आदिवासी जमात' हे वर्णन ज्या ज्या लोकसमूहांना लावण्यात येते. त्या सर्व जमाती आधुनिक काळात, आधुनिकतेची विविध साधने उपयोगात आणीत जगत आहेत. आधुनिक स्वरूपाचे परिवर्तन या जमातीत होताना दिसते. या सर्व गोष्टी विचारात घेता,`आदिमता
म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था' असे मान्य केले तर मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था अवशेषात्मकतेने ज्या समूह जीवनात प्रकटने तसेच वांशिकदृष्टय़ा पृथक (वेगळे) अस्तित्व ज्या समूहाचे जाणवते. त्या समूहांना आदिम असे म्हणता येईल.
आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार आहेत. अगदी प्राचीनातील प्राचीन संस्कृती या आदिम संस्कृतीतूनच निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाचा सहज आणि वैखिक आविष्कार आदिम जीवनात झालेला दिसतो, म्हणून तर भूतमात्रांशी जिव्हाळा आणि त्यांच्याशी अतूट नाते राखत जीवन जगायचे असते, हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालेले असते. आदिवासी हे सांस्कृतिकदृष्टय़ा नागर समाजापेक्षा प्रगत आहेत. माणुसकी, सहकार्याची भावना, त्रियांना समान वागणूक या गोष्टी आदिवासी समाजातच दिसतात. म्हणूनच सांस्कृतिकदृष्टय़ा आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज नाही, उलट आदिवासी संस्कृतीही सर्व जगाला आदर्शभूत ठरणारी आहे. कुसूम अलाम आपल्या कवितेत म्हणतात-
`माणसाला माणूसपण बहाल करण्याची शक्ती
आदिम संस्कृतीचा मूलत्रोत आहे'
वर्षानुवर्षे आदिवासी निसर्ग सान्निध्यात, दर्याखोर्यात, जंगलात, अतिदुर्गम भागात राहात असल्यामुळे भौतिक सुविधा त्याच्यापर्यंत तितक्या झपाटय़ाने पोहोचू शकल्या नाहीत. आज एका बाजूला देशाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत, पण दुसर्या बाजूने देशाला स्वातंत्र्य मिळून 62वर्षे पूर्ण होऊनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, सरकारी योजना या भौतिक सुविधा आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत. दुर्गम भागात राहात असल्यामुळे आदिम समाज नागर समाजापासून दूर राहिला. भौतिक परिवर्तनापासून हा समाज वंचित राहिला, म्हणूनच आदिवासी समाज मागासलेला आहे, तो भौतिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने मात्र तो विश्वाला दिशादर्शक ठरणारा आहे.
आदिवासींच्या विवाहसंस्थेचे स्वरूप हे इतर समाजातील विवाह संस्थेपेक्षा वेगळे आहे. विवाह हे सामाजिक बंधन आहे, यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. आदिवासी त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. आदिवासी समाजात मुलींना देज (वधुशुल्क) दिले जाते. `मुलगी म्हणजे धनाची पेटी' ही त्रीविषयीची उदात्त भावना आदिवासी समाजात दिसते. गारो,खासी या आदिवासी जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धतीही होती. युवक-युवतींना लैंगिक शिक्षण देणारे `गोटुल' सारखे सांस्कृतिक केंद्रही त्यांच्यामध्ये आहे. नवर्याशी पटत नसेल,तर सहजपणे जमातीतील पंचायतीच्या साक्षीने काडीमोड घेण्याचा अधिकार तिला आहे. त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार आहे. त्यामुळे नागर समाजात त्रियांची होणारी घुसमट येथे नाही. जगात सर्वदूर पुरूषप्रधान संस्कृती असताना, आदिवासी समाजात त्रीला विशेष महत्त्व असलेले दिसते. बालविवाह, विधवाविवाह या समस्या आदिवासींमध्ये नाहीत. आपला उदात्त सांस्कृतिक वारसा जपत, सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर सबंध महिलांचे सामंजस्याने प्रबोधन करण्याची आणि त्याचबरोबर त्रीमुक्तीवादी महिलांच्या बाबतीत विधायक वळण देण्याची ताकद आदिवासी महिलांमध्येच आहे.
कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आदिवासींमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यातही त्रियांचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत अत्यल्प आहे. तरीही शिक्षणाचा प्रसार काही प्रमाणात का होईना आदिवासी समाजात झाल्यामुळे आदिवासी त्राही शिकू लागल्या हा आशेचा किरणच म्हणावा लागेल. या शिकलेल्या त्रिया विविध क्षेत्रात, विविध पदावर कार्यरत असलेल्या दिसतात. आज आदिवासी गावांमध्ये महिलांसाठी आरक्षण असलेले दिसते. राजकीय पटलावर आदिवासी त्रीची वाटचाल मंदगतीने सुरू असली, तरी या समाजातील शिक्षित त्रिया प्रत्येक क्षेत्रात सक्षम होऊ शकतात. आज साक्षरतेच्या बाबतीत मिझोरम केरळच्याही पुढे आहे. आदिवासी पुरूषांपेक्षा आदिवासी सुशिक्षित त्रांची संख्या मिझोरममध्ये अधिक आहे. साक्षरतेचे प्रमाणही पुरूषांपेक्षा त्यांच्यात अधिक आहे. म्हणूनच मिझो त्री कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीचे प्रतिक बनलेली दिसते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा आदिवासी मुळातच चपळ, काटक असतो. त्यामुळे मॅरेथॉन, रनिंग, लांब उड्डी, गोळफेक, मल्लखांब या खेळात आदिवासी मुलामुलींना विशेष गती असते त्यांना यासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले तर याही क्षेत्रात ते आपली चमक दाखवू शकतात. आधुनिक शिक्षण आदिवासी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.शेतीनिष्ठ व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे.
डिंक, मध, वनौषधी गोळा करणे, गवताची, लाकडाची खेळणी तयार करणे, वारली चित्रकलेसारख्या कला यासारखे उद्योग आदिवासी महिलांना मिळाले पाहिजेत. त्यासाठी अशा प्रकारचे कोर्सेस सुरू करणे, प्रशिक्षण वर्ग घेणे, या कलांची प्रदर्शने भरविणे, आदिवासी महिलांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे कारखाने काढणे, या हस्तउद्योगाला जागतिक पातळीवर बाजारपेठ मिळणे, जागतिक पातळीवर या कलाकृतींची विक्री व्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे. पारंपारिक शालेय शिक्षणांबरोबर आदिवासी राहात असलेल्या निसर्गाच्या सान्निध्यातील उपलब्ध वस्तूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे व्यावसायिक शिक्षण खर्या अर्थाने आदिवासी महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करणारे आहे.
आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेली आदिवासी त्री घरातील दारिद्रय़ामुळे सावकार, व्यापारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या लैंगिक शोषणाला बळी पडते. शिक्षणामुळे आदिवासी त्री आर्थिक दृष्टय़ा स्वावलंबी बनते. याविषयीचे प्रबोधन प्रौढ साक्षरता अभियानातून, बहिःशाल व्याख्यानांतून या भागात झाले पाहिजे. या व्याख्यानांतून आर्थिक बाबतीतील नवनवीन दृष्टीकोन, भौतिक सुधारणा, आरोग्यविषयी जागृती, सरकारच्या विविध योजना आदिवासी त्रियांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, मात्र येथे आदिवासी त्रियांचे मानसिक आधुनिकीकरण होता कामा नये. महात्मा फुले, कर्वे, अनुताई वाघ यांनी त्रीप्रबोधनाच्या चळवळी सुरू केल्या. याचा परिणाम सर्व थरातील त्रियांवर झाला. आदिवासींमधील शिकलेल्या मुलींवरहे या विचारांचा परिणाम झाला. त्यामुळे या मुली आपल्या उदात्त पारंपरिक संस्कृतीपासून दूर गेल्या. कारण या त्रीमुक्ती चळवळींतून, त्रीवादातून निखळ त्रीवाद विकसित होताना दिसत नाही. त्यातून विकृत लढे निर्माण होताना दिसतात. आदिवासी सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत आहेत. त्यामुळे आदिवासी त्रियांचे अशा तर्हेचे मानसिक आधुनिकीकरण होता कामा नये. फक्त भौतिकदृष्टय़ाच आधुनिकीकरण इथे अभिप्रेत आहे. ही पारंपरिक मानसिकता जोपासत सांस्कृतिकदृष्टय़ा औद्योगिकीकरणाची सांगड घालून औद्योगिक विश्वाकडे आदिवासी त्रियाच नेऊ शकतात.
भारतीय इतिहासात आदिवासी शूरवीरांचे कार्यकर्तृत्व नेत्रदीपक आहे. ब्रिटिशांना सर्वात आधी शह देण्याचे काम आदिवासींनीच केले. आदिवासींचा इतिहास बघितला तर असे दिसून येते की, आदिवासी त्रियांनी राज्यकारभार सांभाळला आहे. ब्रिटिशांविरूद्धच्या उठावांमध्ये आदिवासी त्रियांचा प्रामुख्याने सहभाग राहिलेला आहे. राणी दुर्गावती, राणी हिराईसा, राणी गाईदिनलयु, दशरीबेन चौधरी अशी कितीतरी आदिवासी क्रांतिवीर त्रियांची नावे देता येतील. आजही मणिपूर, ओरिसा, आसाम, त्रिपुरा, नागालँड, झारखंड व महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झालेल्या आदिवासींच्या हक्क व अस्तिमेच्या चळवळींमध्ये पुरूषांबरोबर त्रियांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात दिसतो. देश, देव, धर्म, पारंपरिक संस्कृती, इतिहास यांचा वारसा आदिवासींकडे आहे.ही त्याची मानसिकता कर्मठतेकडे न नेता त्यांच्या संस्कृतीतील मूलभूत उदारतेकडेच वळली पाहिजे. या त्यांच्या संस्कृतीतील मूलभूत उदारतेची आणि भौतिक विश्वासी सांगड आदिवासी महिलाच घालू शकतात आणि या जागतिकीरकरणाच्या युगात आदिवासी महिलाच सर्व विश्वाला बरोबर घेवून जाऊ शकतात.
महाराष्ट्रातच एकूण 47 आदिवासी जमाती आहेत. या जमातीच्या बोलीभाषाही वेगवेगळय़ा आहेत. या बोलीभाषा टिकविल्या पाहिजेत, जागतिक पातळीवर नेता आल्या पाहिजेत. आदिवासींमधील काही बोलींच्या लिपीही आहेत. महाराष्ट्रात आढळणार्या गोंड जमातीत बोलल्या जाणार्या गोंडी भाषेची लिपीही सापडली आहे. आज ठाकर जमातीत बोलल्या जाणार्या बोलीतील कितीतरी शब्द `ज्ञानेश्वरी'त सापडतात. आदिवासी म्हणजे या विश्वाचे मूलाधार. त्यांच्याच भाषेपासून आज अस्तित्वात असणार्या भाषा निर्माण झाल्या आहेत, असे विधान केले तर ते वावगे ठरू नये. बदलत्या काळात आदिवासी भाषांमध्ये बदल झाले. त्या त्या प्रदेशातील भाषेचा प्रभाव त्यांच्या भाषांवर पडलेला दिसतो. आदिवासींच्या बोलीभाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी भाषाकुलांचा विचार होणे महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक पातळीवर कोणती भाषा त्यांच्या भाषेच्या जवळ जाणारी आहे, आदिवासींच्या भाषाकुलाशी समान आहे, जी त्यांना सहज सुलभतेने आकलन होईल. अशा भाषेतून वाङमयनिर्मिती होणे आवश्यक आहे. अशा भाषेतून वैचारिक व ललित अशा दोन्ही प्रकारची वाङमयनिर्मिती होऊन एकूण मानवी विकास साधला जाईल, कारण साहित्य हे समाज परिवर्तनाचे आणि मानवी विकासाचे प्रमुख साधन आहे. आदिवासी त्री लेखिकांनी आदिवासी जीवनातील ही सामर्थ्यस्थळे आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडावीत.
त्री म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ. कुटुंबातील सर्वांचा विकास करण्यामागे त्रीचा मोठा हातभार असतो. एका बाजूला वाढणारी शहरे आणि दुसर्या बाजूला दुर्गम भागात राहणारा उपेक्षित आदिवासी असे परस्परविरोधी वास्तव आजच्या आदिवासी त्रियांपुढे आहे. त्यासाठी आज आदिवासी समाजातील शिकलेल्या महिलांनीच आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करीत, पण भैतिक बदल स्वीकारत जागतिकीकरणाच्या पसार्यात उभे राहण्याचे सामर्थ्य आपल्या पुढच्या पिढीला त्याच देवू शकतात. आपली संस्कृती आणि औद्यागिकीकरण यांची सांगड घालून जीवन जगण्याचे व्यापक परिमाण मिळवून देण्याचे सामर्थ्य आदिवासी त्रियांमध्येच आहे.
No comments:
Post a Comment