Pages

Saturday, February 25, 2012

दिल्ली शहर महिलांसाठी सर्वांत धोकादायक'
-
Saturday, December 10, 2011 AT 12:45 AM (IST)
http://www.esakal.com/esakal/20111210/4817255011453405672.htm

नवी दिल्ली - पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांना भारतातील रस्त्यांवरून फिरण्याची भीती वाटते आणि त्यातही राजधानी दिल्लीमध्ये फिरणे अधिकच धोकादायक आहे, असा निष्कर्ष एका नवीन अभ्यासातून पुढे आला आहे. या अभ्यासादरम्यान दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या महानगरांमधील स्त्रियांची मते अजमाविण्यात आली.
"नेव्हटेक' व "टीएनएस मार्केट रिसर्च' या संस्थांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे, की सर्वेक्षणादरम्यान 51 टक्के महिलांनी रस्त्यावरून फिरताना भीती वाटत असल्याचे सांगितले. 73 टक्के महिलांना रात्रीच्या वेळी एकट्याने रस्त्यावरून जाणे धोकादायक वाटते.
या अभ्यासानुसार 87 टक्के महिलांनी दिल्ली हे सर्वांत धोकादायक शहर असल्याचे म्हटले आहे, तर मुंबई सर्वांत सुरक्षित शहर असल्याचे प्रातिनिधिक मत महिलांनी (74 टक्के) व्यक्त केले आहे. बहुतेक महिला एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्यापूर्वी आपले मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीय यांना संबंधित पत्त्याची विचारणा करून जातात. अनोळखी व्यक्तीला पत्ता विचारणे त्यांना धोकादायक वाटते, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.
चार महानगरांमधील 760 महिलांची मते या अभ्यासादरम्यान घेण्यात आली.

No comments: