरायची. गौतम धर्म सुमातील आध्याय 10 सुत्रे 50, 58, 59 आणि आध्याय 12, सुत्रेे 1-7 अन्वये समानता पाहणे जसा काही गुन्हाच ठरायचा. शुद्राने वरिल जातींची सेवाच करावी, त्याच्या मोबदल्यात जे मिळेल त्यावर त्याने गुजरान करावी. वरिष्ठ जातींनी खाऊ न जे अन्न शिल्ल्क राहिले असेल तेच अन्न शुद्रांनी खावे. एखाद्या वेळी जर शुद्राने त्रैवर्णिकातील लोकांची जाणून बुजून हेटाळणी कली किंवा त्यांना मारहान केलीतर शुद्रांचे अवयव छाटून टाकावेत, समानेतेच्या भावनेने शुद्र जर इतरांसोबत संभाषण करेल, किंवा रस्त्याने चाललेतर त्याला ठार मारावे अशा प्रकारच्या अज्ञा धर्मगं्रथात असायाच्या व त्यावेळी हिंदूधर्मग्रंथच प्रमाण असायचे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असमानतेवर आधारलेल्या सर्व धर्मग्रंथाचा धिक्कार करून भारतीय राज्य घटनेच्याअनुच्छेद क्रं . 14 अन्वये समानतेचा हक्क बहाल करून राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. हे समानतेचे तत्त्व सर्वांना लागू केल्यामुळे कायद्यापुढे राजा व रंक दोन्ही सारखेच असाल्याचे सिध्द करून स्वत:चा जन्म दिनांक 14 व त्यातील 14 व्या रत्नाचे महत्त्व भारतीय नागरिकांना पटवून दिले. हिंदूधर्मगंरथानूसार / शास्त्रानूसार वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले असल्यामुळे धर्म, वंश, जात, जन्मस्थान यामुळे उच्च निच्चयता पाळली जात असे त्यामुळे नागरिकांत भेदभाव असायचा सार्वजनिक स्थळे, पाणवठे, उपहारगृहे, सार्वजनिक करमणूकीची स्थाने, स्थाने, रस्ते, स्नानघाट इ. ठिकाणी नागरिकांस समानतेने, स्वातंत्र्याने नैसर्गिक नियमानूसार वावरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास धर्मशास्त्रातील आज्ञेनूसार प्रतिबंध करण्यात आल्यामुळे मानवी प्रतिष्ठा पायदळी तुडविण्यात कर्मठ विचारवादी धन्यता मानीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील धर्मगं्रथाची री ओढणाऱ्या कर्मठांची नाहडी परिक्षा करुन भारतीय संविधानाच्या 15 अनुच्छेदाच्या माध्यमातून धर्म-वंश-जात-जन्मस्थान यास श्रेष्ठ समजणाऱ्यांच्या नाडीत अँटीबायोटीक औषधाचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांच्यातील विषाणूंचही वाढ खुंटवून कायद्यान्वये सार्वजनिक उपहारगृहे, विहिरी, तलाव, इतर पाणवठे, रस्ते, करमणूकीची स्थाने, दुकाने सर्व भारतीय नागरीकांसाठी खुले करून दिलेत. त्यामुळे खुलेआम होणार भेदभाव नष्ट होऊन भारतींय नागरीकांची मानवी प्रतिष्ठा वाढीस लागलेली आहे. भारतीय भूमित अनेक संत, महात्मे, धर्मपारायण करणारे, धर्मग्रंथ निर्माते, धर्मसंस्थापक जन्मास आलेत संपूर्ण आयुष्य धर्म कार्यांत केल्याच्या स्मृती मागे निर्वाण पावले, परंतु त्यांचा उपदेश आत्मा आणि ईश्र्वर भक्तीच्या परिधा बाहेर न आल्याने त्यांची दृष्टी गांवकुसाबाहे राहणाऱ्या बहिष्कृतांवर होणाऱ्या अन्यायावर कधिच पडळीनाही, जर पडलीच असेल तर अपवादात्मक प्रसंगी व अपवादात्मक व्यक्तीच्या रूपाने आजही इतिहासाची पाने चालून पाहिली तर आन्यायााचा आलेख हा उंचावत गेल्याचे पुरावे जिवंतपणाची साक्ष देवून जातात. त्यामुळे बहिष्कार समाज हा नैसर्गीक दृष्टया जिवंत असूनही म्हतावस्थेत जीवन जगत होता. कारण त्यांना अस्पृश्य संबोधल्यामुळे त्यांचा इतर समाजांशी मानविय दृष्टीकोनातून संबंध तुटलेला होता. त्यामुळे तो समाज अस्पृश्यतेच्या साखळदंडाने जोखडून ठेवलेला होता, याच अस्पृश्य समाजात जन्मलेला डॉ. भिमराव रामजी आंबेडकर या महामानवाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रं. 17 अन्वये भारतीय समाजाला अस्पृश्यतेची लागण झालेल्या मनावर कायमची जालीम औषधोपचार करून अस्पृश्यता पाळणे, तिचे समर्थन करणे इ. बाबतीत कायद्यानूसार शिक्षणास अपराधाची तरतूद करूनअस्पृश्यता कायमची नष्ठ केली त्यामुळे तर सद्य परिस्थितीत स्वत:स उच्च् वर्णीय समजणाऱ्याने एखाद्यास जातीवाचक शब्दाने अपमानीत केल्यास ऍट्रासिटी सारख्या कायद्याचा आधार घेवून त्यास निळ्या आभाळाकडे समानतेचे पाहाण्यचा दृष्टीकोन लक्षात आणून दिल्याने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंंबेडकर व भारतीय संविधान यांचे मोठेपण लक्षात आल्यावाचून रहात नाही. "मजहब वहि सिखाता आपसमें बैर रखना' याचा निश्चित असा अर्थ, धर्म एक दुसऱ्यात रामत्व पाहण्यासाठी शिकवित नाही असा होत असल्यामुळे धर्म म्हणजे काय? हे तपासून पाहण्यासाठी त्या धर्माचे तत्त्वज्ञान ज्या धर्मग्रंथात साठविलेले आहे व त्या तत्त्वज्ञानाच पकड सर्वसामान्य जनतेवर असल्याने ती जनता त्या धर्मग्रंथातील आज्ञे प्रमाणे एक दुसऱ्या सोबत जे वर्तन करते त्यावर निश्चितच अवलंबून आहे. धर्मएकमेकांत शमत्व ठेवण्यास शिकवित नाही असे मोघमपणाने जर ग्राहय धरले तर मग मनुस्मृती मधील आज्ञेव्दारे जेथे शुद्रांचे राज्य असेल तेथे राहूनच, आधार्मीक लोकांच्या मेळाव्यात राहू नये. अत्यंत लोकांपासून दूर दूर रहावे. शुद्राला बुध्दी विद्या ज्ञान देवू नये. त्याला उष्टेसुध्दा देवू नये किंवा यज्ञातील अन्न देवू नये, धर्मोपदेश करू नये. जर एखाद्या शुद्राने द्रोहवश जातीच्या नावाने कोेण्या ब्राम्हणाला काही म्हटलेतर अग्निमध्ये लाल केलेली दहाबोटे लांबीची सळई त्याच्या तोंडात घालावी. जर एखाद्या शुद्रगर्वोध्दत होवून ब्राम्हणांना धर्मोपदेश करण्याचा उध्दटपणा करतील तर राजोन त्याच्या तोेंडात व कानात उकळते तेल टाकून घ्यावे. अज्ञा प्रकाराच्य अमाानविध आज्ञा धर्मग्रंथात आचरणाता आणण्यासाठी का? म्हणून दिल्यात याबाबत आजतायागत कुणीही विचार केलेला दिसन नाही परंतु याच्या उलट, धर्मग्रंथातील आोप्रमाणे वागायचे व पोपटपंची प्रमाणे "मजहब नहि सिखात आपसमें बैर रखना' ही ओळ देखील गळाबसे पर्यंत आळवित रहायचे यातून एकच स्पष्ट होते की, शुद्र ही देखील मानसेच असून त्यांच्या सोबत मानवीय वृत्तीतून वागण्याचा धर्मगं्रथातील तत्त्वज्ञाने उपदेश केलेले दृष्टीस पडत नाही. धर्माचा उद्देश सर्व माणसे सुखी व्हावीत असा असून प्रत्येक व्यक्क्तीस धर्माप्रमाणे आचरण करुन सुज्ञ व्हावे असा असूनही धर्मग्रंथातून विशिष्ट समाजाचेे हित जोपासून इतरांवर अन्याय केल्याने ते अज्ञानी, निर्ध, धर्म असूनही धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा नसल्याने युगानुयुगे पाखंडी म्हणूनच जगळीत. याच समाजात निसर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा युगपुरूष जन्माला घातला व नियतीचा खेळ खेळून त्यांच्याच हातून धर्मगं्रथाना प्रमाण न मानता देशाचे सर्वोत्तपरीने हित साधणारे भारतीय संविधान लिहून घेण्यात आले असून त्यातील अनुच्छेद क्रं . 25 प्रमाणे धर्मस्वातंत्र्याचा हक्क बहाल करून त्यान्वये सार्वजनीक सुव्यव्यस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदीच्या अधिनतेने सद्सद्विवेक बुध्दीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्वच व्यक्ती सारखाच हक्कदार असल्याची देण दिलेली असून अनुच्छेद क्रं. 26 अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या अधिनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यंाच्या पैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजना करीता संस्थाही स्थापना करून त्या स्वखर्चाचे चालविण्याचा, धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा हक्क बहाल केला आहे. गतकाळात बऱ्याच चुका झाल्या आहेत कारण त्यावेळी सर्वांसाठी एकच आचारसंहिता असलेला, स्वातंत्र्य, समता, बंधुभावाने ओतप्रोत भरलेला ग्रंथ नव्हता, आज घडीला आपल्याकडे राजापासून तर रंकापर्यंत सर्वांना नैसर्गीक दृष्टीकोनातून समानतेने पाहणारा भारतीय संविधान हा गं्रथ आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की, काळाच्या पडद्याआड गेलेल्या चुका विसरून जाऊन गीतकार शांताराम वाघमारे यांच्या कालच्या घडल्या, घडूनी दडल्या आज नको त्या चुका, रथा समतेचा हाका या गिताच्या ओळी अगदि मनापासून गुणगुणत राहिल्यास निश्तिच भारतीय माणसांची मने प्रसन्न राहून निर्मळ, स्वच्छंद पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे प्रवाहीत राहतील........ -पट्टेबहादुर वसंत
सत्यशोधक मार्क्सवादी चळवळ इतिहासलेखन म्हणजेे केवळ घटनांची वा सनावळयांची जंत्री नव्हे, इतिहास म्हणजे घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी करणे आणि ही मांडणी अधिक वास्तवदर्शी करण्यासाठी विशिष्ट अशा सम्यक अन्वेषणपध्दतीची गरज असते. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील इतिहासलेखनाबाबत लिहितात संबंधित इतिहासविषयावर इतिहासाने किती संदर्भ पुस्तके अभ्यासली आहेत यावर त्याचे पांडित्य व अधिकार ठरविला जातो. ते आवश्यक आहेच पण हे शेवटी कच्चा माल गोळा करणे आहे. त्यावर निष्कर्षात्मक प्रक्रिया इतिहासज्ञाने कोणत्या अन्वेषणपध्दत केली आहे. याकडे अभ्यासकांचेही दुर्लक्ष होते. किंबहुना वापरलेली अन्वेषणपध्दत संबंधित इतिहास विषयांचे सम्यक विवरण करू शकते की नाही ? याकडेच दुर्लक्ष होते. इतिहासज्ञाची अन्वेषण पध्दत जर सम्यक नसेल, तर तो संबंधित इतिहास विषयावर आपली मते लादतो किंवा आपल्या मतांना छेद देणाऱ्या ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करतो. मार्क्सवादाने इतिहासाची मंाडणी ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधाराने केली. खाजगी मालमत्तेच्या उदयापासून जगाचा इतिहास हा शोषक - शासक व शोषित- शासित यांच्यातील वर्गसंघर्षाचा इतिहास आहे हे मार्क्सवादाचे प्रधान प्रतिपादन आहे. पारंपरिक मार्क्सवादी इतिहासतज्ञ शोषण- शासनाची एकमेव भौतिक संस्था वर्ग हीच मानतात. त्यामुळे भारतीय संदर्भातील बुध्दपूर्व वर्ण व बुध्दोत्तर जात या संस्था देखील वर्गाचीच रूपे आहेत व या संस्था शोषणाच्याा भौतिक संस्था नसून त्यांचे स्वरूप केवळ मानसिक आहे असे ते आग्रहाने प्रतिपादन करतात. भारतीय समाजात बुध्दपूव काळात वर्णसंघर्ष व बुध्दोत्तर काळात जातीसंघर्ष झाल्याचे नाकारून केवळ वर्गसंघर्ष झाल्याचे ते प्रतिपादन करतात. म. फुल्यांनी भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी केली. त्यांच्या वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दतीनुसार भारतीय इतिहासातील संघर्ष ब्राह्मणाची उच्चजाती व शुद्रातिशुद्र जातीजमाती यांचा राहिला आहे. शरद पाटील यांनी मार्क्सची वर्गलक्षी अन्वेषण पध्दत व फुले - आंबेडकरांची वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दत या दोघांनाही विधायक नकार देउन बहुप्रवाही अन्वेषणपध्दतीची मांडणी केली. या अन्वेषणपध्दतीच्या आधारे भारतात शोषण- शासनाच्या वर्गेतर संस्थाबाबत त्यांनी मांडणी केली. भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाचे पुढील सुत्र त्यांनी मांडले. वसाहतपूर्व भारतीय समाजात वर्ग नावाची संस्था नव्हती. तर भारतीय सामंत शासक वर्ग लष्करी व पुरोहित जातींचा बनलेला होता तर शासित वर्ग हा शुद्र शेतकरी, कारूनारू जाती व जमाती यांनी बनलेला हेाता. त्यामुळे मध्ययुगीन भारतीय संघर्ष हा या दोन जातीगटांतील जातीसंघर्ष होता हे वास्तव शरद पाटील पुुढे आणतात. ब्राह्मणी इतिहास लेखन प्रवाहाने मध्ययुगीन संघर्ष हा हिदूं- मुस्लिम यांच्यातील धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे असे प्रतिपादन केले. मार्क्सवाद- फुले- आंबेडकरवाद प्रणित बहुप्रवाही अन्वेषण पध्दती मध्ययुगातील राजकीय संघर्षाचे स्वरूप हिंदू व मुस्लिम यांच्यातील धार्मिक व राजकीय संंघर्षाचे नाही हे वास्तव पुढे आणते. मध्ययुगीन भारतीय सामंत राज्यकर्त्यांचा सोपान हा स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण यांपासून बनलेला होता. मध्ययुगातील प्रधान सत्ता ही तुर्कमुगलांची होती. तर या सत्तेचे दुय्यम स्तरावरील भागीदार हे स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण हे होते मध्ययुगीन समाजातील प्रमुख संघर्ष शासक- शेाषक तुर्क - मोगल व ब्राह्मणवादी उच्चजाती एका बाजूला व त्यांच्या विरोधात शासित- शोषित हिंदू- मुस्लिम धर्मीय शेतकरी- कारागीर - शूद्रातिशूद्र जाती असा होता हे माफुआंचे प्रतिपादन आहे. शरद पाटलांनी शिवाजीला एका बाजूला पुरोहित वर्ग वर्चस्वाविरोधात व दुसऱ्या बाजूला वतनदारांविरोधात द्याव्या लागलेल्या संघर्षाची मांडणी केली आहे. सतीशचंद्र यांच्या मीडिव्हल इंडिया: सोसायटी, दि जागीरदारी क्रायसिस ऑफ दि व्हिलेज या ग्रंथाचा हवाला देउन शरद पाटील सांगतात की मोगल साम्राज्याचे अरिष्ट हे जातीव्यवस्थेचे अरिष्ट होते. मोगल साम्राज्य कोसळायचे कारण हे पडीत जमीनी अफाट असूनही स्थानिक बिगरशेतकरी जाती मिरासदार जातींच्या जातपंचायतीच्या परवानगीअभावी त्या जमीनी कसू शकत नव्हत्या. अशा काळात शिवाजीचे क्रांतीकार्य म्हणजे त्याने अस्पृश्य जाती व आदिवासी जमातींना शेतकरी जाती बनविले. ग्रॅंट डफ यांच्या महारट्टाज या ग्रंथाचा दाखला देउन ते लिहितात की कुणबी व मावळातील कोळी इ. आदिवासी शिवाजीच्या निशाणाखाली मराठा बनण्यासाठी जमा झाली. कोळयांना सांगण्यात आले त्यांनी अस्थायी शेती सोडून स्थीर शेती केली तर त्यांना मराठा कुणबी बनता येईल. मध्ययुगात वतनदार हे रयतेकडून जमीन महसूल गोळा करून राजाकडे पेाहचवण्याचे काम करीत. शिवाजीने या वतनदारांना वेसण घालण्याचे काम केले असे शरद पाटील प्रतिपादीत करतात. वतनदारांनी रयतेला नागवू नये, जोरजुलूम करू नये यासाठी मलिकंबरने त्यांचेवर जरब बसवली होती. हे वतनदार ब्राह्मण वतनदारांशिवाय जनतेवर जुलूम करू शकत नसत. त्यामुळे मलिकंबरच्या कमी आकारणी असलेल्या जमीनधारापध्दतीच्या अंमलबजावणीतून वतनदार व ब्राह्मण वतनदार यांचे हितसंबंध धोक्यात आले हेाते असे समाजशास्त्रीय विश्लेषण शरद पाटील यंानी पुढे आणले आहे. शिवाजीचे सैन्य हे बिगरशेतकरी जातींपासून बनले होते. शिवाजीच्या अभेद्य शक्ती असलेल्या किल्ल्यांवरील शिबंद्या अस्पृश्य - आदिवासींनी बनल्या होत्या. अतिशूद्र जातींना शेतकरी वा क्षत्रिय जाती बनवण्याची ही कृती वतनदार जातींच्या हितसंबंधांना व एकूणच जातिव्यवस्थेला तडे देणारी हेाती. भारतीय समाजव्यवस्थेचा कालपट हा स्त्रीसत्ताक गणसमाज, वर्णसमाज, जातीसमाज ते जातवर्गसमाज असा स्थीत्यंतरीत झाला आहे हे शरद पाटलांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आहेे. स्त्रीसत्ताक समाज पुरूषांनी अनियंत्रित होता. वर्णजातलिंगभेदविरहितता या समाजाचे वैशिष्टय होते. त्यामुळे स्त्रीप्राधान्यातच वर्णजातलिंगभेदविरहितता असत ही त्या काळात वर्णजातिसंस्थेला विरोध करण्यासाठी उदयाला आलेल्या तंत्र-पंथाची पायाभूत धारणा होती. तंत्र हा वर्णजाती संस्थेच्या विरूध्द कार्यरत असलेला स्त्रीप्रधान आचारविचार पंथा होता. शिवाजीच्या जातीसंघर्षाची प्रेरणा ही तंत्रसाधनेच्या स्वीकारात होती. इ.स.च्या 6 व्या शतकात जातिव्यवस्थेने अधिक कर्मठ रू धारण केले असतांना तंत्र पंथाने वैदिक धर्माविरोधी जोरदार प्रचाराची भूमिका घेतली होती. शिवाजी बहजून जातींबद्दल व स्त्रियांबद्दल कळवळा दाखवू शकला हे या अब्राह्मणी धर्मांतरामुळेच असे मत शरद पाटील व्यक्त करतात. शिवाजीचा जातिव्यवस्थेविरोधी संघर्ष सुधारित मालिकांबरी धारा लागू ेली हेाती. तेव्हापासून सुरू झाला होता. या संघर्षाची परिणती ही अंतिमत: शिवाजीच्या शाक्त राज्याभिषेकात झाली. हा राज्याभिषेक म्हणजे सजातीय विवाहाप्रमाणे एक विधी नव्हता तर अब्राह्मणी जात्यंतक शाक्त धर्म स्वीकारण्याची दीक्षा होती. विजातीय विवाह करूनच या पंथाची दिक्षा घेतली जात असे. शाक्त राज्याभिषेकाचा हा अन्वयार्थ शरद पाटील यांच्या प्राच्याविद्येतील पांडित्यामुळे लावू शकले. प्राच्यविद्येच्या अभावात गोविंद पानसऱ्यांसारखे अभ्यासक मात्र ब्राह्मणी इतिहासकारांच्या अन्वयार्थालाच पुष्टी देणारे अर्थ प्रतीत करतात. प्रधान मंडळाच्या दहशतवादाला झुगारून शिवाजीने दुसरा राज्याभिषेक केला हेाता. राज्याभिषेकानंतरच छ. शिवाजी जातिव्यवस्थेविरोधातील संघर्ष तीव्र करू शकते. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा बाळगतो हे प्रभावळीच्या ब्राह्मण सुभेदाराला पाठविलेल्या पत्रातील आव्हानपर वचन हे शाक्त राज्याभिषेकापूर्वीचे नाही. या राज्याभिषेकापूर्वी शिवाजीला ब्राह्मण अदंडय मानणे भाग पडले होते हे त्याने प्रभावळीच्या सुभेदारास पाठविलेल्या राज्याभिषेकापूर्वीच्या पत्रावरून दिसते. वर्णव्यवस्था व स्त्रीदास्यविरोधाची पंरपरा असलेल्या शाक्त तंत्रामुळे शिवाजीला ब्राह्मणी धर्माविरूध्द व जातिव्यवस्थेविरूध्द बंड करण्याची प्रेरणा मिळाली होती. उच्चजातीच्या दृष्टीने हा अक्षम्य गुन्हा होता व म्हणून सोयराबाईला हाताशी धरून शिवाजीवर विषप्रयोग केला गेला असे प्रतिपादन शरद पाटील करतात. शरद पाटलांची शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाची मांडणी ही माफुआंच्या राजकीय मांडणीला पूरक आहे. जात्यंतक क्राती ही वर्गांतक क्रांतीपेक्षाही कठीण आहे व ती प्रबोधनाच्या क्रांतीशिवाय अशक्य आहे हे प्रतिपादन आंबेडकरांप्रमाणेच माफुआंचे देखील आहे. भारतीय जात्यांतक लोकशाही क्रांतीची तयारी अब्राह्मणी प्रबोधन क्रांतीने करावी लागेल या भूमिकेतून शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाचे महत्त्व शरद पाटील प्रतिपादीत करतात. मागील वर्षी सबरंग या संस्थेतर्फे शिवाजी महाराजांवर तयार केलेले पाठयपुस्तक मुंबईतील काही शाळांमध्ये अभ्यासक्रमात होते. त्या पाठयपुस्तकाती शिवाजीच्या जातीसंघर्षाविषयक मांडणीवर आक्षेप घेउन व त्याचा उल्लेख शूद्र म्हणून केल्याबद्दल शिवसेनेने हिंसक आंदेालन केले होते. शिवसेनेचा आक्षेप हा शिवाजीच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेला नव्हता तर जातीसंघर्षाला होता ! त्यामुळे शिवाजीला प्रतिक्रांतीकारी हिंदुत्ववाद्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठीचे प्रबोधन शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाच्या मांडणीतून होईल. उदारमतवाद्यांच्या परधर्मसहिष्णुवादी शिवाजी या सिमीत मांडणीतून नव्हे ! त्यामुळे शरद पाटील यांची मांडणी पानसरे व इतर सर्व उदारमतवाद्यांच्या मांडणीपेक्षा अधिक वास्तवदर्शी आहे आणि म्हणूनच सध्याची लोकशाही क्रांतीची कोंडी फोडणारी देखील! दिलीप चव्हाण
महाराष्ट्राचा इतिहास आर्याचा शिरकाव महाराष्ट्रात केव्हा झाला हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. पाणिनी,कात्यायन आणि पातंजली यांच्या ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून डॅा.भांडारकरंानी असे अनुमान काढले आहे की,भारतीय आर्यांना इ.स.पूर्व सातव्या शतका पर्यंत विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे ज्ञान नव्हते. इ.स.पूर्व सातव्या शतकाच्या सुमारास आर्य विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे सरकू लागले असावेत.साधारणपणे इ.स.पूर्व 350 च्या सुमारास त्यांना दक्षिणेकडील तंजावर -मदुरैपर्यंतच्या सर्व प्रदेशाची माहिती झाली असली पाहिजे. ब्राम्हणी धर्मशास्त्रात घातलेल्या बंधनामुळे कदाचित आर्यांचा प्रवेश महाराष्ट्रात लवकर झाला नसावा. बैाध्दायनाच्या धर्मसूत्राप्रमाणे आनर्त अंग,मगध,सौराष्ट,दक्षिणापथ,उपवृत, सिंध आणि सौवीर ह्या देशातील लोक संकरापासून निर्माण झाले आहेत.जो कोणी आर,कारल्कर,पूंद्र,सौवीर,वंग, कलिंग किंवा प्रणून ह्या देशातून पर्यटन करील त्याने पुनस्तोम सर्वपृष्टीचे प्रायश्चित्त घ्यावे.विज्ञानेश्वर किंवा याज्ञवल्क्य ह्याने धर्मसुत्रकार देवलाच्या खालील सूत्राचा उल्लेख केला आहे. जो कोणी सिंध,सौवीर,सौराष्ट,सरहद्दीवरचे प्रांत,अंग,वंग, कलिंग आणि आन्ध्र देशातून पर्यटन करील त्याने आपली मुंज परत करावी. ज्याप्रमाणे आर्य किंवा ब्राम्हणी संस्कृती महाराष्ट्रात निश्चित केव्हा आली हे सांगणे कठीण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव केव्हा व कसे मिळाले हेही सांगणे कठीण आहे.भाषावार राज्यांची विभागणी होऊन 1 मे 1960 रोजी जे हल्लीचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, तसे राजकीय दृष्ट्या एकसंघी महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात नव्हते. पाली वाङ्मयात अपरांत, अवन्ती, विदिशा,कोसल,अस्सक, अलक, दक्षिणापथ, आन्ध्र, महारठ्ठ, कोकणपथ इत्यादी देशाचा नामनिर्देश आहे. काव्य-मीमांसेमध्ये अपरांत म्हणजे देवसभा ह्या नगराच्या पश्चिमेकडील प्रदेश असे म्हटले आहे देवसभा म्हणजे कोणते शहर ह्याची ओळख अजून पटली नाही. डॅा.भांडारकरांच्या मताप्रमाणे अपरांत म्हणजे उत्तर कोकण.परंतु अपरांत म्हणजे उत्तर कोकण,नासिक, गुजरात, सौराष्ट, राजस्थान आणि सिंध या देशांचा मिळून झालेला असा एक प्रदेश असावा असेही बऱ्याच विव्दानांचे मत आहे.अवन्ती प्रदेश विंध्य पर्वताच्या दक्षिणेस खानदेशापर्यंत असावा विदिशा म्हणजे हल्लीचे विदर्भ. विनयपिटकाच्या महावग्गसुत्तामध्ये दक्षिणपथाचा उल्लेख आहे .अवंती प्रदेशातून दक्षिणेकडील गोदावरीच्या खोऱ्यास दक्षिणपथ म्हणत असावे असे वाटते. सुत्तनिपाताच्या पारायण वग्गात असे म्हटले आहे की, कोसल देशवासी बावरी ब्राम्हण दक्षिणपथात गेला आणि तेथे अस्सक राज्यात अलक राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागला.ह्यावरून सिद्ध होते की,गोदावरी नदीच्या आसपासच्या प्रदेशास त्या काळी दक्षिणपथ म्हणत असत.गोदावरी अस्सक आणि अलक राज्यांच्या मधून वाहत होती.अलक गोदावरीच्या उत्तरेस आणि अस्सक दक्षिणेस होता. सिलोनमध्ये लिहिलेल्या पाली भाषेतील दीपवंस आणि महावंस या बैाध्दांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात महारठ्ठ देशाचा उल्लेख आहे. पाली भाषेतील महारठ्ठ याचे संस्कृतात महाराष्ट्र असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे.महावंस हा ग्रंथ इ.स.पाचव्या शतकात लिहिला गेला.दीपवंस त्याच्या बऱ्याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की,स्थविर मोग्गलीपुत्त तिस्स याने(तिसऱ्या) संगीताचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देशसमूहाला धम्म स्थापनेसाठी कार्तिक महिन्यात स्थाविरांना पाठविले. कोणकोणत्या धर्मउपदेशकांना कोठेकोठे पाठविले याची सविस्तर माहिती महावंसामध्ये आढळते त्यात महारठ्ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशाला पाठविले असा उल्लेख आहे. अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. अहिहोळ लेख शके 556 म्हणजे इ.स. 634 चाआहे ह्यू-एन-त्संगने आपल्या प्रवासवर्णनात ज्या मो-हो-लो-च्छि या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजेच महाराष्ट्र असे विव्दानांचे मत आहे ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र इ.स. 641-42 मध्ये होता. भूगोलशास्त्रज्ञ टोलेमीने आपल्याग्रंथात महाराष्ट्राला अरीयके असे म्हटले आहे. टोलेमीने इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रीया विश्वविद्यालयात खगोलशास्त्र आणि भूगोल शिकवीत होता. कर्नाटकातील कलगदगी येथील लोक आजही महाराष्ट्राला अरी असे संबोधतात असे ठाणे जिल्ह्याच्या बॉम्बे गॅझेटीयरमध्ये लिहिले आहे. काही लोकांनी राष्ट्रकूटावरून महाराष्ट्राचे महाराष्ट्र नाव पडले असे म्हटले आहे. पण ते बरोबर वाटत नाही. एकतर राष्ट्रकूटांच्या कितीतरी अगोदर महाराष्ट्र असे नाव पडले होते हे सिद्ध झाले आहे. तसेच कोणत्याच व्युत्पत्तिशास्त्रानुसार राष्ट्रकूटाचे महाराष्ट्र होत नाही. मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. पण त्यापूर्वीच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची माहिती मिळत नाही. सम्राट अशोकाच्या पाचव्या धम्माज्ञेचे शिलालेख सौराष्ट्रातील गिरनार, कटकजवळील धौली, जंगम जिल्ह्यातील जौगढ, हिमालयाजवळ खालसी, अफगाणिस्तानावरील शाहबाझगढी आणि पाकिस्तानातील मानसेहरा येथील खडकांवर कोरलेले आढळतात. त्या शिलालेखांत आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी आणि धम्माचे प्रतिपालन करण्यात प्रजेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोकाने ज्या निरनिराळ्या प्रदेशात धम्माधिकारी पाठविले, त्यात रस्तिक, पेटेनिक आणि अपरांत या देशांचा उल्लेख आहे. डॉ. भांडारकरांच्या मते, अपरांत म्हणजे उत्तर कोकण. त्याची प्रांतिक राजधानी सुप्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा होती. पेटेनिक म्हणजे हल्लीच्या पैठण शेजारील प्रदेश आणि रस्तिक म्हणजे रथी किंवा महारथी लोक राहत असलेला प्रदेश असावा. महाराष्ट्रातील लेण्यात ठिकठिकाणी सापडणारे रसिक आणि भोज लोकांचे संदर्भ डॉ. आळतेकरांनी शोधून काढले आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि समाजरचनेवर नवीन प्रकाश पडेल. नाणेघाट येथील लेण्यात महारथी त्रनाकयीरा आणि त्याची मुलगी-सातकर्णी राजाची राणी नयनीका यांचे पुतळे एकमेकांशी कोरलेले आहेत असे लिहिलेले आहे. कार्ल्यांच्या लेण्यात महारथी गोतीपुत्त अगिमितनाक आणि महारथी वसिथीपुत्त सोमदेव यांचा निर्देश केलेला आहे. महारथी वसिथीपुत्त सोमदेवाने कार्ल्याच्या लेणीला एक गाव इनाम दिल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सोमदेवाचा अधिकार तेथील तालुका प्रदेशावर अथवा जिल्ह्यावर असला पाहिजे. आणि गाव इनाम देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असला पाहिजे. कान्हेरीच्या लेण्यात महारथी नागमूलनिकाचे नाव आढळते, ती एका महाभोज राजाची बहीण आहे, असे म्हटले आहे. कार्ल्याला असलेल्या एका सिंहस्तंभावर तो स्तंभ महारथी अगिमितनाक याने दान केला आहे, असा उल्लेख आहे. कान्हेरीला असलेल्या एका शिलालेखात एका देणगीदार स्त्रीचे नाव नागमूलनिका असून तिच्या मुलाचे नाव स्कंधनाक आहे, असे म्हटले आहे. डॉ. आळतेकर म्हणतात की, इ.स. पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अगोदर असलेली रथी आणि महारथींची राज्ये, आंध्राचे राज्य, महाराष्ट्रावर आल्यावर संपुष्टात आली असली पाहिजेत. ते पुढे म्हणतात की, भोज आणि रथिक लोकांच्या नावापुढे "नाक' हे संबोधन लावलेले आढळते त्यावरून रथिक आणि भोज लोक हे स्थानिक "नाग' जमातीचे असावेत किंवा ते नागाची पूजा तरी करीत असावेत. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या बौद्ध लेण्यातील शिलालेखनात नावाच्या पुढे "नाक' हे उपपद असलेल्या नावांची यादी खाली दिली आहे. कान्हेरी लेण्यातील शिलालेखात - नकनाक अपरनाक, धमनाक, गोलनाक, मित्तनाक. भाजा येथील शिलालेखात - अंपीनाक, किंवा अहीकीनाक. कुडा येथील शिलालेखात - वसूलनाक, पुसनाक. बेडसा येथील शिलालेखात - नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक अपरदेवनाक. याची बायको महाभोजाची मुलगी महारथीनी महादेवी सामादिनिका. कार्ला येथील शिलालेखात - महारथी अगिमितनाक, मितदेवनाक, उसभनाक. शिवनेरी येथील लेण्यातील शिलालेखात - वीररसेनाक. नाशिक येथील लेण्यातील शिलालेखात - राजमंत्री अरहलय-चालीसनाक राजमंत्री अगीयतनाक, कफननाक, रामनाक, वगैरे. "नाक' हे उपपद नावाच्या शेवटी असल्यामुळे रथी आणि भोज लोक हे स्थागित नाग जमातीचे असावेत किंवा ती नागाची पूजा करणारी जमात असावी या डॉ. आळतेकरांनी काढलेल्या निष्कर्षाला त्यांनी काही आधार दिलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या शतकापर्यंत "नाक' हे उपपद नावाच्या शेवटी लावणारी महार जमात आहे. सातारचे राज्य स्थापण्यास शिदनाक महाराने शाहू महाराजांची बाजू घेतली व अनेक लढ्यात पराक्रम केला. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्याला सांगली जिल्ह्यातील कळंबची जहागिरी दिली. त्याचा नातू शिदनाक याने आणि त्याच्या सैन्याने खर्ड्याच्या लढाईत पठाणांनी केलेल्या हल्ल्यात परशुरामभाऊ पटवर्धनाचा जीव वाचवला. नागेवाडीच्या पाटीलकीचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी नागनाक महाराने छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून मोगलांच्यापासून वाई जवळील वैराटगट जिंकून घेऊन घारादिव्य केले. त्याचप्रमाणे अमृतनाक आणि अंबरनाक महारांनी निझामशाही आणि बिदरच्या बहामनी बादशहांकडून महाराजांच्या बावन्न हक्कांच्या सनदी मिळविल्या. इ.स. 1818 साली कोरेगाव येथे पेशवाईची शेवटची लढाई झाली. पुणे-अहमदनगर रस्त्यावर भीमानदीच्या किनारी एक रणस्तंभ आहे. त्याचे मुळचे नाव महास्तंभ असे होते. त्या स्तंभावर कोरेगावच्या लढाईत कामाला आलेल्या ज्या शूर महावीरांची नावे आहेत ती "नाक' हे उपपद शेवटी असलेली आहेत. उदा. सोमनाक, कमलनाक, रामनाक, येमनाक, गोदनाक, कोठेनाक, येसनाक इत्यादी. नाक हे उपपद लावण्याच्या रिवाजावरून पूर्वींचे रथी-महारथी आणि भोज महाभोज म्हणजेच हल्लीचे अस्पृश्य समजले जाणारे लोक असावेत असे वाटते. राजभोज हे आडनाव पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यात ठिकठिकाणी आढळते. आंध्रच्या सातवाहनांची आपल्या राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करतांना त्यांना रथी-महारथींनी तसेच भोज-महाभोजांनी बराच विरोध केला असला पाहिजे. म्हणून त्यांना "अरि' म्हणजे शत्रू असे नाव पडले असले पाहिजे. त्यावरूनच अरियके असे नाव रथी-महापरथींच्या प्रदेशाला इ.स. पूर्वी पहिल्या शतकात पडले असले पाहिले आणि म्हणूनच टोलेमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला अरियके असे म्हटले आहे असे वाटते.े मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य(इ.स.पूर्वी 324 ते इ.स.पूर्वी 300)याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता किंवा नव्हता आणि होत असल्यास महाराष्ट्राच्या कोणत्या भागापर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते ह्याचा निश्चित पुरावा अजुन मिळाला नाही.पण त्याचा नातू सम्राट अशोक(इ.स.पूर्व274 ते 23) ह्याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होत होता ह्याचा निश्चित पुरावा सापडतो. सम्राट अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्याजील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्याची प्रांतिक राजधानी होती. मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्पमित्र नावाच्या एका सेनापतीने त्याला कपटाने मारले(इ.स.पूर्वी 184) आणि मौर्याचे राज्य बळकावले.जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते,तरी महाराष्ट्रात त्यांची छोटी छोटी राज्य बराच काळपर्यंत अस्तित्वात होती.चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्यांचा इ.स.625 च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला असा ताम्रपटात उल्लेख आहे. मा. श. मोरे