Pages

Monday, August 27, 2012

   स्त्री-इतिहासाच्या’ दृष्टीने.........!


आज भारतामध्ये वैचारिक कृती विभिन्नता कमालीची दिसते. एकीकडे स्त्रीने उच्चाधिकार प्राप्त केलेला दिसतो, तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या सधन प्रदेशामध्ये स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण अधिक दिसून यते. स्त्री-पुरुष असमानतेची बीजे इथून पेरली जातात. असेच घडत राहिले तर निसर्गाचा समतोल ढळेल आणि समाज अशांत बनेल. यासाठी विचारपूर्वक स्त्री भ्रूणाला वाढविणे जरुरी आहे. स्त्रीची आजची स्थिती अशी दिसते तेव्हा हजारो वर्षांपूर्वीची स्त्री कशी असेल याची उत्सुकता नक्कीच वाटते. त्यासाठी शिल्पातून स्त्रीचे अवलोकन केले आहे.
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवाने निर्मित केलेल्या वस्तू आणि वास्तूंचा अभ्यास होय. यामध्ये आदिमानवाने तयार केलेल्या दगडी हत्यारापासून मध्ययुगात बांधलेल्या ताजमहालापर्यंतचा अभ्यास करण्यात येतो. ताम्रपट्ट, प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंडातील ‘सिंधू’सारख्या संस्कृती, उत्खननशास्त्र, प्राचीन लेण्या, मंदिरे, शिलालेख, ताम्रपट्ट, नाणी, चैत्य, गुफाचित्रे, स्तुप, मूर्ती या सर्वांचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्र करते.

अंधारातल्या तारका

            पाश्चिमात्य देशातील स्त्रियांनी १८ व्या शतकापासून विज्ञान
            क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश 

 ---------------------------------------------------------------------------------------------------------


स्त्री चळवळीचा एक रोख हिस्ट्नी म्हणजे हिज स्टोरी या शब्दावर होता. हा शब्द इतिहास जणू पुरुषांनीच घडवला ही बाब मनावर ठसवतो. त्यामुळेच स्त्रियांचे हक्क, स्त्रीपुरुष समानता यासारख्या गोष्टींसाठी झगडणाऱ्या स्त्री चळवळीने भूतकाळात स्त्रियांनी केलेली कर्तबगारी व त्यांनी निरनिराळया क्षेत्रात केलेले कार्य जगापुढे आणण्याच्या दृष्टीने संशोधन करून विविध प्रकारची माहिती मिळवली. पॅि्निशटाया फारा या लेखिकेने `सायंटिस्ट्स अॅनानिमस' या आपल्या पुस्तकातून पाश्चिमात्य देशातील स्त्रियांनी १८ व्या शतकापासून विज्ञान क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.

       -----------------------

भारतात तर मुलींना लिहायला, वाचायलादेखील त्या काळात शिकवले जात नसे. मुलींना शिकवण्याची गरज गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे व त्याही आधी जोतिबा फुले यांना वाटली. प्रारंभी शिकलेल्या सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, बाया कर्वे, रमाबाई रानडे या आपल्या नवऱ्यांच्या आग्रहाखातर व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शिकल्या. युरोप-अमेरिकेतील मुलींना विज्ञान व गणित शिकायला बंदी होती. त्याविरुद्ध अनेक स्त्रियांनी आवाज उठवला. मुलींना विज्ञान व गणिताचे शिक्षण द्यायला हवे यावर भर दिला. त्यासाठी स्वत: शाळा चालवल्या. विज्ञानप्रयोगांसाठी मुलींना उत्तम उपकरणे प्राप्त व्हावीत म्हणून पैसा जमवला.

बायकांची अक्कल!

डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २८ जुलै २०१२
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240440:2012-07-27-14-55-58&catid=387:2012-01-16-09-23-36&Itemid=391

स्त्रियांना जरा अक्कल कमीच हे अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं वाक्य.. अगदी आजही ऐकू येणारं. स्त्री भावनिक जास्त असते. विचारापेक्षा भावनेनं निर्णय घेते असंही म्हटलं जातं, त्यात जैविक रचनेचा भाग किती आणि सामाजिक घडणीचा सहभाग किती?
----------------------------------------------------

पि ढय़ान्पिढय़ा ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद! प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य! त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची!’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का? ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ हे ब्रह्मवाक्य अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं नाही का?
आज ही ‘चुलीपुरती’ अक्कल पाताळशोधापासून अंतराळ प्रवासापर्यंत गवसणी घालत असली तरीही त्याबद्दल कितीतरी समज-गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. मुद्दाम पसरवलेही जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्त्रियांच्या मेंदूवरच्या पेशींच्या घडय़ा संख्येनं कमी असल्यामुळे तो कमी विकसित आहे असा एक जावईशोध मध्ये लावला गेला. अर्थातच तेवढय़ाच झटकन त्यावर प्रत्युत्तरेही दिली गेली. पण स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेविषयी आणि कार्यकर्तृत्वाविषयीची काही शंकेखोर प्रश्नचिन्हं आजही छुपेपणानं अनेकांच्या मनात घर करून असतात. याचा एक मजेदार प्रत्यय मीही घेते. अनेकदा कार्यशाळांमध्ये मी उपस्थितांना एक कोडं सोडवायला देते. ‘‘एका तरुण मुलाला गाडी चालवताना अपघात होतो. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. त्याला बाकीचे लोक घाईघाईने एका प्रसिद्ध रुग्णालयात नेतात. तेथील प्रमुख शल्यचिकित्सक त्याला पाहून म्हणतात, ‘मी याची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. हा माझा मुलगा आहे.’
अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. हेलन ओकोआ
सुनीता पेठे
Saturday, December 18, 2010 AT 02:30 AM (IST)

अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासशाखांमध्ये आज अनेक महिला कार्यरत आहेत. "ऑप्टिक्‍स' (दृष्टीविषयक प्रकाशशास्त्र), "ऑप्टिकल रोबोटिक्‍स' (यंत्रमानवशास्त्र), "इमेजिंग टेक्‍नॉलॉजी, "स्पेसक्रॉफ्ट कम्युनिकेशन' अशा विद्याशाखांमध्ये केलेल्या संशोधनासाठी ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, त्या अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. एलन ओकोआ यांच्या कार्याची माहिती

कर्तृत्वासाठी स्त्रियांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही, हे सिद्ध करणारी आजच्या काळातली एक प्रसिद्ध अंतराळशास्त्रतज्ज्ञ म्हणजे डॉ. एलन ओकोआ. सध्या डॉ. एलन या अमेरिकेतील ह्यूस्टन येथील "जॉन्सन स्पेस सेंटर'च्या उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. एलन यांचा जन्म मे 1958 मध्ये कॅलिफोर्नियातील ला मेसा इथे झाला. त्यांचे वडील किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करत असत तर त्यांची आई साधी संसारी महिला होती. आपली मुलगी पुढे अंतराळात विहार करणार आहे, याची कसलीही कल्पना या दांपत्याला तेव्हा नसणे स्वाभाविकच होते. एलन यांनी मात्र पुढे ती प्रत्यक्षात आणली.
शाळेत शिकत असतानाच त्यांना भौतिकशास्त्राविषयी विशेष आवड निर्माण झाली होती; मात्र अभ्यासाबरोबरच व्हॉलिबॉल आणि सायकल चालवणे, हेही आवडीचे विषय होते; तर बासरी वाजवणे हा त्यांचा अतिशय लाडका छंद होता. ग्रॉस मॉंड हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर एलन सान दिएगोच्या स्टेट युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्र हाच विषय घेऊन पदवीधर झाल्या. त्यानंतर स्टॅनफोर्डमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवीही मिळवली. एमएस केल्यावर याच विषयात त्यांनी डॉक्‍टरेटही प्राप्त केली.
ऑप्टिक्‍स (दृष्टीविषयक प्रकाशशास्त्र) आणि ऑप्टिकल रोबोटिक्‍स (यंत्रमानवशास्त्र) या विषयातील त्यांच्या संशोधनाबद्दल "नासा'तर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. "ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका' (O.S. A.) आणि "अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्‍स अँड ऍस्ट्रोनॉटिक्‍स' अशा दोन्ही संस्थांच्या त्या सभासद आहेत. एमएस झाल्यावर लगेच त्या "सॅनडिआ नॅशनल लॅबोरेटरी'मधल्या "इमेजिंग टेक्‍नॉलॉजी डिव्हिजन'च्या त्या सभासद होत्याच. तिथे आणि नासाच्या "एम्स रिसर्च सेंटर' या दोन्ही ठिकाणी त्यांनी संशोधनाचे विशेष कार्य केले. एम्स सेंटरच्या इंटेलिजंट सिस्टिम टेक्‍नॉलॉजी ब्रॅंचच्या त्या प्रमुख होत्या. अंतराळविषयक संगणकीय प्रणालीच्या संशोधनकार्य संस्थेत त्या पर्यवेक्षकही होत्या. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीस इंजिनिअर्स आणि शास्त्रज्ञ-संशोधकांनी काम केले.
विज्ञानविषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच विज्ञानविषयक अनेक परिषदा, चर्चासत्रे, परिसंवादांतून त्यांनी शोधनिबंधवाचन केले आहे. त्यावर स्वतंत्र व्याख्यानेही दिली आहेत. 1990 मध्ये "नासा'मध्ये त्यांची निवड झाली आणि 1991 च्या जुलैमध्ये त्या अंतराळवीरही झाल्या. अंतराळयानात असलेल्या संगणकीय प्रणालीवर देखरेख करणाऱ्या मंडळाच्या त्या प्रमुख होत्या. एलन यांनी ज्याप्रमाणे "ऍस्ट्रोनॉट ऑफिस'च्या स्पेस सेंटरच्या सहायक म्हणून काम केले, त्याचप्रमाणे मिशन कंट्रोलमध्ये स्पेसक्रॉफ्ट कम्युनिकेटर म्हणूनही भूमिका बजावली. फ्लाइट क्रूझ ऑपरेशनच्या उपसंचालक आणि संचालक या पदावरही त्या होत्या.