जगण्यातूनच जन्मलेला स्त्रीचा तत्त्वविचार

ज्ञान
हे जसे मानवी संस्कृतीच्या विकासाचे मूल कारण आहे, तसे ते मानवी
स्वातंत्र्याचेही. ज्ञानाच्या विस्ताराबरोबर मानवी जीवनाच्या उदयाच्या,
शाश्वतीच्या, पोषणाच्या आणि सातत्याच्या शक्यताही वाढत जातात आणि जीवनाला
सीमित करणाऱ्या अनेक बाधांपासून आणि बंधनांपासून मुक्तता मिळत जाते.
म्हणून विद्वानांनी ज्ञान आणि मानवी स्वातंत्र्य यांचा कार्यकारणभावसंबंध
मानला आहे.
हे ज्ञान स्त्री-पुरुष सर्वांनाच आवश्यक आहे. त्यातली विषमता अन्याय्य तर आहेच; पण मानवी प्रगतीला घातकही आहे. मध्ययुगाच्या अखेरीस जगभरातल्या समाजधुरीणांना याची जाणीव होत गेली आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या विचाराला अनेक प्रकारे चालना मिळाली. परंतु स्त्रीचा जन्म पुरुषाइतकाच एक स्वतंत्र जीव म्हणून झाला आहे आणि या जीवाला स्वतःची उन्नती करून घेण्याचा पुरुषाइतकाच स्वाभाविक हक्क आहे, याचे भान मानवी संस्कृतीच्या दीर्घ वाटचालीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रदेशांत, वेगवेगळ्या कालखंडांत लुप्तप्राय झाले होते. परिणामी स्वतंत्र तत्त्वज्ञान-परंपरा अथवा तत्त्वचिंतनात्मक ग्रंथ यांच्या आधारे स्त्रियांनी केलेल्या तत्त्वज्ञान विचाराचा मागोवा घेता येत नाही. इसवी सन पूर्व पाचवे शतक ते इसवी सनाचे अठरावे शतक इतक्या दीर्घ कालखंडाला तर या दृष्टीने अंधाराचाच कालखंड म्हणावे लागते.
मात्र याचा अर्थ असा नव्हे, की स्त्रियांजवळ विचारांचे सामर्थ्यच नव्हते. वैदिक काळापासून आपल्या बौद्धिक क्षमतांचे आणि स्वतंत्र प्रज्ञेचे दर्शन स्फुट स्वरूपातच, पण स्त्रियांनी घडवले आहे. वैदिक आणि औपनिषदिक वाङ्मयात, बौद्ध वाङ्मयात आणि मध्ययुगीन भक्तिपर साहित्यात स्त्रियांच्या आध्यात्मिक विचारांचा लख्ख स्फुल्लिंग अधूनमधून;पण अगदी आधुनिक काळापर्यंत दिसत आला आहे आणि जीवनाशी घट्टपणे संलग्न, किंबहुना जगण्यातूनच जन्मलेले तिचे स्वतंत्र असे तत्त्वज्ञान निर्माण झाले. ते ग्रंथबद्ध होऊन प्रकट झाले नसले तरी ते तिच्या कृती-उक्तींमधून ते व्यक्त झालेच आहे.

पंचमहाभूतात्मक सृष्टीच्या निर्मितिवैभवाने स्तिमित झालेल्या माणसाचे चराचरातील गूढतत्त्वाविषयीचे आणि निर्माणक शक्तीविषयीचे मनन-विवरण आणि आत्मज्ञान हे वेदोपनिषदांमधल्या तत्त्वचिंतनाचे मुख्य विषय. मानवी संस्कृतीच्या शैशवकाळातल्या या वाङ्मयात ब्रह्मवेत्त्या ऋषींच्या बरोबरीने ब्रह्मवादिनी स्त्रियांचा सहभाग दिसतो. ऋग्वेदात स्त्रीरचित सूक्ते पुष्कळ आहेत. वाच् किंवा वाक् आम्भृणी हिने रचलेले एक सूक्त दहाव्या मंडलात आले आहे. स्त्रीच्या अध्यात्म क्षेत्रातल्या प्रातिभ विचारांचा तो एक श्रेष्ठ आविष्कार आहे. या सूक्तात वाक् स्वतःला एक मूलशक्ती मानते. ही निर्णायक शक्ती आहे. ही अनेकरूपा आहे. द्यावा-पृथ्वीला व्यापणारी आहे. द्युलोकाला उत्पन्न करणारी आहे. "या जगात जे जे आहे ते ते सर्व निर्माण करणारी, त्यात भरून असणारी आणि सर्वांवर सत्ता असणारी अशी मूलशक्ती म्हणजे मीच आहे. प्राणिमात्रांनी पाहिलेले, ऐकलेले, जगलेले समस्त ज्ञान म्हणजे मीच आहे' असे वाक् आम्भृणीचे उद्गार आहेत.
स्त्रीमध्ये असलेल्या निर्मितीच्या शक्तीची सांगड सृष्टिनिर्मितीला कारण होणाऱ्या चित्शक्तीशी या सूक्तात वाक् आम्भृणीने थेटपणे घातली आहे. नासदीय सुक्तात आद्यशक्तीची जी कल्पना केली आहे, त्या निर्माणक्षम शक्तीशी मानवी जीवनाचा थेट बंध वाक् आम्भृणीने आपल्या सूक्तात जुळवला आहे.अशीच वैचारिक प्रगल्भता वाचक्नवी गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्या बृहदारण्यकोपनिषदातल्या संवादात दिसते. विदेहराज जनकाच्या विद्वत्सभेत श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणून याज्ञवल्क्याने सहस्र गाईंवर अधिकार सांगितला तेव्हा त्याला अडवून प्रश्न करणाऱ्या सभेतल्या इतर उपस्थित ऋषी वर्गात गार्गी ही ब्रह्मवादिनी होती. तिने याज्ञवल्क्याशी केलेली तत्त्वचर्चा ही भारतीय तत्त्वज्ञानपरंपरेत गाजलेली तत्त्वचर्चा आहे. गार्गीने याज्ञवल्क्याला ब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना दिली गेलेली उत्तरे, असे या चर्चेचे स्वरूप आहे. गार्गीचे प्रश्न सृष्टी आणि अवकाश यांच्यासंबंधीचे आहेत आणि त्यांच्या अनुरोधाने विश्वाच्या मूलाधारापर्यंत पोचण्याचा तिचा प्रयत्न आहे. सृष्टीच्या आरंभी जे जल होते, त्या जलाचा मूलाधार कोणता इथपासून गार्गीचे प्रश्न सुरू होतात आणि ते ब्रह्मलोकाच्या मूलाधारापर्यंत जाऊन पोचतात. एकामागून एक बाण यावेत तसे ते प्रश्न गार्गी विचारत राहिली, कारण विश्वाच्या कारक शक्तीच्या स्वरूपाचे चिंतन तिनेही केले होते. या विश्वाच्या निर्मितीला आणि सातत्याला कारक अशी एक शक्ती आहे, की जिच्या इच्छेने हा सर्व चराचर पसारा अस्तित्वात आला आहे, या औपनिषदिक विचारातूनच गार्गीचे बारा प्रश्न निर्माण झाले आहेत. याज्ञवल्क्याचे श्रेष्ठत्व तपासून पाहून त्याच्या ज्ञानाविषयीचा निर्वाळा गार्गीनेच जनकाच्या विद्वतसभेला अखेर दिला आहे. आत्मविश्वास आणि अधिकार यांची जोड गार्गीच्या तत्त्वज्ञान विचाराला इथे सहजच मिळालेली दिसते.
या विश्वाच्या निर्मितीला आणि सातत्याला कारक अशी एक शक्ती आहे, की जिच्या इच्छेने हा सर्व चराचर पसारा अस्तित्वात आला आहे. या औपनिषदिक विचारातूनच गार्गीचे बारा प्रश्न निर्माण झाले आहेत.
साभार; सकाळ http://online2.esakal.com/esakal/20120121/5685434414722056356.htm
No comments:
Post a Comment