बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम : घटस्फोट
दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिल्ली असो वा लखनौ, केरळ किंवा पंजाब, कोलकत्ता किंवा चेन्नई देशातील कुठलेही शहर यापासून बचावले नाही. घटस्फोटाचे प्रमाण जसे उच्च वर्गीय कुटुंबियांत पाहायला मिळत आहे तसेच प्रमाण मध्यम वर्गीयांमध्ये आहे. मेट्रो किंवा सेमी अर्बन भागांमध्येच घटस्फोट होत असल्याचा आरोप होत असला तरी ही वस्तुस्थिती नाही. गेल्या काही वर्षातील या संदर्भात देशाच्या प्रमुख शहरांची आकडेवारी पाहिली तर ही परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणिव होईल.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत 1960 साली दर वर्षाला 1किंवा 2 प्रकरणात घटस्फोट होत होते. 1980 मध्ये हे प्रमाण वाढत वर्षाला 100-200घटस्फोटांर्पयत पोहचले तर नव्वदच्या दशकात वर्षाला हजार घटस्फोट झाल्याचे आकडेवारी दर्शवते. पण गेल्या 10-12 वर्षात हे प्रमाण एकाएकी वाढत वर्षाला 9000 र्पयत पोहचले आहेत.

अशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहराची आहे. मुंबईतल्या कुटुंब न्यायालयात दरवर्षी अंदाजे 7000 घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात. तर वर्षअखेरीर्पयत हा आकडा साडेसात हजाराच्या वर पोहचेल अशी परिस्थिती आहे. कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असलेल्या या अर्जातील सर्वाधिक 60 टक्कयाहून अधिक अर्ज अर्थात साडेचारहजार अर्ज हे 2005 सालात दाखल झाले आहेत. तर 25 ते 23 या वयोगटातील दांपत्यांचे अंदाजे 70 टक्के अर्ज तर 85 टक्के अर्ज हे लग्नाला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या आतच दाखल झाले आहेत.
जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. पण आता हे प्रमाण अचानक का वाढले असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर मॉर्डन लाईफस्टाईल किंवा मॉर्डन सोसायटी हे उत्तर त्यामागे असल्याचे बहुतांश प्रकरणांत दिसून येते. शिक्षणाचे वाढते प्रमाण हे एक कारणही यामागे असल्याचे या क्षेत्रातल्या जाणकारांचे म्हणणे आहे. बदलती सामाजिक परिस्थिती आणि घटस्फोटित मुलगीही समाजात चांगले आयुष्य जगू शकते अशी मानसिकता कुटुंबातल्या इतर सदस्यांची विशेषत: पालक वर्गाची होऊ लागली आहे. पतीसोबतच मुलगीचे आयुष्य बांधिल आहे किंवा त्याच्याशिवाय तिला समाजात जगण्याचा अधिकारच नाही अशी एकेकाळी असलेली कौटुंबिक परिस्थिती बदलली असल्याचा हा परिणाम आहे.
आर्थिक स्वातंत्र - स्वतंत्र विचारसरणी, आणि स्वत:च्या निर्णयामध्ये इतरांची लुडबूड कोणालाच सहन होत नसल्याने, सतत भांडण करत एकत्र राहण्याऐवजी वेगळे राहणे बहुतेक जण पसंत करतात. ‘डबल इनकम नो किड्स’ अशी विचारसरणी स्वीकारलेल्या मध्यमवर्गीय व उच्च वर्गीय कुटुंबियांमध्ये म्हणूनच घटस्फोट घेणे हे खूप कॉमन झाले आहे.
मॉर्डन लाईफस्टाईल - ताण- कामाचे बदलते स्वरूप व त्यानुसार बदलणारी जीवनशैली, कंपन्यांमधील वाढती स्पर्धा,नवे काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची वैयक्तिक व सामाजिक धडपड यामुळे सर्वांमध्ये एक तणाव सतत पाहायला मिळत आहे. रात्री उशिरार्पयत काम करणे, साप्ताहिक सुटीशिवाय काम करणे अशा अनेक कारणांमुळे, घरातल्या सदस्यांसाठी वेळ देता येत नसल्याचे पर्यवसन लग्न संपुष्टात आणण्यार्पयत येत असल्याचेदिसून येत आहे.
एकटेपणा- न्युकलियर फॅमली, लाईफ पार्टनर बेकार असा परिस्थितीत कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचे पालन करताना, होणारी ओढाताण यामुळे बऱ्याचवेळा घटस्फोट घेण्यार्पयत मजल पोहचते. या प्रमुख कारणांशिवाय दापत्यांमध्ये सुसंगतता (कम्पॅटिब्लिटी) घटल्याने, हे प्रमाण वाढल्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयातील उपनिबंधक सविता पांडे सांगतात.
घटस्फोटाचे अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक अर्ज विचारपूर्वक पाहिला तर त्यात निष्ठुरता (क्रुएल्टी), अभित्याग (डेझरशन), छळवणूक (हरेसमेंट) ही दर दोन प्रकरणांमागे समान असल्याचे दिसते. मात्र, गेल्या दोन वर्षात प्रमुख शहरांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमुख कारण कम्पॅटिब्लिटी असल्याचे दिसून आले आहे. अहमपणा- हेका (अॅटिटय़ूड) सोडण्यास नकार दिल्याने, बहुतांश तरुण कपल घटस्फोटाकडे वळत असल्याचे मॅरेज कॉन्सिलर बीना थडानी यांना वाटते.
उदरनिर्वाहाची भूमिका पुरुषाकडे तर स्त्री ने केवळ घरकाम करावे अशी मानसिकता बदलत चालल्याने, व पुरुषांसोबतच स्त्रियांनीही पुरुषांच्या जोडीने कामाला सुरूवात केल्याने, मेल इगो दुखावल्याचे पयर्वसन घटस्फोटात होत असल्याचे दिसत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विकास भदाणे सांगतात.
......
41 टक्के घटस्फोट परस्पर सहमतीने
चट मंगनी पट् ब्याह चा जमाना आता बदलत चालला आहे. चट ब्याह पट तलाक असा चिंताजनक ट्रेंड तरुण पिढीमध्ये सुरू लागला आहे. संसारात मतं पटली नाहीत की एकमताने घटस्फोटाचा निर्णय घेऊन ही जोडपी परस्पर सहमतीनेच कोर्टापुढे जाऊ लागली आहेत. वेळ, पैसा, कटकट वाचविण्यासाठी तू तलाक म्हण, मी कबूल म्हणतो असे सामंजस्याचे धोरण मध्ये आल्यानंतर टक्के जोडप्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाची आकडेवारी सांगते.
बीकेसी येथे असलेल्या फॅमिली कोर्टात 2011मध्ये घटस्फोटासाठी एकूण 5115 याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 2098 याचिका म्हणजेच अंदाजे 41 टक्के याचिका या परस्पर सहमतीने काडीमोड घेऊ इच्छिणाऱ्यांच्या होत्या. 2007 मध्ये हे प्रमाण 37 टक्के होते त्यावेळी 4134 पैकी 1525 याचिका म्युच्युअल कन्सेंटच्या होत्या म्हणजेच गेल्या पाच वर्षात घटस्फोटाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शविते.
मुस्लिम धर्मामध्ये दांपत्यांचे भांडण विकोपाला गेले की तलाक तलाक तलाक असे तीन वेळा बोलून दाखविले की दोघेही वेगवेगळे होतात. कॉन्सिलिंगची कटकट नको, कोर्ट-कचेरी नको, पोटगीची भानगड नको असाच साधासुधा पर्याय मुंबईतल्या तरुण जोडप्यांनाही योग्य वाटू लागला आहे. आमचे पटत नाही म्हणून आम्ही वेगळे होत आहोत असे सांगणारे घटस्फोटासाठी मात्र सामंजस्य दाखवत परस्पर सहमतीने वेगळे होत असल्याचे टाटा इन्स्टिटय़ुट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रा. आशा वाजपेयी सांगतात.
छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून होणाऱ्या वाद विवादात वेळ घालवण्याची इच्छा नसल्याने, नवरा बायको स्वतंत्र कमावते असल्याने घटस्फोट घेतल्यास लोक काय म्हणतील याचा फिकीर न करात, आतल्या आत चरफडत बसण्याऐवजी एकमताने घटस्फोटाचा निर्णय घेतात असे विश्लेषण समाजशास्त्रज्ञ करतात. समाज अधिक समंजस,
वैचारिकदृष्टय़ा परिपक्व होऊ लागल्याचे हे द्योतक असल्याचे समाजशास्त्रज्ञ डॉ. एस. परशुराम सांगतात. घरातले वाद कोर्टात नेऊन तमाशा करण्याऐवजी परस्पर सहमतीने घटस्फोटाचा मार्ग त्यांना अधिक सोपा वाटतो. घरातील भाडणे चव्हाटय़ावर आणू नये ही आपली संस्कृती आहे. चार भिंतीततच हे वाद सोडवण्यासाठी सहमतीने घटस्फोट हा चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे अॅड. मृदुला कदम यांना वाटते.
......
घटस्फोट हाच पर्याय?
काही वर्षापूर्वी घटस्फोट हा शब्द उच्चारणे पाप मानले जायचे. संसारात येणाऱ्या समस्यांवर घटस्फोट हाच शेवटचा मार्ग आहे असे समज पसरू लागल्याने विवाहबंधन पवित्र मानले जात नाही. शशांक (32) संपूर्ण आयुष्य एकत्र कुटुंबात घालवले. कर्मठ पारंपारिक विचारांचा त्याच्या मनावर परिणाम होता, पत्नी सतीसावित्री असावी असे त्याचे मत होते. पण त्याला बायको परस्परभिन्न व स्वतंत्र विचारसरणीची मिळाल्याने शशांकची घोर निराशा झाली आणि त्याने पत्नीला घटस्फोट दिला.
विवाहकरण्यामागे जशी कारणे असतात तरीच कारणे घटस्फोट घेण्यामागेही असतात. शारीरिक छळ व मद्यपानाचे व्यसन या गोष्टी केवळ समाजाच्या कनिष्ठ स्तरातच नाहीत कर मध्यमवर्गीय व उच्चभ्रू समाजाताही आढळतात. स्त्रीकडून त्यागाची अपेक्षा केली जाते. विवाहानंतर तिने आपल्या इच्छा आकांक्षा, पतीच्या व सासरच्या चरणी अर्पित कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या मुली सुरुवातीला यास तयारीही दर्शवतात पण मन मारून
किती दिवस जगायचे या निराशेतून शेवटी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात.
माझा नवरा दररोज शिवीगाळ करतो, दारू पितो, त्याची मला सवय झाली आहे. पण आता याचा माझ्या मुलांवर वाईट परिणाम होईल अशी भीती वाटते. जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा देत असल्या तरी केवळ मुलांसाठी विभक्त होत आहे असे वांद्रे कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी आलेली 40 वर्षाची सुवर्णा सांगते.
विवाहबाह्य संबंधामुळे पतीपत्नीमध्ये गैरसमज वाढतात व या संशयातूनच जोडीदाराविषयी अविश्वास वाढल्याने, असुरक्षिततेच्या भावनेतून घटस्फोटाचा पर्याय स्वीकारला जातो. लैंगिक सुखाची कमतरता हे आणखी एक कारण घटस्फोटासाठी असते. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शारीरीक जवळीक व त्याची अपेक्षा पूर्ण होत नसल्याने, वैफल्यग्रस्त होऊन घटस्फोट घेतला जातो पण त्याचे दुष्पपरिणाम जास्त असतात. व्यक्तिमत्व, कुटुंबावर, मनावर एवढेच नाही तर व्यवसायावरही याचा परिणाम होतो.
..............
काही उपाय-
हाताची बोटे जशी सारखी नसतात. तशीच माणसे सारखी नसतात. त्याचे स्वभाव सारखे नसणार. त्यामुळे पती पत्नी दोघांनीही तडजोड केली पाहिजे. आपली व्यक्तिमत्वे भिन्न आहेत हे गृहित धरले पाहिजे.
परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वामुळे दोघांच्यात मतभेद होणे साहजिक आहे. दोघांपैकी एकाने तरी आपल्या नात्यात इगो येऊ देता कामा नये.
सर्वगुणसंपन्न कोणताच माणूस नसतो. त्यामुळे दोषांवर मात करणे कुणालाच जमत नाही
एकमेकांशी प्रतारणा, छळ करणे वगैरे असे प्रकार-चुका घडतात. पण जेव्हा ती तो आपल्या चुकीचा पश्चाताप करतो तेव्हा त्याने तिने अधिक न ताणता आपल्या जोडीदाराला क्षमा केली पाहिजे. व आयुष्य नव्याने सुरू करायला हवे.
शारीरीक गरजा भागवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण रोजगार मिळवण्यासाठी धडपडतो, त्याप्रमाणेच आनंदी सुखी होण्यासाठी धडपडे पाहिजे.परस्परात येणाऱ्या दुराव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर हा दुरावा नाहीसा करून वैवाहिक जीवन सफल करण्याचा प्रयत्न करायला हवा.
विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला परस्परांच्या स्वभावाची खरी ओळख असायला हवी. आपापल्या गुणदोषांची जाणीव असायला हवी म्हणजे आपल्याला योग्य तो बदल घडवून आणणे दोघांना शक्य होईल
संयम, आनंद, प्रेम, विश्वास असतो असे विवाह नेहमीच आनंददायी ठरतात. अशा जोडप्यांमध्ये भांडणे होतच नाहीत असे नाही. पण परस्पर विश्वासाने त्यांच्यावर तोडगा काढला जातो. व जोडपी पुन्हा आनंदी व उत्साही होतात.
.......
उर्मिला देठे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
घटस्फोटातील सुकरता आणि कुटुंबव्यवस्थेची अस्थिरता
सामाजिक
आरोग्याच्या दृष्टीने घटस्फोट मिळविण्याच्या प्रक्रियेतील बदलांचा
गांभीर्याने विचार व्हायला हवा. घटस्फोटाची प्रक्रिया जलद करणे ही आजच्या
परिस्थितीची गरज बनली असल्याचे बोलले जात आहे. खरंच, परिस्थिती एवढी
बिघडली आहे का, की नातेसंबंध तोडण्याचीही प्रत्येकाला घाई लागली आहे? नाती
जोडण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नांपेक्षा नाती तोडण्याच्या
प्रयत्नांना अधिक महत्त्व प्राप्त झालंय का?
'मॅरेजेस आर मेड इन हेवन, बट मॅन इज रिस्पॉन्सिबल फॉर दि मेन्टेनन्स वर्क' असे म्हटले जाते. लग्ाच्या जोडया वरती स्वर्गात जुळलेल्या असतात किंवा नाही हे नाही सांगता येणार. पण या जोडया तुटण्याचे कारण हे पृथ्वीवरच्या माणसांच्या स्वभावात असते. त्यांनी जर या पवित्र बंधनाची योग्य काळजी नाही घेतली, तर ते तुटायला फार वेळ नाही लागत.
सुदैवाने भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला आणि विवाहसंस्थेला आजही महत्त्वाचे स्थान आहे. तरीही आज आपल्याकडेही काडीमोड किंवा घटस्फोटाची प्रकरणे मोठया प्रमाणावर आहेत. घटस्फोटाचा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीही बायकोला न नांदवणारे नवरे आणि दादल्याचं घर सोडणाऱ्या बायका होत्याच. नंतर कायद्यानेही काही विशिष्ट परिस्थितीत घटस्फोटाची अगतिकता मान्य करून त्यास परवानगी दिली. मात्र यात कोणावरही अन्याय होऊ नये, पीडितास भरपाई मिळावी, घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्याच्या मुलांचा ताबा कोणाला देणे योग्य ठरेल याबाबत विवाह कायद्यात तरतुदी आणि वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या. विवाह कायद्यातील दुरुस्ती सुचविणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. या विधेयकानुसार घटस्फोट मिळवताना कुलिंग ऑफ पिरियडच्या सहा महिन्यांच्या सक्तीच्या कालावधीची अट रद्द करण्यात आली आहे. कुलिंग ऑफ पिरियडचा कालावधी ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असेल. परस्पर संमतीने घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटात परस्परांतील नाते संपुष्टात आल्याची (Irretrievable breakdown of marriage) खातरी न्यायालयाला पटवून दिल्यास दीर्घकाळ वाट न पाहता लवकर घटस्फोट मिळवणे शक्य होईल. नव्या तरतुदीनुसार पतीने याचा आधार घेत त्वरित घटस्फोटासाठी याचिका दाखल केली तर, पत्नी त्यास विरोध करू शकते. मात्र पत्नीने याच आधारावर घटस्फोटाची मागणी केल्यास पती त्यास विरोध करू शकत नाही.
यापूर्वी अनेक स्त्री-संघटना, कायदेतज्ज्ञ यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. घटस्फोट मिळविण्याच्या प्रतिक्षेतील घुसमट यामुळे संपुष्टात येऊन, नकोशा वाटणाऱ्या विवाहबंधनातून लवकर मुक्त होण्याचा मार्ग यामुळे सुकर होईल, असा दिलासा घटस्फोट इच्छुकांना मिळाला आहे. काहींनी हा निर्णय स्त्रीवर्गाची अधिक पाठराखण करणारा असल्याचा तक्रारी सूरही काढला. अर्थात ही बाब खरी आहे आणि त्याची आवश्यकताही आहे. कित्येक शतके पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या आपल्या समाजात आजही पुरुषी वर्चस्वाची पाळेमुळे आहेतच. आपल्या अनेक रूढी स्त्रियांच्या दृष्टीने जाचक होत्या. विशेषत: लग्नाच्या बाबतीत स्त्रीची फसवणूक होण्याचे किंवा तिच्यावर अन्याय होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या कायद्यात स्त्रीवर्गाला संरक्षण देण्याचा प्रयत्न नेहमीच झालेला दिसतो. घटस्फोट आणि मालमत्तेच्या अधिकाराबाबतच्या कायद्यातील या नवीन बदलातही महिलांची बाजू उचलून धरलेली आहे.

शोभा कोकितकर (समुपदेशक, स्त्री-मुक्ती संघटना)
त्वरित घटस्फोट
मिळण्याबाबतची मागणी अनेक स्त्री-संघटनांकडून, लोकांकडून, वकिलांकडून केली
जात होती. घटस्फोटाची प्रक्रिया खूप वेळखाऊ असल्याने अनेकदा ती दोन्ही
बाजूंसाठी त्रासदायक ठरते. पण आता हे दुरुस्तीचे विधेयक आल्यानंतर त्याचे
स्वरूप आणि परिणाम याबाबत सर्वचजण संभ्रमात पडले आहेत. समन्वयाने
घटस्फोटाचा निर्णय घेताना हल्ली जुळवून घेण्याच्या प्रक्रियेचा अभाव हे
कारण प्रामुख्याने दिसते. एकमेकांशी स्वभाव पटत नसेल तर मूल होण्यापूर्वीच
म्हणजे लग्ानंतरच्या सुरुवातीच्या काळातच घटस्फोटाचा पर्याय स्वीकारणे
अशा जोडप्यांना योग्य वाटते. नवऱ्याची व्यसनाधीनता किंवा अन्य वाईट सवयी
लक्षात आल्यासही सुरुवातीच्या काळातच घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. काही
प्रकरणात मात्र लग्नानंतर 10-12 वर्षांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो.
त्यात अनेक कारणे असू शकतात. समुपदेशनाच्या प्रक्रियेत द्विधा मन:स्थितीत
असलेल्या जोडप्याच्या मनात नक्की काय आहे ते आम्ही जाणून घेतो. अनेकदा
त्याद्वारे त्यांच्यातील गैरसमज दूर होतात आणि घटस्फोट घेण्यापासून ते
परावृत्त होतात. मात्र जर ते दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असतील तर
समुपदेशनानंतरही ते आपला निर्णय बदलत नाहीत.
या विधेयकात नवऱ्याच्या मालमत्तेत बायकोचा हिस्सा असेल,
असे म्हटले आहे. मात्र तो किती प्रमाणात असेल हे न्यायालय ठरवणार.
मालमत्तेबाबतच्या या तरतुदीवरही उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याबाबत एका पुरुष संघटनेच्या संकेतस्थळावर एक मजेशीर प्रतिक्रिया होती.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आता नवऱ्याला रिअल इस्टेटमध्ये किंवा तत्सम
पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे किंवा स्वत:ची मालमत्ता तयार करणे धोक्याचे
ठरेल. सध्या स्त्रिया आर्थिकदृष्टया सक्षम बनल्यामुळे त्यांना नवऱ्याच्या
मालमत्तेत हिस्सा देण्याच्या कायद्याबाबत पुरुषवर्ग नाराज आहे. पण आजही
ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया आर्थिकदृष्टया त्यांच्या पतीवर अवलंबून
असतात. शिवाय न्यायालय त्या त्या प्रकरणाला अनुसरून हा निर्णय देणार
असल्यामुळे या मुद्दयाचा विचार न्यायाधीशांनी करणे अपेक्षित असेल. मात्र
नव्या तरतुदीत त्याबाबतचे निकष स्पष्ट केलेले दिसत नाहीत.
सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने घटस्फोट मिळविण्याच्या प्रक्रियेतील बदलांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. घटस्फोटाची प्रक्रिया जलद करणे ही आजच्या परिस्थितीची गरज बनली असल्याचे बोलले जात आहे. खरंच, परिस्थिती एवढी बिघडली आहे का, की नातेसंबंध तोडण्याचीही प्रत्येकाला घाई लागली आहे? नाती जोडण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नांपेक्षा नाती तोडण्याच्या प्रयत्नांना अधिक महत्त्व प्राप्त झालंय का? घटस्फोटाच्या नवीन तरतुदीचे जसे फायदे आहेत, तसेच त्यातील धोकेही लक्षात घ्यावे लागतील. ज्या अन्य आधारांवर घटस्फोटाची मागणी करता येते त्यात बहुतेकदा एक जण पीडित असतो. शारीरिक अथवा मानसिक छळ, विवाहबाह्य संबंध, जोडीदार मनोरुग्ण असेल, किंवा कुष्ठरोग, एड्स यासारख्या दुर्धर आजाराने पीडित असेल आदी आधारांवर कायदेशीर घटस्फोट मागता येतो. पण अनेकदा स्वभाव किंवा सवयी जुळत नाहीत, जोडीदाराच्या छोटयाछोटया गोष्टी पटत नाहीत, छोटे-मोठे घरगुती वाद आदी कारणांवरूनही घटस्फोट मागितला जातो. अशा प्रकरणात परस्परांविषयी खूप गैरसमज असतात. रागाच्या भरात घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. अनेकदा योग्य संवाद आणि पुनर्विचार झाल्यास, जवळच्या व्यक्तीने मध्यस्थी केल्यास अथवा समुपदेशनाने त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन लग्न वाचणे शक्य असते. कुलिंग ऑफ पिरियडचा उद्देश हाच असतो. मात्र या नवीन बदलामुळे ही शक्यता संपुष्टात येईल का?
वर्षा पवार-तावडे (भारतीय स्त्री शक्ती संघटना)

या बदलामुळे लगेच मोठा
परिणाम होऊन घटस्फोटाचे प्रमाण वाढेल असे मला वाटत नाही. कारण आपल्याकडे
अजूनही नाते तोडणे ही फार अभिमानाची बाब मानली जात नाही. जेव्हा दोघेही
घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत ठाम असतात तेव्हा बहुतेकदा प्रगल्भतेने
पूर्ण विचार करून ते या निर्णयाप्रत पोहोचलेले असतात. त्यामुळे त्यात
तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करण्यात काही अर्थ नसतो. त्यातही फार प्रगल्भपणे
विचार न करता घटस्फोटाचे निर्णय घेणारे काही जण असतील. पण त्याचे प्रमाण
फार नसेल.
याआधी कायद्यातील कटकटीची आणि लांबलचक प्रक्रिया
टाळण्यासाठी घटस्फोट घेण्याऐवजी घरगुती तडजोड अधिक सोयीची वाटायची. मात्र
आता ही प्रक्रियाच सहज आणि जलद झाल्यास तडजोडीचा पर्याय डावलून घटस्फोट
घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. आपल्या देशात सध्या
घटस्फोटांचे प्रमाण 1000 मागे 11 असे आहे. म्हणजेच एक टक्क्याहूनही अधिक
आहे. याबाबतीत भारत जगात 10 व्या क्रमांकावर आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये
घटस्फोटांचे प्रमाण 50 टक्कयांच्या आसपास आहे. स्वीडन आणि अमेरिकेत तर हे
प्रमाण 54 टक्कयांवर आहे. रशियात ते 43 तर युकेमध्ये 42 टक्कयांवर आहे. या
देशांच्या तुलनेत आपल्याला भारतातील घटस्फोटाचे प्रमाण अत्यल्प वाटेल. पण
आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास हे प्रमाण किती जास्त आहे ते
लक्षात येईल. 20 वर्षांपूर्वीपर्यंत भारतात 1000 लोकसंख्येमागे 5 घटस्फोट
होत असत. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण सातत्याने वाढत राहिले.
जागतिकीकरणाच्या गतीचा आणि पाश्चात्त्य जीवनशैलीच्या अनुकरणाचा हा परिणाम
आहे. पाश्चात्त्य देशातील कुटुंबव्यवस्थेचे कसे तीन-तेरा वाजले आहेत ते
आपण पाहतो. या देशांतील एकाकी वृध्दापकाळ आणि स्वत:च्या कोशात गुरफटलेले
बालपण आणि तारुण्य हे या अपयशी कुटुंबव्यवस्थेचीच फलश्रुती आहे.
आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास, घटस्फोटाचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या वर्गात दिसते, तर उच्चभ्रू वर्गात. पाश्चात्त्य संस्कृतीच्या सर्वाधिक प्रभावाखाली असणाऱ्या या वर्गात नातेसंबंधांविषयीची संवेदना बोथट झाल्याचे दिसते. घटस्फोट आणि पुनर्विवाह या वर्गाच्या दृष्टीने फार गंभीर समस्या नसतात. मात्र त्यातून निर्माण होणारे मालमत्तेचे, संपत्तीचे वाद ही या उच्चभ्रू वर्गाची समस्या असते. हा वर्ग तसा मूठभर. याउलट निम्न स्तरातील लोकांत कायद्याबद्दलचे अज्ञान अधिक. न्यायालयीन खटल्यांचा खर्च त्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याऐवजी हा वर्ग स्वत:चेच अलिखित नियम तयार करतो. पण देशाची सर्वाधिक लोकसंख्या समाविष्ट असणाऱ्या मध्यमवर्गात अद्यापही घटस्फोट ही सर्वसामान्य बाब नाही. लग्न ही जबाबदारी असल्याचे या वर्गातील घटक मानतो. कुटुंब हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असते. नाती टिकविण्याची धडपड असते त्याची. किंबहुना नात्यांचे अपयश ही सामाजिक स्तरावरही मानाची गोष्ट नसते. त्यामुळेच घटस्फोट म्हणजे त्या दोन व्यक्तींच्या आयुष्यातलेच नाही, तर त्या दोन्ही घरांतील वादळ ठरते.
गेल्या काही दशकात मात्र जागतिकीकरणाने या वर्गात काही बदल झाले आहेत. प्रगतीची चक्रे गतिमान झाल्यामुळे करिअरच्या अनेक नवीन वाटा तयार झाल्या. हाती पैसा खेळू लागल्यामुळे लोक सुखासीन झाले. या धावत्या जगात टिकायचे तर आपणही धावते राहिले पाहिजे, ही मानसिकता वाढत आहे. या धावपळीत जवळच्या माणसांची साथ सुटली तरी त्याचे भान राहत नाही. अन्य नात्यांप्रमाणेच पती-पत्नीतील संवाद हरवत चालला आहे. परस्परांना समजून घेण्याच्या काळात दोघेही करिअर, यश यांच्या मागे धावत असतात. आर्थिक आणि भौतिक प्रगतीची शिखरे पादाक्रांत करताना कौटुंबिक जीवनाकडे दुर्लक्ष केले जाते.
संसार म्हणजे सहनशीलतेचा कस हे या वर्गातील आधीच्या अनेक पिढयांनी अनुभवलेले. मुलांचे संगोपन करताना, त्यांना अधिक चांगल्या दर्जाचे जीवनमान मिळावे यासाठी प्रयत्न करताना पती-पत्नी परस्परांतील वादांना दुय्यम स्थान देत. पण सध्या नवरा-बायको दोघेही कमावणारे. आतापर्यंत घरातील पुरुषांवर अवलंबून असणारी स्त्री आता संसारातील आर्थिक जबाबदारीत समान वाटा उचलू लागली आहे. आपल्यातील क्षमता तिच्या लक्षात आल्याने आपला आत्मसन्मान ती स्वत: जपते आणि इतरांनीही तो दुखावू नये अशी तिची अपेक्षा असते. त्याशिवाय आपल्यावर अन्याय झाल्याची जाणीव झाल्यास, तो सहन करत बसण्याऐवजी त्याविरुध्द न्याय मागणे हे आजच्या स्त्रीला योग्य वाटते. तर दुसऱ्या बाजूला काळाच्या ओघात पुरुषी अहंकाराने सौम्यता धारण केल्याचे दिसत नाही. त्यामुळे घरात छोटया छोटया कुरबुरी सुरू होतात. त्यांचे मोठया वादात रूपांतरण होते. विभक्त कुटुंपध्दतीमुळे दोघांची समजूत घालू शकणारे वडीलधारेही जवळपास नसतात. अशा परिस्थितीत वाद अधिक चिघळले, तर घटस्फोट घेण्यापर्यंत वेळही येते. काळाची गरज म्हणून समाजात काही बदल आवश्यक असतात, पण ते एकंदर कुटुंबव्यवस्थेला मारक ठरणार नाहीत ना? हेदेखील पाहावे लागेल.
मुले झाल्यानंतर आईवडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यास, सगळयात जास्त फरफट होते ती घटस्फोटित जोडप्याच्या मुलांची. मुलांचा ताबा कोणाकडेही असला तरी या छोटयाशा वाटणाऱ्या घटनेने त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होऊ शकते. आई-वडिल दोघांच्याही प्रेमावर त्यांचा हक्क असताना कोणा एकापासून दूर जाण्याची शिक्षा त्यांना सहन करावी लागते. त्याचा मानसिक धक्का त्यांना बसू शकतो. या सगळयाचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, व्यक्तिमत्त्वावर आणि परिणामी त्यांच्या भविष्यावर होऊ शकतो. हा विचार करून तरी घटस्फोट घेण्याऐवजी तडजोडीचा जास्तीत जास्त प्रयत्न झाला पाहिजे.
या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्याचा नक्की फायदा होतोय की त्याचे दुष्परिणामही होतील हे स्पष्ट होईल. खरंतर अजूनही या बदलांबाबत पुरेशी चर्चा होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींप्रमाणेच कायदेतज्ज्ञ, सामाजिक संघटना, समाजशास्त्रातील तज्ज्ञ, समुपदेशक यांचाही समावेश या चर्चेत असला पाहिजे. ही एक बाजू झाली. तर दुसऱ्या बाजूला आधुनिकतेच्या गतिमान चक्रात विवाहसंस्था दुय्यम ठरू नये, तर ती अधिक सुदृढ झाली पाहिजे. यासाठी प्रत्येकाचीच जबाबदारी महत्त्वाची आहे. जोडीदाराची निवड करतानाच योग्य काळजी घेतली पाहिजे. तेव्हाच एकमेकांच्या अपेक्षा, आवडीनिवडी, कौटुंबिक अडचणी समजून घेतल्या आणि त्यानुसार स्वत:त बदल करण्याचा प्रयत्न केला तरी निम्मी लढाई जिंकल्यासारखे आहे. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी विवाहपूर्व समुपदेशनाची मदतही घेता येईल. किंबहुना ती आता महत्त्वाची गरज बनली आहे. लग्नाला मान्यता देणारा कायदा असतो आणि ती रद्द करू शकणाराही कायदा असतो. पण ते टिकवणे हे सर्वस्वी त्या जोडप्याच्या हातात असते. त्यामुळे विवाह म्हणजे नुसतीच तडजोडही ठरू नये. तर त्यात परस्परांविषयी प्रेम, आदर, आपुलकी, थोडी सहनशीलता आणि समजूतदारपणाही असला पाहिजे. विवाहसंस्था टिकली तर आपली कुटुंबव्यवस्था टिकू शकेल. कारण त्यातूनच संस्कारांचे संक्रमण होऊन चांगल्या समाजाची निपज होते.

सपना कदम
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवी
दिल्ली - संपूर्ण भारतात तमिळनाडूमध्ये विधवांचे तसेच घटस्फोटाचे प्रमाण
सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पुढे आली आहे. 2010 मधील
आकडेवारीनुसार तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजेच 8.8 टक्के इतके प्रमाण असून,
सर्वांत कमी प्रमाण (4.1) दिल्लीमध्ये आहे. तर, या दोन्ही प्रकरणात
महाराष्ट्र पहिल्या पाचांमध्ये आहे.
एकूण आकडेवारीनुसार विधवा, घटस्फोटित अथवा जोडीदारापासून वेगळे राहाणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण तीन पट (2.9 टक्क्यांमागे 10 टक्के) जास्त आहे.
भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सात टक्के नागरिक 10 वर्षे वयापुढील आहे. त्यामध्ये सरासरी सात टक्के नागरिक विधवा, घटस्फोटित अथवा वेगळे राहणारे आहेत. "सॅंपल रजिस्ट्रेशन सिस्टीम'चा याबाबतचा अहवाल पूर्ण झाला असून तो शनिवारी (ता. ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सादर करण्यात आला.
आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक अशा काही मोठ्या राज्यांमध्ये विधवा, घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 8.2 टक्के इतके आहे. त्या पाठोपाठ (7.2 टक्के), हिमाचल प्रदेश (7.1 टक्के) आणि महाराष्ट्राचा(7 टक्के) क्रमांक लागतो.
पुरुषामधील विधुर, घटस्फोट आणि पत्नीपासून वेगळे राहण्याचे प्रमाण 3.7 टक्के आहे. पंजाबमध्ये अशा पुरुषांचे प्रमाण 3.4 टक्के असून, मध्य प्रदेशात हे प्रमाण 3.3 टक्के आहे. महिलांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. विधवा, घटस्फोटित महिलांची आकडेवारी पाहिल्यास त्यात कर्नाटकमध्ये 14.2 टक्के, केरळमध्ये 14 टक्के आणि आंध्र प्रदेशात 13.6 टक्के आणि महाराष्ट्रात 11.7 टक्के आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुरुषांच्या तुलनेत अशा महिलांचे प्रमाण तब्बल सहा पट अधिक आहे. हे प्रमाण 1.9 टक्के पुरुषांमागे 11.4 टक्के महिला, असे आहे. किंबहुना, अन्य राज्यातही अशाच प्रकारची तफावत आढळून येते. उदा. आंध्रप्रदेशात 1.7 टक्के विधूर, घटस्फोटित पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण 14 टक्के आहे. आसाम (2.3 टक्के पुरुष, 9.6 टक्के महिला), हिमाचल प्रदेश (3.2 टक्के पुरुष, 10.8 टक्के महिला), केरळ (1.8 टक्के पुरुष, 14 टक्के महिला), महाराष्ट्र (2.4 टक्के पुरुष, 11.7 टक्के महिला), ओडिशा (3.1 टक्के पुरुष, 11.2 टक्के महिला) या राज्यांमध्येही हिच परिस्थिती पहायला मिळते.
दृष्टिक्षेपात - "सॅंपल रजिस्ट्रेशन सिस्टिम 2010'ने केली 2010 मधील विवाहितांची आकडेवारी संकलित.
- 2010 मध्ये 57. 7 लोकांनी विवाह केला.
- अविवाहितांचे प्रमाण 35.9 टक्के.
- जम्मू- काश्मीरमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 45.4 टक्के.
- आंध्र प्रदेशात अविवाहितांचे प्रमाण (30.4) सर्वांत कमी.
- आसाममध्ये 42. 3 टक्के अविवाहित.
- झारखंडमध्ये 38.5 टक्के.
- दिल्लीत 38.4 टक्के अविवाहित.
- महाराष्ट्रात 35.5 टक्के अविवाहित.
- कार्नाटकमध्ये 34.5 टक्के.
विवाह धोक्यात येतो..... 1. लग्नानंतरच्या सुरवातीच्या काही वर्षांत.
2. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तरी ही शक्यता वाढते.
3. पती-पत्नी दोघेही जेव्हा वेगवेगळ्या धर्माचे आचरण करत असतील तर.
घटस्फोटाची कारणे
घटस्फोटाची वरील निरनिराळी कारणे दिसून येतात. त्यात समुपदेशकाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील कारणे सध्यातरी घटस्फोट होण्यामागे प्रामुख्याने दिसून येत आहेत.
उच्चशिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य पूर्वीच्या काळी स्त्रिया फार शिकलेल्या नव्हत्या. गरिबीही आजच्या मानाने पुष्कळ होती. पुरुषाने कमवून आणावे व स्त्रीने घरखर्च भागावून संसार चालवावा असा संसार चालत असे. मग स्त्रियाही घराबाहेर पडल्या. शिक्षण घेऊ लागल्या. उच्च शिक्षणही घेऊ लागल्यात. सामाजिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार 1950-51 मध्ये 40,000 स्त्रिया उच्च शिक्षण घेत होत्या. आज हे प्रमाण 42 लाख आहे. 1950 मध्ये 1000 पुरुषांमागे 14 स्त्रिया उच्च शिक्षण घेत होत्या. आज हे प्रमाण 100 पुरुषांमागे 68 स्त्रिया इतके आहे. प्रत्येक पाच पुरुषांच्या मागे एक स्त्री कमावती आहे. आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीरीत्या वावरताना दिसतात. आज पूर्वीच्या मानाने तरुण-तरुणींच्या हातात पैसाही पुष्कळ प्रमाणात खेळताना दिसतो. त्यामुळे त्यांचे राहणीमान, जीवनमानही उंचावले. समुपदेशकाच्या म्हणण्यानुसार "आयटी' क्षेत्रातल्या जोडप्यांचे घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या म्हणण्यामध्येही वरीलच कारण असावे असे वाटते. आयटी क्षेत्रात भरगच्च पगार असला तरी नोकरीच्या वेळा, कामाचे प्रमाण हे नेहमीच अनिश्चित असते. त्याबरोबर देशा-विदेशात जाणे तसेच नोकरी निमित्ताने बदलीचे प्रमाण खूप असते. या सगळ्या अनिश्चिततेमुळे या क्षेत्रातली जोडपी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात संवादही नसतो. त्यात कामाचा ताण, नोकरीतील बंधने या सर्वांचा शेवट घटस्फोट घेण्यातही होऊ शकतो. तसेच भरगच्च पगारामुळे आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे आमचे एकमेकांवाचून काही अडणार नाही, ही भावनाही वाढीला लागलेली दिसते. कुटुंब न्यायालयात गेली 16 वर्षे कौटुंबिक प्रकरणे हाताळणाऱ्या ऍड सौ. सीमा ढवळे याबाबत बोलताना म्हणाल्या, ""आज मुलींचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावला आहे. आता पैशामुळे स्वतंत्र जगता येतं त्याचबरोबर कुटुंब न्यायालये घटस्फोटित स्त्रीकडे टाकलेली बाई म्हणून पाहण्याचा दृष्टिकोनही बदललाय. त्यामुळे स्त्रियांना घटस्फोट घेण्यात काहीच गैर वाटत नाही.''
अहंकार घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यामध्ये इगो प्रॉलेम हा फार मोठा प्रश्न असल्याचे दिसून येतेय. बिकट झालेल्या परिस्थितीत काही तडजोड होऊन आपला संसार टिकतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा हे पती-पत्नी मी त्याला किंवा तिला कसा धडा शिकवतो, शिकवते? मी कोण आहे हे त्याला किंवा तिला दाखवतोच, दाखवतेच? मीच का म्हणून तडजोड करायची. स्त्री आहे म्हणून का? किंवा मी का नमतं घ्यायचं मी तर पुरुष आहे? याच भांडणात अधिक स्वारस्य मानताना दिसतात. दोघांपैकी एकाचीही तडजोड करायची तयारी नसते. उच्चशिक्षण, पैसा, सौंदर्य, प्रसिद्धी अशा एक ना अनेक कारणांमुळे या पती-पत्नींत अहं भाव निर्माण झालेला असतो. अंदाजे 25 टक्के लग्न या कारणांमुळे मोडतात.
नातेवाइकांची भर घटस्फोटाच्या केसेसचा नीट अभ्यास केल्यास बऱ्याच अंशी हेही जाणवते; की हुंडा, लग्नातला मानपान, दागिने, तत्सम गोष्टीवरून मुलाचे आई-वडील, बहीण हेच मुलाला आपल्या सुनेपासून वेगळे होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. तर काही वेळा माहेरी चैनीत राहिलेल्या मुलीला सासरी जरा काही कमी पडलंय असं वाटलं तर मुलीचे आई-वडील, भाऊ, बहीण हे तिला भांडणास, घटस्फोटास प्रवृत्त करतात. यात त्या दोघांना निर्णयस्वातंत्र्य म्हणून नसते. सगळ्यांना भरीस घालणारे हे नातेवाईक नंतर बाजूला होतात व खऱ्या अर्थाने तोंड द्यावे लागते ते मात्र त्या बिचाऱ्या दोघांना. त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्याकडून हे घटस्फोटाचे पाऊल उचलले जाते.
कामजीवनातील अतृप्ती बऱ्याच वेळा स्त्रीला लैंगिक संबंधाचे स्त्रीपुरुष संबंधाचे पुरेसे ज्ञान नसते. अशा वेळी पुरुषांकडून स्त्रीवर लैंगिक अत्याचार केले जातात. स्त्रीच्या इच्छेशिवाय तिच्यावर शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणे हा एक प्रकारे बलात्कारच आहे. अशा बाबी स्त्रियांना कुठेही व्यक्त करता येत नाहीत. स्त्रियांना नाजूक भागांवर सिगारेटचे चटके देणे, तिला वेदना होत असतानाही तिच्यावर बळजबरी करणे, पाहुण्यांसमोर तिच्याशी अश्लील भाषा करणे अशा अनेक गोष्टी पुरुषांकडून स्त्रियांवर होताना दिसतात. बऱ्याच केसेसमध्ये स्त्रिया हे सहनही करतात. काही वेळा पुरुषांकडून स्त्रियांना मानसिक छळही केला जातो. बऱ्याच वेळा अशा केसेसमध्ये घटस्फोटाशिवाय पर्यायही नसतो. काही वेळा यात पुरुषांत मानसिक विकृतीही असण्याची शक्यता असते.
एकत्र कुटुंबात "एकांत' न मिळणे समुपदेशकाच्या म्हणण्यानुसार पूर्वी वरील कारणांमुळे घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण बऱ्यापैकी होते. परंतु हल्ली एकत्र कुटुंब पद्धती फारशी दिसत नाही. त्यामुळे या कारणामुळे होणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र, एकत्र कुटुंबात राहणाऱ्या जोडप्यांना स्वतःसाठी वेगळा वेळ व एकांत मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. जोडप्यांच्या बऱ्याचशा बाबीत घरातील ज्येष्ठ कुटुंबीयांकडून होणारा हस्तक्षेप हा नवीन सुनेला मान्य नसतो. याचे परिवर्तन अखेर घटस्फोटात होते.
संस्कृतीचा पगडा बऱ्याचदा आंतरजातीय विवाह असेल तर दोन्ही घरच्या रुढी-परंपरा वेगळ्या असतात. काही वेळ दोघेही संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढलेले असतात. जीवनशैलीत फरक असतो. अशा वेळी लग्नाच्या नात्यातून एकत्र येताना या बाबतच्या फरकामुळे दोघांचेही सतत खटके उडू शकतात. दोघेही आपल्या संस्कारांना धरून राहण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांच्या रुढी-परंपरा स्वीकारण्यास त्यांची तयारी नसते. शेवटी याचे रूपंतर घटस्फोट घेण्यात होते.
स्वभावातील वेगळेपणा बऱ्याचदा मुलगा मुलगी दोन भेटींतच वरकरणी एकमेकांना पाहून पत्रिका जमलीय का? हे पाहून घाईने लग्न उरकतात किंवा या बाबतीत खूपदा नीट पाहून, भेटून, पारखून लग्न केले असले तरी लग्नानंतर दोघांच्याही लक्षात येते, की आपला मुलाचा स्वभाव, आवडीनिवडी या फारच भिन्न आहेत. आपले कुठेच एकमत होऊ शकणार नाही. त्यापेक्षा आपण वेगळे झालेले बरे. घटस्फोटासाठी हेही एक कारण आहे.
वयातील अंतर हेदेखील घटस्फोटाचे कारण म्हणून हल्ली समोर येऊ येऊ लागलंय. स्त्री-पुरुषांतील वयाचे अंतर हे लग्नाच्या वेळी बऱ्याचदा 9-10 वर्षे एवढे जास्त असते. त्यामुळे स्त्रीमध्ये पुरुषाच्या वयाला साजेशी अशी विचारांची प्रगल्भता आलेली नसते. त्यामुळे तिच्या वागण्याकडे, बोलण्याकडे पाहण्याचा त्या पुरुषांचा दृष्टिकोन चुकीचा कधीकधी संशयीही असतो. यातून गैरसमज वाढूनही घटस्फोट होतात.
नपुंसकता, व्यसनाधीनता व फसवणूक काही वेळा नपुंसकता हे कारण लपवून ठेवून जोडीदाराला फसवून लग्न केले जाते, तर काही वेळा पुरुषाला दारू, जुगार याचे व्यसन मोठ्या प्रमाणात असते. यातून स्त्रियांवर अत्याचार केले जातात. मारहाण केली जाते. अशिक्षितपणा, नोकरी, रोजगार उपलब्ध नसणाऱ्या किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्गात अशा कारणाने घटस्फोट होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. आजकाल तर उच्चभ्रू लोकांतही हे प्रमाण वाढलंय.
अनैतिक संबंध कामतृप्तीच्या अभावाइतकेच घटस्फोटासाठी वाढते अनैतिक संबंध हेही महत्त्वाचे कारण आहे. एकमेकांवरचा विश्वास, एकनिष्ठता या गोष्टी आजकालच्या काळात "जुनाट' वर्गात येऊ लागल्यात. पाश्चिमात्यांचं अनुकरण नेमकं आपण नको त्या गोष्टीतच करू लागलोय. एकमेकांमधील संवादाचा अभाव, अविश्वास कामाच्या बदलत्या वेळा, ताणतणाव यामुळे स्त्री-पुरुष अनैतिक संबंधाच्या आसरा घेऊ लागलेयत. 14 ते 15 टक्के केसेसमध्ये या कारणाने घटस्फोट घेतला जातो.
वरील सर्व कारणांत समुपदेशकांच्या अनुभवानुसार अहंकार व नातेवाइकांनी भरीस पाडल्यामुळे होणारे घटस्फोट हे सर्वांत महत्त्वाचे कारण असून, इतर सर्व कारणांपेक्षा थोड्या-अधिक प्रमाणात या कारणांमुळे घटस्फोट होताना दिसतात. वरील सर्व प्रकरणांत 15 ते 20 टक्के जोडप्यांत तडजोड होते, हीदेखील स्वागतार्ह बाब आहे. काल बदलला तशा स्त्रियाही सर्व क्षेत्रात यशस्वी होताहेत, उच्च शिक्षण घेताहेत, हीदेखील आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु आज स्त्री-पुरुष नुसते उच्चशिक्षित असणे गरजेचे नाही, तर त्यांनी सुसंस्कृत असणे हे फार महत्त्वाचे आहे. सुशिक्षित असणे व सुसंस्कृत असणे यातली एक पुसट रेषा त्या दोघांनी समजून घेतली, तर घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हायला नक्की मदत होईल. स्त्रियांसाठी कायदे असले तरी ते त्यांच्या संरक्षणासाठी आहेत; गैरवापरासाठी नाहीत याची जाणीव स्त्रियांनीही ठेवायला हवी. त्याचबरोबर स्त्री ही "उपभोग्य वस्तू' आहे, तडजोड-सहनशीलता ही फक्त स्त्रीपाशीच असली पाहिजे ही मानसिकता पुरुषांनीही बदलायला हवी. समाजाला घातक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे मूळ हे मानसिकता बदलण्यात असते. ही मानसिकता बदलली तर समाज निकोप सुदृढ व्हायला वेळ लागणार नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
तमिळनाडूत विधवा, घटस्फोट अधिक..!
- वृत्तसंस्था
Thursday, April 05, 2012 AT 09:51 AM (IST)

No comments:
Post a Comment