फिजाची हत्या की आत्महत्या ?
http://www.prahaar.in/national/68786.html
06 August, 2012 05:05:00 PM
पीटीआय
फॉन्ट साईज
हरियाणाचे पूर्व उपमुख्यमंत्री चंद्र मोहन यांच्याशी लग्न करणा-या अनुराधा बाली उर्फ फिजाचा गुढरित्या मृत्यू झाला आहे.
चंदीगड – इस्लाम
धर्म स्वीकारून हरियाणाचे पूर्व उपमुख्यमंत्री चंद्र मोहन यांच्याशी लग्न
करणा-या अनुराधा बाली उर्फ फिजाचा गूढरित्या मृत्यू झाल्याचे सोमवारी
उघडकीस आले. मोहालीतल्या सेक्टर 48 मध्ये
राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. फिजाने तीन ते चार
दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून फिजा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. आईच्या मृत्यूनंतर फिजा घरी एकटीच राहत होती.
फिजाशी विवाहबद्ध झाल्यानंतर चंद्र मोहनने स्वत:चे नाव बदलून चांद मोहम्मद असे केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत, फिजाशी
दोन वर्षांपासून आपला कोणताही संबंध नसल्याचे चंद्र मोहन यांनी सांगितले.
फिजाच्या शवविच्छेदन अहवालानंतरचं या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
हरयाणाच्या
माजी सहाय्यक महाधिवक्त असताना अनुराधा बाली यांचे चंद्रमोहन यांच्याशी
प्रेम जुळले होते. दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून गुपचूप विवाहही केला
होता. विवाहानंतर अनुराधा यांनी फिझा, तर
चंद्रमोहन यांनी चाँद मोहम्मद ही नावे धारण केली होती. मात्र दोघांमध्ये
वाद निर्माण झाल्यानंतर 2009 मध्ये चंद्रमोहन अनुराधा यांना सोडून आपल्या
पहिल्या पत्नीकडे राहायला आले होते. त्यावेळी या प्रकरणाची देशभर चर्चा
झाली होती.
-----
चंदीगड -
फिजाच्या हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांना अजूनही पुराव्यांचा शोध
लागलेला नाही. पोलिसांनी फिजाचे काका सतपाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले
आहे. तपासादरम्यान फिजाचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये
फिजा आणि तिचा मित्र अजित हुड्डा मोहाली येथील राजश्री रेस्टॉरंटमध्ये
जेवण करण्यास गेले होते. फिजाने या व्हिडिओमध्ये जो ड्रेस घातला होता त्याच
ड्रेसमध्ये ती मृत अवस्थेत आढळून आल्याने याबाबतचे गूढ वाढले आहे.
एक
ऑगस्टच्या मिळालेल्या व्हिडिओ फुटेजनुसार फिजा आणि अजित संध्याकाळी 5
वाजून 47 मिनिटांनी हॉटेलमध्ये आले होते. 6 वाजून 43 मिनिटांच्या सुमारास
फिजा हॉटेलच्या बाहेर पडतांना दिसली, तर अजित फिजाच्या पाच मिनिटांनंतर
हॉटेलच्या बाहेत पडतांना दिसला. बाहेत पडतांना अजितच्या हातात एक कॅरिबॅग
होती ज्यामध्ये खाण्याचे सामान होते. फिजाच्या घरातुन पोलिसांनी ही
कॅरिबॅगही ताब्यात घेतली आहे.
अनुराधा बाली उर्फ फिजाच्या
मृत्यूप्रकरणात नाटृयमय वळण आले आहे. फिजाची हत्या हरियाणाचे माजी
उपमुख्यमंत्री चंद्रमोहन उर्फ चांद यांचा भाऊ कुलदीप बिश्नोई याने घडवून
आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिजाचा मानलेला भाऊ सलीम अल्वी याने हा
आरोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी फिजाच्या घराची कसून झडती घेतली. एका
कपाटात नोटांचे अनेक बंडल आढळले. ते मोजण्यासाठी मशीन मागविण्यात आली
आहे. ही रक्कम किती आहे, यासंदर्भात पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही.
मात्र, एक कोटी रुपये एवढी ही रक्कम असल्याचे सुत्रांनी संगितले. तिच्या
पासबुकमध्ये केवळ 15 हजार रुपयांची नोंद आहे. त्यामुळे तिच्या घरात एवढी
मोठी रोख आली कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
फिजाने
मृत्यूच्या आधी सलीमला फोन करुन संवाद साधला होता. पोलिसांनी फिजाच्या
मोबाईलवरुन केलेल्या कॉल्सचा तपशिल तपासून अल्वी यांना संपर्क केला आणि
त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले.
सलीम अल्वीसोबत
फिजाने 1 ऑगस्टरोजी सुमारे 25 मिनिटे चर्चा केली होती. हे त्या दोघांमधील
अंतिम संभाषण होते. सलीमने यासंदर्भात माहिती दिली की, त्यावेळी फिजा
अतिशय तणावात होती. तसेच ती घाबरलेलीही होती. ती स्वतः असुरक्षित
असल्याचे सांगत होती. त्यावेळी मी तिला दिल्लीत राहण्याचा सल्ला दिला.
तिथे ती सुरक्षित राहू शकेल, असे मी सांगितले होते. दिल्लीतील
मिडीयासमोरही तिची बाजू मांडण्यास तिला सांगितले होते. फिजा 9 ऑगस्ट रोजी
बुलंदशहर येथे जाणार होती. ती बुलंदशहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक
लढविण्याच्या विचारात होती, असेही सलीमने सांगितले.
-------------
होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या
Date: 09-08-2012 18.00 | Views (118)
नई
दिल्ली: दिल्ली की पूर्व एयर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या मामले में
हरियाणा के पूर्व गृह राज्य मंत्री गोपाल गोयल कांडा की अग्रिम जमानत अर्जी
अदालत ने खारिज कर दी है। इसके बाद अब गोपाल कांडा की गिरफ्तारी तय है।
बुधवार को ही दिल्ली पुलिस ने कांडा की गिरफ्तारी के लिए टीमें बनाई थी। जो
हरियाणा में छापेमारी कर रही है। जानकारी के अनुसार कांडा को पहले से ही
जानकारी मिल चुकी थी कि दिल्ली पुलिस उन्हें गिरफ्तार कर सकती है। कांडा
बुधवार को ही अपने गुडग़ांव के घर से निकले थे। गुरुवार को उनके वकील ने
दिल्ली हाईकोर्ट में बकायदा अग्रिम जमानत की अर्जी दी।
जिसका विरोध करते हुए सरकारी वकील ने कोर्ट को बताया कि कांडा के खिलाफ
कई सबूत मिल चुके हैं। कांडा के वकील ने अदालत में अग्रिम जमानत की अर्जी
देते हुए कहा कि गीतिका भ्रमित थी। अगर वो कंपनी छोड़कर जाना चाहती थी तो
इसका मतलब ये नहीं कि कांडा जिम्मेदार हैं। कांडा के वकील ने आगे कहा कि
गीतिका बहुत ही संवेदशील लड़की थी और इसे उनकी मां भी नहीं समझ पाई। गीतिका
ने अपने सुसाइड नोट में इस बात का भी खुलासा नहीं किया कि आखिर कांडा क्या
चाहते थे। गीतिका ने जिस तरह से खुदकुशी की। वो भावनाओं में बहकर और
गुस्से में उठाया गया कदम है।
पिछले छह सालों में गीतिका कई बार कंपनी को छोड़ी और ज्वाइन की। वो बहुत
ही महत्वाकांक्षी थी। वकील ने बताया कि गीतिका खुदकुशी मामले में अरुणा और
कांडा दोनों जिम्मेदार हैं। और दोनों को आमने सामने बिठाकर पूछताछ जरूरी
है। यही नहीं सुसाइड नोट की भाषा से भी साफ है कि कांडा गीतिका के प्रति
गलत नजरिया रखता था। पुलिस के वकील ने बताया कि अभी पोस्टमॉर्टम रिपोर्ट का
भी इंतजार है, ताकि इस मामले में और खुलासा हो सके।
सरकारी वकील ने कहा कि हमारे पास गीतिका के दो सुसाइड नोट हैं, एक 4 मई
और दूसरा 4 अगस्त का है। ये दोनों नोट मौके से मिले हैं। जो कांडा के खिलाफ
सबूत के तौर पर काफी हैं। पुलिस के वकील ने कोर्ट को ये भी जानकारी दी कि
गीतिका के लैपटॉप से एक मेल भी मिला है जिसे अक्टूबर 2010 में एमडीएलआर की
तरफ से भेजा गया था। इस मेल में दुबई से वापस आने की धमकी दी गई थी। वकील
ने ये भी बताया कि इस मामले में 4 मोबाइल फोन सुराग के तौर पर जब्त किए गए
हैं।