नव-याच्या पगारातील वाटा गृहिणींना

नवी दिल्ली - गृहिणींसाठी एक खुशखबर...फक्त चूल आणि मूल सांभाळणा-या प्रत्येक गृहिणीला तिच्या नव-याच्या प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही टक्के रक्कम त्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे.
आम्ही याबाबत एक सर्वे केला आहे. गृहिणींना ‘काय करतेस’ असा प्रश्न विचारल्यास त्यांचं उत्तर काहीच नाही असं असते. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील महत्वाचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे असं महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तिरथ यांनी सांगितले.
काही स्वयंसेवी संस्थांच्या विचारातून ही संकल्पना पुढे आली आहे. 17 आणि 18 सप्टेंबरला विविध राज्याशी आयोजित केलेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे, असं तिरथ म्हणाल्या.
वास्तविक, घरात गृहिणी जे काम करतात त्यांचा मोबदला त्यांना मिळायला हवा. पण तसं होत नाही. गृहिणींना त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला मिळत नाही. मुलांचं संगोपन, घरं चालवणं ह्या सगळ्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. इतर कमावणा-या लोकांच्या तुलनेत त्यांच्या गुणात्मक कामगिरी वाखाणली जात नाही.
जर त्यांच्या नव-याच्या पगारातील काही टक्के हिस्सा जर गृहिणींना मिळाला तर त्यांच्या घरच्या सर्व जबाबदा-या लिलया निभावू शकतात. हा प्रस्ताव सरकारने मान्य केला तर सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल.त्याशिवाय बेरोजगारांची नेमकी आणि अचूक आकडेवारी मिळायला त्यामुळे मदत होईल. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचलेलं हे महत्वाचं पाऊल आहे, असं तिरथ यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment