Pages

Saturday, February 25, 2012

महिलांसाठी भारत जगात सर्वात वाईट                                            
वृत्तसंस्था | Jun 14, 2012, 04:04AM IST
लंडन - जगातील काही विकसित आणि विकसनशील देशांतील महिलांच्या स्थितीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारत शेवटच्या क्रमांकावर आहे. महिलांबाबत भारतातील स्थिती सौदी अरेबियापेक्षाही वाईट असून असून लैंगिक आधारावर भारतात महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याचे 19 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
थॉमसन रॉयटर्स प्रतिष्ठानने केलेल्या या सर्वेक्षणात शिक्षण, आरोग्य, रोजगार, अत्याचार यासारख्या मुद्यांवर महिलांच्या दर्जाची तुलना करण्यात आली आहे. महिलांची स्थिती जाणून घेण्यासाठी या देशांमध्ये महिलांच्या स्थितीचा अभ्यास करणार्‍या 370 तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 19 विकसित आणि विकसनशील देशांमध्ये करण्यात आले आहे. त्यात भारत, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील, सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात पाकिस्तान आणि बांगलादेश या भारताच्या शेजारी राष्ट्रांचा समावेश करण्यात आलेला नाही.
या सर्वेक्षणात कॅनडा महिलांसाठी सर्वर्शेष्ठ देश ठरला आहे. तेथे महिलांना प्रत्येक बाबतीत समान दर्जा आहे. कॅनडात महिलांचे शोषण आणि अत्याचारापासून बचाव करण्याच्या प्रभावी उपाययोजना आणि आरोग्याची उत्तम देखभाल असल्याचे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. महिलांसाठी उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये र्जमनी, ब्रिटन,ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचा समावेश असून अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे.
महिलांना कार चालवणे आणि मतदान करण्यासारखे मूलभूत अधिकार नसलेल्या सौदी अरेबियापेक्षाही महिलांबाबतीत भारतातील स्थिती वाईट आहे. भारतातील महिलांचा दर्जा संपत्ती आणि सामाजिक स्थितीवर अवलंबून असतो, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. बाल विवाह, हुंड्याची प्रथा, घरगुती अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या आणि भेदभाव ही सर्वेक्षण करण्यात आलेल्या 19 देशांत भारत शेवटच्या क्रमांकावर राहण्याची कारणे सांगण्यात आली आहेत.
काय म्हणते सर्वेक्षण?
भारतात दिल्लीसह अन्य ठिकाणी रस्त्याने चालणार्‍या महिलांना दिवसाढवळ्या कारमध्ये पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला जातो. देहविक्रयासाठी त्यांची तस्करी केली जाते. महिलांवरील अत्याचार आणि शोषणाला समाजमान्यता आहे. जगात महिलांच्या बाबतीत एवढी वाईट स्थिती अन्यत्र कुठेही नाही.
महिला राष्ट्रपती पण.. भारतामध्ये अनेक सुशिक्षित आणि पाश्चिमात्य जीवनशैली जगणार्‍या महिला आहेत. देशाची राष्ट्रपतीही महिला आहे मात्र छोटी शहरे आणि खेड्यातील महिलांची स्थिती आणि या महिलांच्या स्थितीमध्ये कुठेही ताळमेळ बसत नाही. सात वर्षांपूर्वी भारतात करण्यात आलेला घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा हे देशाने टाकलेले पुरोगामी पाऊल आहे. मात्र लैंगिक आधारावर भारतात अद्यापही महिलांचे शोषण आणि अत्याचार सुरू आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये महिलांवरील अत्याचार आणि शोषणाचे प्रमाण अधिक आहे, असे हे सर्वेक्षण सांगते.
क्रमवारी
1. कॅनडा
2. र्जमनी
3. ब्रिटन
4. ऑस्ट्रेलिया
5. फ्रान्स
6. अमेरिका
18. सौदी अरेबिया
19. भारत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांसाठी भारत 'धोकादायक'
16 Jun 2011, 0303 hrs IST 

http://origin.maharashtratimes.com/articleshow/8865293.cms
रॉयटर्स फाऊंडेशनच्या तज्ज्ञांची पाहणी
धोकादायक देशांच्या यादीत चौथा
........
लंडन
जगभरातील अनेक देशांतील महिलांची स्थिती सध्या भयावह असून या यादीत आता भारताचे नावही समाविष्ट झाले आहे . स्त्रीभ्रूणहत्या , बालहत्या आणि मानवी तस्करी यामुळे महिलांसाठी भारत धोकादायक देश ठरला असून या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे . तर हिंसाचार आणि गरिबीमुळे महिलांवर अत्याचार होणाऱ्या अफगाणिस्तानाचा क्रमांक पहिला आहे .
थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने घेतलेल्या तज्ज्ञांच्या कौलानुसार हा निष्कर्ष काढला आहे . बलात्कारच्या भयावह घटनांमुळे कांगो महिलांसाठी या धोकादायक देशांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे . कौटुबिंक हत्याचार , स्त्री - पुरुष भेदाभेद , अॅसिड हल्ल्यांच्या मोठ्या प्रमाणावर घटनांमुळे पाकिस्तान आणि सोमालिया यांचा क्रमांक तिसरा आणि पाचवा आहे . २००९ मध्ये १ कोटी तस्करी झाल्याची नोंद झाली आहे . त्यात प्रामुख्याने महिला आणि मुलींचा समावेश असल्याची माहिती तत्कालिन गृहसचिव मधुकर गुप्ता यांनी दिली आहे . भारतातून मानवी तस्करी अनेकांना फायदा होत असल्याने त्याचे प्रमाण मोठे आहे . मात्र सरकार आणि पोलीस या गुन्ह्यांपासून अजून तरी दूर असल्याची माहिती ग्लोबल प्रेस इन्स्टिट्यूटचे संस्थापक क्रिस्टी हेग्रेनेस यांनी दिली . तर सीबीआयच्या माहितीनुसार २००९मध्ये झालेल्या मानवी तस्करीतून तीस लाख जणी शरीरविक्रय व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत . विशेष म्हणजे त्यापैकी चाळीस टक्के या अल्पवयीन होत्या .
अनेकदा लग्न करण्यास भाग पाडले जाते किंवा कामाला जुंपले जाते , यात लैंगिक गुलामगिरीची प्रकरणही मानवी तस्करीतून घडली आहेत . मात्र या गुन्ह्यांच्या संदर्भात कायदेशीर कारवाईतही दिरंगाई होत असल्याचे मान्य केले आहे . भ्रूणहत्या आणि बालहत्यांमुळे पन्नास लाख मुली ' नाहीशा ' झाल्याचेही यूएन पॉप्युलेशनने दिलेल्या अहवलात म्हटले आहे .
देशातील कलह , नाटोकडून होणारे हवाई हल्ले आणि पारंपरिक समजुती यामुळे महिलांसाठी अफगाणिस्तान हा सगळ्यात भयंकर देश ठरला आहे , असे विमेन चेंज मेकर्स या संस्थेच्या प्रमुख अँटोनेला नोटरी यांनी सांगितले आहे .

 महिलांसाठी धोकादायक देशांत भारत चौथा

E-mail Print PDF

स्त्रीभ्रुण हत्या आणि मानवी तस्करी यामुळे महिलांसाठी धोकादायक असणार्‍या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून, अफगाणिस्तान हा या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
एका जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेची शाखा ‘थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन’ या लंडन येथील संस्थेने पाहणी करुन ही यादी जाहीर केली आहे. अफगाणिस्तान हा सर्वात धोकादायक देश ठरला आहे. त्यानंतर काँगो प्रजासत्ताक, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया यांचा क्रम आहे.
पाच खंडातील २१३ तज्ञांना महिलांसाठी जगातील कोणते देश धोकादायक आहेत याची क्रमवारी करण्यास सांगण्यात आले होते. महिलांना असणारा धोका, शारीरिक इजा, लैंगिक अत्याचार, समाजातील तसेच धर्मातील अनिष्ट प्रथापरंपरा - रुढी – आर्थिक सहभाग आणि मानवी तस्करी या निकषांवर ही क्रमवारी करण्यात आली आहे.
स्त्री भ्रुण हत्या, बालमृत्यू, आणि मानवी तस्करी यामुळे भारत चौथ्या स्थानावर असल्याचे या पाहणीत स्ष्ट झाले आहे आहे. वारंवर होणारे हिंसाचार, अपुर्‍या आरोग्यसुविधा आणि गरीबी यामुळे अफगाणिस्तान हा महिलांसाठी धोकादायक बनला आहे. हुंडय़ासाठी होत असलेल्या महिलांच्या हत्या, ऑनर किलिंग आणि बाल विवाह यामुळे पाकिस्तान या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.
‘भारतातील किमान दहा कोटी लोक मानवी तस्करीत अडकलेले आहेत’ असे केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता २००९ मध्ये म्हणाले होते,  असा उल्लेखही या पाहणीत करण्यात आला आहे.  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २००९ मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 90 टक्के मानवी तस्करी देशांतर्गत आहे. देशात ३० लाख महिलां वेश्याव्यवसायात अडकलेल्या असून त्यात ४० टक्के लहान मुली आहेत. जबरदस्तीने काम करायला लावणे आणि लग्न करायला लावण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दशकात पाच कोटी मुली  स्त्रीभ्रूण हत्या व इतर कारणांमुळे जन्म घेऊ शकल्या नाहीत.

 महिलांसाठी भारत विश्वातील चौथा धोकादायक देश !

देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसच्या नाकर्तेपणाचे फलित !
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2011/06/blog-post_9347.html

नवी दिल्ली, १८ जून - विश्वामध्ये महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो, असे ‘थॉमसन रायटर्स ट्रस्ट लॉ वुमन’ या केंद्राच्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे. यामध्ये अफगाणिस्तान, डेमॉक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगो आणि पाकिस्तान यांचा भारताच्या आधी क्रमांक लागतो.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २००९ मध्ये देशांतर्गत ९० टक्के मानवी तस्करी झाली. या वेळी देशात ३० लक्ष वारांगणा होत्या. त्यातील ४० टक्के लहान मुली होत्या. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोशानुसार गेल्या शतकात भारतात स्त्रीभ्रूणहत्या आणि शिशू हत्या यांच्या पोटी ५ लक्ष मुलींचे बळी गेले.
हा अहवाल बनवतांना ५ खंडांतील २१३ तज्ञांची मते विचारात घेतली आहेत. आरोग्यास धोका, लैंगिक अत्याचार, अन्य हिंसाचार, आर्थिक स्त्रोतांची अनुपलब्धता आणि मानवी तस्करी या सूत्रांवरून हा अहवाल सिद्ध करण्यात आला आहे. २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय सचिव मधुकर गुप्ता यांनी भारतात किमान १० लक्ष व्यक्ती मानवी तस्करीशी संबंधित असल्याचे सांगितले होते.

No comments: