
8 Mar 2012, 1518 hrs IST
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12186771.cms
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
भारतीय महिलांची मान अभिमानानं उंचावणारी बातमी आज ‘ महिला दिना ’ च्या दिवशीच आली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातल्या सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांना जागतिक आर्थिक मंचातर्फे देण्यात येणारा ‘ यंग ग्लोबल लीडर्स ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या वतीनं दरवर्षी ४० वर्षांखालील कर्तृत्त्ववान युवा नेत्यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारविजेत्यांमधील अनेक बड्या मंडळींमध्ये, राजस्थानातल्या छोट्याशा गावच्या सरपंच छवी राजावत यांचंही नाव जाहीर झाल्यानं भारतीय महिलांचं कर्तृत्त्व पुन्हा अधोरेखित झालंय. त्यांच्यासोबतच, पंतप्रधान कार्यालयातील मीडिया विभागाचे संचालक विनय जोब, गुगलचे लॅरी पेज, आयशर समूहाचे दीपेंद्र हुडा, ज्योतिरादित्य शिंदे, सुभाषिनी चंद्रा, वंदना गोयल, आलोक, आदर्श कुमार, अश्विन नायक, संजीव रॉय यांनाही या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
जेव्हा भारतीय सरपंच जग जिंकते
28 Mar 2011, 0027 hrs IST
SMS NEWS to 58888 for latest updates
जयपूरची छवी राजावत ठरली आकर्षण
संयुक्त राष्ट्र
येथे भरलेल्या ११ व्या इन्फो-पॉवर्टी वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये अध्यक्षांनी एका भारतीय महिला सरपंचाची ओळख करून देताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर अविश्वासाचा भाव झळकला. जीन्स परिधान केलेली ही तरुणी भारतातल्या एका खेड्याची सरपंच आहे, यावर विश्वास बसणे खरोखरच अशक्य होते.
बॉलिवूडमधील अभिनेत्री किंवा मॉडेल शोभावी अशी ३० वषीर्य छवी राजावत जयपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या सोडा गावाची सरपंच आहे. साधारणत: गावातील ज्येष्ठांकडे असलेले हे पद भूषवणारी छावी ही भारतातील सर्वात लहान सरपंच आहे. विशेष म्हणजे तिने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून, भारती-टेलि व्हेंचर्समधील आपले वरिष्ठ व्यवस्थापकीय पद सोडून ती इथे आली आहे.
दारिद्य हटवून विकास साधण्यासाठी समाज कशाप्रकारे हातभार लावू शकतो, यावरील दोन दिवसीय चर्चासत्रात छवीने आपले विचार मांडले. विकास साधताना ई-सव्हिर्सेस सारख्या नवीन तंत्रज्ञानाची मदत घेण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय परिषदेतील प्रतिनिधींशी संवाद साधताना ती म्हणाली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६५ वर्षांत भारत ज्या गतीने प्रगती करत आहे, ती गती पुरेशी नाही. आपण अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक वेगाने प्रगती साधू शकतो, असेही ती म्हणाली. गेल्या वर्षभरात सोडा गावातील ग्रामस्थांच्या मदतीने खूप काही बदल घडवल्याचेही छवीने सांगितले.
पुढील तीन वर्षांत गावात आमूलाग्र बदल घडविण्याचे तिचे लक्ष्य आहे. आथिर्क मदत न मागता विविध संस्थांना गावात येण्याचे आवाहन तिने केले. संस्था आणि ग्रामस्थ यांच्यातील दरी मिटवण्याचे काम आपण करू, असे आश्वासनही तिने दिले. 'तुम्ही किंवा मी ज्या प्रकारच्या आयुष्याची सहज अपेक्षा करतो, तसे आयुष्य या पिढीला मिळवून देण्याच्या दृष्टीने परिषदेची मदत होईल, अशी मी अपेक्षा करते,' या उद्गारांनी छवीने सभा जिंकली.
( वृत्तसंस्था)
राजस्थानमधील कॉर्पोरेट सरपंच
http://www.esakal.com/esakal/20110402/5291128858982760664.htm
Saturday, April 02, 2011 AT 11:58 AM (IST)
- छवी राजावत
सरंपच म्हणजे डोक्यावर फेटा, ठराविक पेहराव आणि फारसा शिक्षित नसलेला अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, राजस्थानच्या छवीने ही प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न सुरू केले असून, तिला गावकऱ्यांची साथ मिळत आहे, हे विशेष. "स्वदेस' चित्रपटात शाहरुख खान नासाची नोकरी सोडून भारतात येतो. अमेरिकेची हायफाय लाइफ आणि नोकरी सोडून परतणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटातून "या चिमण्यांनो परत फिरा रे' असाच संदेश दिला गेला. असाच काहीसा अनुभव राजस्थानच्या सोडा गावच्या ग्रामस्थांना येत आहे. व्यवस्थापनाची पदवी असूनही कार्पोरेटची नोकरी करण्याऐवजी राजस्थानच्या सोडा गावची सरपंच बनणारी छवी राजावत ही प्रसारमाध्यमे आणि राजस्थानसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे. छवी राजावत यांचा जन्म राजस्थानचा. राजावत यांनी बंगळूर येथील रिशी व्हॅली स्कूल आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम येथे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेल्या छवी यांनी पुण्यात व्यवस्थापनाची पदवी प्रावीण्यासह घेतली. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध पाच कंपन्यांत काम केले. राजस्थानची कन्या कार्पोरेटच्या "हायटेक' जॉबमध्ये फारशी रमली नाही. कारण तिच्या रक्तात होते राजकारण आणि समाजकारण. कार्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असताना राजावत यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. हा मार्ग नुसता निवडला नाही तर सोडा गावच्या सरपंचदेखील बनल्या. वयाच्या 29 वर्षी सरपंच होणाऱ्या राजावत यांचे आजोबा रघुवीर सिंग यांनी सोडा गावचा कारभार सांभाळला होता. भारतीय खेड्याची ओळख बदलण्यासाठी राजावत यांचे प्रयत्न सुरू असून, सोडा गावाचे संकेतस्थळही विकसित केले आहे. त्यावर 3200 मतदारांच्या गावातील इत्थंभूत माहिती आहेच, त्याचबरोबर गावात राबवण्यात येणाऱ्या योजनांचाही तपशील देण्यात आला आहे. ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत गावात रोजगाराच्या संधी वाढवणे यावर त्यांचा भर राहिला आहे. याशिवाय जयपूर येथे राजावत कुटुंबीयांचा असलेल्या हॉटेलचा कारभारही छवी पाहतात. तसेच घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारी त्यांची स्वतःची शाळा आहे. "ग्रामीण चेहरा बदलला पाहिजे आणि आपण हे करू शकतो,' असा छवी यांना ठाम विश्वास आहे. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या गरिबीसंदर्भातील जागतिक परिषदेत छवी सहभागी झाल्या होत्या. या वेळी त्यांनी गरिबीचा मुकाबला करण्यासाठी "विकासकार्यामध्ये समाजाची असणारी भूमिका' याबद्दल आपले मत मांडले.
- अरविंद रेणापूरकर
No comments:
Post a Comment