
बायकांची अक्कल!
डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २८ जुलै २०१२
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240440:2012-07-27-14-55-58&catid=387:2012-01-16-09-23-36&Itemid=391
स्त्रियांना जरा अक्कल कमीच हे अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं वाक्य.. अगदी आजही ऐकू येणारं. स्त्री भावनिक जास्त असते. विचारापेक्षा भावनेनं निर्णय घेते असंही म्हटलं जातं, त्यात जैविक रचनेचा भाग किती आणि सामाजिक घडणीचा सहभाग किती?
----------------------------------------------------
पि ढय़ान्पिढय़ा ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद! प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य! त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची!’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का? ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ हे ब्रह्मवाक्य अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं नाही का?
आज ही ‘चुलीपुरती’ अक्कल पाताळशोधापासून अंतराळ प्रवासापर्यंत गवसणी घालत असली तरीही त्याबद्दल कितीतरी समज-गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. मुद्दाम पसरवलेही जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्त्रियांच्या मेंदूवरच्या पेशींच्या घडय़ा संख्येनं कमी असल्यामुळे तो कमी विकसित आहे असा एक जावईशोध मध्ये लावला गेला. अर्थातच तेवढय़ाच झटकन त्यावर प्रत्युत्तरेही दिली गेली. पण स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेविषयी आणि कार्यकर्तृत्वाविषयीची काही शंकेखोर प्रश्नचिन्हं आजही छुपेपणानं अनेकांच्या मनात घर करून असतात. याचा एक मजेदार प्रत्यय मीही घेते. अनेकदा कार्यशाळांमध्ये मी उपस्थितांना एक कोडं सोडवायला देते. ‘‘एका तरुण मुलाला गाडी चालवताना अपघात होतो. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. त्याला बाकीचे लोक घाईघाईने एका प्रसिद्ध रुग्णालयात नेतात. तेथील प्रमुख शल्यचिकित्सक त्याला पाहून म्हणतात, ‘मी याची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. हा माझा मुलगा आहे.’
आता त्या मुलाचं आणि त्या प्रमुख शल्यचिकित्सकांचं नातं काय असेल?’’ या प्रश्नाला चटकन मिळणाऱ्या उत्तरांमध्ये- काका, मोठा भाऊ, सावत्र वडील, मानलेले वडील हे नातेसंबंध सांगितले जातात. क्वचित ‘आई’ हे नातं नोंदवलं जातं. एखाद्या मोठय़ा प्रसिद्ध रुग्णालयातील प्रमुख शल्यचिकित्सक ‘स्त्री’ असू शकते, हे प्रथमदर्शनी डोक्यातच येत नाही, यातूनच मघाशी म्हटलेलं छुपं प्रश्नचिन्ह व्यक्त होतं.
याबद्दल संशोधन काय सांगतं? क्षमता असूनही ती फुलवण्याचा प्रयत्न केला जात नाही की मुळात स्त्री-पुरुषांच्या विचारप्रक्रियाच भिन्न असतात? यावर अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत, पण गट म्हणून काही फरक दिसले तरी ते सरसकट स्त्री-पुरुषांना १०० टक्के लागू होत नाहीत, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतं. अगदी विशेष बुद्धिमत्ता असलेल्या मुलामुलींनासुद्धा सर्वसामान्य फरकांच्या तराजूतच बऱ्याचदा तोललं जातं असं दिसतं. विशेष बुद्धिमान मुलांबद्दलचं संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या एका संशोधन नियतकालिकातील मुळात ‘गणिती’ क्षमता अतिशय उत्तम असणाऱ्या दोन कोरियन मुलींवर केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाचा एक लेख वाचनात आला. या दोन्ही मुलींच्या आणि त्यांच्या संबंधित पालकांच्या संशोधकांनी चार टप्प्यांवर सविस्तर मुलाखती घेतल्या होत्या. (पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी या शालेय वर्षांत) सुरुवातीला गणिताच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम यश मिळविणाऱ्या ‘किम’ आणि ‘ली’चा गणितातील रस कसा हळूहळू कमी होत गेला आणि शेवटी त्यांनी अगदीच वेगळ्या क्षेत्राची करिअरसाठी कशी निवड केली याची सुरेख चिकित्सा त्या लेखात केली आहे. ‘मी खराब मूडमध्ये असले की गणितं सोडवून मला मस्त वाटतं’ असं पाचवीत म्हणणारी किम, आठवीत- ‘मी सगळ्या वर्गात मॅथ्समध्ये बेस्ट आहे’, असं अभिमानानं सांगणारी किम बारावीपर्यंत गेल्यावर हळूहळू ‘इंग्रजी’ कसं उत्तम करिअर आहे, डिप्लोमॅट होण्यासाठी ते कसं उपयोगाचं आहे हे संशोधकांना पटवून देताना दिसते. तीच गोष्ट ‘ली’ची! याचं विश्लेषण करताना पालकांबरोबरचा संवाद संशोधकांना मदत करतो. गणिती बुद्धीला प्रोत्साहन देण्यापेक्षा समाजमान्य करिअरला पालकांनी दिलेली पसंती, त्यांचं स्वत:चं गणिताविषयीचं अज्ञान आणि नावड, ‘मुलगी’ म्हणून गणितात मुलीच्या करिअरबद्दलची साशंकता अशा अनेक गोष्टी त्यांच्या मुलाखतीतून पुढे येतात.
दुसरीकडे, एका संशोधनात असं दिसतं की, एकूण बुद्धिमत्तेच्या चाचण्यांवरची कामगिरी तपासली तर शेकडय़ात सर्वात वरच्या दोन टक्क्य़ांत जितक्या मुली असतात, त्यांच्या दुप्पट संख्येनं मुलगे आढळतात. मुलग्यांमधील बुद्धिमत्तेची ही फूटपट्टी असल्याचा यातून सरळसरळ अर्थ कुणी काढला तर सुरुवातीच्या बर्नार्ड शॉ यांच्या कॉमेंटला पूरकच निष्कर्ष आहेत असं वाटेल. पण पुन्हा यामागची कारणं तपासताना असं लक्षात येतं की, मुळात मुलींचा अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता चाचण्या सोडविण्यातला रसच कमी आहे, कारण सामाजिकीकरणाच्या प्रभावामुळे बुद्धिमत्तेपेक्षा व्यक्तिमत्त्वाच्या इतर गुणांवर त्या अधिक लक्ष केंद्रित करीत असतात.
एका विशेष बुद्धिमान मुलामुलींच्या शाळेत केलेल्या दीर्घ संशोधनातही अशीच मजेदार निरीक्षणं आढळतात. पाचवीमध्ये- आठवीमध्ये मुलामुलींच्या तार्किक बुद्धिमत्तेत बऱ्यापैकी फरक दिसतो, ज्यात मुलगे गणिती क्षमतेत जास्त चांगली कामगिरी करताना दिसतात. मात्र दहावीपर्यंत हे फरक पुसट होऊन जातात. तरीही मुली भाषिक क्षमतेत नेहमीच पुढे राहतात आणि मुलगे त्रिमितीय क्षमतेत पुढे राहतात. हेच फरक मग सामाजिकीकरणानं अधिक रुंदावतात आणि करिअरमध्येही प्रतिबिंबित होतात.
अर्थात ‘बुद्धिमत्ते’च्या अशा विशिष्ट संकल्पनेपल्याडही विचारप्रक्रियांचे अनेक प्रवाह दिसतात. स्त्रियांचे विचार पाहिले तर त्यात कल्पनारम्यता आणि भावनिकतेबरोबरच एका खास अशा अंत:प्रेरणेलाही महत्त्वाचं स्थान मिळालेलं दिसतं.
माझ्या एक सहकारी एकदा सांगत होत्या, ‘‘एका परिचितांच्या नवीन घेतलेल्या घरी मी गेले होते. तिथे मला काहीतरी खूप विचित्र, अस्वस्थ वाटायला लागलं. मी काहीतरी कारण काढून उठून आले. नंतर मला कळलं की त्या घरात आधीचं जे कुटुंब राहत होतं त्यांच्यातील एका कुणी आत्महत्या केली होती!’’
अतिसंवेदनशील अंत:प्रेरणेचा हा एक अनुभव. एरवी मी विश्वास ठेवलाही नसता, पण ज्या मैत्रिणीनं हे सांगितलं, ती स्वत: अत्यंत विज्ञानवादी, तर्ककठोर! त्यामुळे या अनुभवावर विचार करावासा वाटला. सूक्ष्म अशी एक अंत:प्रेरणा बाईच्या मनात सतत जागती असते असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. (तोच प्रसिद्ध सिक्स्थ सेन्स!) अर्थात तिला जाणिवेच्या पातळीवर आणण्यासाठी काही अधिक प्रगल्भता किंवा प्रसंगाची तीव्रता कारणीभूत ठरत असेल कदाचित!
स्त्रियांचं विचारविश्व जर पाहिलं तर त्यात स्वत:च्या अस्तित्वापेक्षाही जबाबदाऱ्या, मुलांचं- कुटुंबीयांचं भविष्य, त्यांनी मिळवलेले यश यांचेच विचार जास्त असतात असं दिसतं. स्वत:च्या मूळ बुद्धिमत्तेचा, क्षमतांचा शोध घेणं, त्याला अनुकूल वातावरण मिळवणं या सगळ्यांचा फार विचार ती करताना दिसत नाही. अर्थात संधी/ शिक्षण/ भूमिकांची रिजिडिटी या सर्वाचा त्यावर होणारा दीर्घकाळ परिणाम त्यामागे आहेच.
स्त्रीनं ठरवलं तर ती किती परखडपणे एखाद्या घटनेचा विचार करू शकते, याचं फार सुरेख दर्शन आपल्याला ‘स्त्रियांची शतपत्रे’ या ग्रंथातून होतं. १८५० ते १९५० या काळात विविध स्त्रियांनी तत्कालीन वृत्तपत्रांना लिहिलेल्या पत्रांचा हा संपादित संग्रह आहे. केवढी विचारांची ताकद तत्कालीन ‘तथाकथित अशिक्षित’ स्त्रियांमध्ये होती हे त्यातील काही पत्रे वाचताना लक्षात येतं. आसपास घडणाऱ्या घटनांचे अगदी सूक्ष्म पदरसुद्धा स्त्रियांनी त्यात नोंदवले आहेत. पुनर्विवाहाविषयी आपलं मत व्यक्त करताना एक अगदी सर्वसामान्य स्त्री कळकळीने म्हणते, ‘‘हल्ली बहुतेक स्त्रियांना व पुरुषांना विचारशक्ती आली आहे आणि जुन्या चालीच्या लोकांनी जरी बडबड केली तरी त्यांचे काहीएक चालायचे नाही. चांगल्या रूढी आम्हामध्ये हळूहळू पुन्हा सुरू होतील यात शंका नाही.’’
१९३६ साली ‘केसरी’मध्ये प्रकाशित झालेल्या राजकीय पत्रांमध्ये ‘स्त्री मतदारसंघाचे स्वरूप कसे असावे’ यावर अत्यंत परखड मते उमाबाई कुंदापूर यांनी मांडली आहेत. त्यात त्या म्हणतात, ‘‘हिंदुस्थानची प्रगती स्त्रियांच्या चळवळीवर अवलंबून असताना एक कोटी जनसंख्येतून एकच स्त्री प्रतिनिधी निवडून दिली तर त्यातून हवे ते कसे साधेल?’’
एकुणात असं दिसतं की, स्त्रियांच्या विचारात तर्ककठोरता कमी असली तरी ‘तर्कशुद्धता’ (म्हणजेच हेतू आणि साधन यांची स्पष्टता) नक्कीच जास्त आढळते. तो तर्क त्यांचा त्यांनी लढवलेला असतो. इष्ट/ अनिष्ट, चूक-बरोबर यापेक्षाही या विचारांतून काय पोचवायचं आहे, हे त्या ठामपणे सांगू शकतात.
स्त्रियांचे तर्क किंवा विचारात भावनिकता जास्त दिसते, असंही आढळतं. सर्वसाधारण भावनिक बुद्धिमत्तेत स्त्री-पुरुष भेद फार आढळत नसले तरी त्यातील टीकेचा स्वीकार, तदनुभूती (आस्था/ एम्पॅथी) आणि कमिटमेंट (निष्ठा? समर्पण? शब्दाला जागणं?) यावर स्त्रिया अधिक वरचढ आहेत असं दिसतं.
या सर्व घडणीमध्ये जैविक रचना, शारीरिक बदल (विशेषत: पौगंडावस्थेतील) यांच्याइतकाच वाटा सामाजिकीकरणाचासुद्धा आहेच.
आता सुरुवातीच्या किश्शावर जरा पुन्हा विचार केला तर स्त्रियांच्या विचारशक्तीबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आवाक्याबद्दल स्त्रियांना आणि इतरांनाही पडणारी प्रश्नचिन्हं थोडी कमी झाल्यासारखी वाटतात का?
------------------------------------------------------------------------------------------------------------
Woman with Longest Dreadlocks: “I Would Never Cut My Hair”
By Sarah B. Weir, Shine Senior Writer |
Mandela stopped cutting her hair in her 20s. "I started growing my hair 25 years ago, when I started having certain dreams and visions," she said. Growing dreadlocks was part of a spiritual journey to completely remake her life. Now, she says she has countless fans who call her a "living legend" and the "ninth wonder of the world." Weighing in at 39 pounds, she has to carry her hair in a cloth baby sling when she goes out.
More on Yahoo!: Unreal Hair Colors from Music Stars (Photos)
At first, her family, who originally hailed from Trinidad, didn't approve. "My mom told me to remove the mop from my head before I am welcomed in her home again," she recounted in a 2013 interview. "She said to me, 'Imagine I put nice Vaseline and lard in your hair and groom it so nicely...now look what you did to it.'"
Also on Shine: Hot Guys Before They Had Good Hair
Mandela handles her dreadlocks carefully, washing them once a week, and conditioning them with natural oils. After it becomes wet, her hair can take up to two days to fully dry. In the late 1990s, she underwent a bilateral mastectomy followed by chemotherapy. Miraculously, her hair didn't fall out. According to a 2010 interview, she tied her dreadlocks up into knots in order to preserve them.
In 2009, with the help of a haircare expert who specialized in dreadlocks, she began to untie her hair. After 12 hours of painstaking work, she discovered it had grown to unbelievable lengths over the years. In 2008, she was the first person to obtain the Guinness World Record for longest dreadlocks, and a year later, she broke her own record with a strand measuring 19 feet, six inches. A year later, Guinness decided to rest the category, since dreadlocks can be lengthened by twisting in extensions, making Mandela the first and only record holder.
But, nearly 20 feet of hair is nothing. Last week, one of Mandela's strands was measured at 55 feet, 7 inches-almost three times the length of her official record.
While Asha refers to her hair as "her baby," there are physicians who call it a health hazard. "The doctors seem to think I have a curvature of my spine and that it's the length and the weight of my hair that's making me curve," she said. "Some have said my neck has collapsed at the back and that I need to be careful because I could start having spasms in my spine and probably be paralyzed." Still, this real-life Rapunzel said, "My hair has become part of me. It is my life. I will never cut it."
No comments:
Post a Comment