सोलापूर
म्हणजे विडी उत्पादनाचे माहेरघर. संपूर्णपणे शारीरिक श्रम आणि नैसर्गिक
साधनसंपत्ती यांवर अवलंबून असलेल्या या उद्योगाला औद्योगिकीकरण व
स्पर्धेच्या काळात घरघर लागलेली आहे. अनेक कारखाने बंद आहेत. जे सुरू आहेत
तेथील कामगारांची परिस्थिती हालाखीची आहे, ज्यात स्त्रियांचे प्रमाण
पुरुषांपेक्षा जास्त आहे. दिवसभर 8 ते 9 तास काम करून आठवड्याला जेमतेम
500 रुपये मोबदला मिळवणार्या त्या महिलेने जी माहिती सांगितली त्यामधील
काही ठळक मुद्दे सांगावेसे वाटतात.