चैत्रा
रेडकर
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांसाठी
५०
टक्के
जागा
राखीव
झाल्या
.
परंतु
सर्वच
राजकीय
पक्षांना
राजकीय
घराण्यातील
स्त्रियांशिवाय
इतर
उमेदवार
सापडत
नाही
,
हा
अनुभव
आहे
.
अशा
परिस्थितीत
सत्ता
हळूहळू
झिरपत
सर्वसामान्य
स्त्रियांपर्यंत
पोहोचेल
,
अशा
भरवशावर
निश्चिंत
राहणे
,
हे
परिवर्तनवादी
निष्ठेला
शोभेलसे
निश्चितच
नाही
.
महाराष्ट्रात
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांसाठी
५०
टक्के
जागा
राखीव
ठेवण्याचा
कायदा
तयार
झाल्यानंतर
पहिल्यांदाच
महानगरपालिकांच्या
निवडणुका
होत
आहेत
.
निवडणूक
प्रक्रियेत
स्त्रिया
मोठ्या
संख्येने
सहभागी
होणे
,
हे
भारतीय
लोकशाहीच्या
सर्वदूर
पोहोचण्याच्या
दृष्टीने
निश्चितच
स्वागतार्ह
आहे
.
लोकशाहीचे
भवितव्य
समाजाच्या
विविध
घटकांना
राजकीय
प्रक्रियेत
सहभागी
करून
घेण्याने
सुरक्षित
होते
.
मतदानाचा
अधिकार
जरी
सर्वांना
असला
तरी
निर्णय
प्रक्रिया
जर
ठराविक
लोकांच्या
किंवा
विशिष्ट
समाजघटकांच्या
हातात
राहणार
असेल
,
तर
ती
लोकशाहीला
दुबळी
बनवणारी
बाब
असते
.
लोकशाहीला
केवळ
निवडणूक
प्रक्रियेपुरता
मर्यादित
न
ठेवता
तिला
अधिकाधिक
आशयघन
बनवण्याचा
जो
दूरचा
पल्ला
गाठायचा
असतो
,
त्यादिशेने
प्रवासाची
सुरुवात
लोकशाही
प्रक्रियेत
विविध
समाजघटकांचा
सहभाग
जाणीवपूर्वक
वाढवूनच
होत
असते
.
या
दृष्टीने
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांना
५०
टक्के
जागा
उपलब्ध
होणं
,
हा
महत्त्वाचा
टप्पा
आहे
.
स्त्रियांच्या
सक्षमीकरणाविषयी
आस्था
असणाऱ्याने
या
घटनेकडे
साशंकतेने
बघणे
चुकीचे
ठरेल
.
या
सर्व
प्रक्रियेकडे
उमेदीने
बघण्यातूनच
या
प्रक्रियेत
स्त्रियांसाठी
आश्वासक
अवकाश
निर्माण
करण्याची
शक्यता
आहे
.
याचा
अर्थ
राजकीय
नेते
आणि
राजकीय
पक्ष
स्त्री
सहभागाच्या
किंवा
सबलीकरणाच्या
नावे
जे
जे
करत
आहेत
,
त्याचा
निमूटपणे
स्वीकार
करणे
,
असा
होत
नाही
.
त्याचबरोबर
या
सर्वातून
जे
काही
साधले
नाही
,
त्याचीच
निव्वळ
उजळणी
करत
,
याकडे
उपहासाने
किंवा
निराशेने
बघत
राहण्यातही
काही
अर्थ
नाही
,
कारण
प्रस्थापित
व्यवस्थेत
शिरकाव
करण्याच्या
प्रक्रियेत
वाटाघाटी
/
बार्गेनिंग
अपरिहार्यपणे
येते
.
ज्याच्याशी
बार्गेन
करायचे
आहे
,
त्याचा
उपहास
किंवा
धिक्कार
करून
कसे
चालेल
?
खरेतर
राज्यसंस्थेचे
काय
करायचे
?
हा
भारतातील
स्त्री
चळवळींनाही
अद्याप
न
सुटलेला
प्रश्न
आहे
.
'
धरलं
तर
चावतं
,
सोडलं
तर
पळतं
'
या
म्हणीची
साक्षात
अनुभूती
स्त्री
चळवळींना
राज्यसंस्थेच्या
बाबतीत
वारंवार
मिळाली
आहे
.
१९७०च्या
दशकात
जेव्हा
भारतभरात
विविध
ठिकाणी
बलात्कार
,
हुंडाबळी
यांसारख्या
प्रश्नांभोवती
स्त्री
संघटना
सक्रिय
झाल्या
आणि
स्वायत्त
स्त्री
चळवळ
उभी
राहिली
तेव्हा
राज्यसंस्थेशी
तिचा
संबंध
कायदा
बदलण्याच्या
निमित्त
जेवढा
झाला
तेवढ्या
पुरताच
सीमित
राहिला
.
बिगर
-
राजकीय
,
बिगर
पक्षीय
संघर्षात्मक
कार्य
करण्याची
भूमिका
स्त्री
संघटनांनी
जाणीपूर्वक
घेतली
.
त्यामुळे
या
टप्प्यावर
राज्यसंस्थेविषयीची
जाण
परिपक्व
व्हावी
,
याविषयीचा
कोणताही
गृहपाठ
करण्याची
संधी
स्त्री
संघटनांना
मिळाली
नाही
.
पक्षीय
राजकारण
आणि
निवडणुकांचे
राजकारण
यापासून
अलिप्त
राहत
त्या
स्त्रियांच्या
मुक्तीसाठी
संघर्ष
करत
राहिल्या
.
१९८०च्या
मध्यापासून
जमातवादी
राजकारणाला
तोंड
देता
देता
'
शाहबानो
'
आणि
'
रुपकंवर
'
प्रकरणी
स्त्री
चळवळींची
जी
वाताहत
झाली
त्यातून
मिळालेले
अनुभवही
राज्यंस्थेचे
काय
करायचे
,
या
प्रश्नाचे
समाधानकारक
उत्तर
देण्यासाठी
पुरेसे
नव्हते
.
या
पार्श्वभूमीवर
जेव्हा
स्त्रियांना
न
मागताच
३३
टक्के
आरक्षण
मिळाले
तेव्हा
त्याला
समोरे
कसे
जायचे
हा
पेच
निर्माण
होणे
स्वाभाविक
होते
.
मात्र
त्याही
टप्प्यावरून
आपण
आता
पुढे
आलो
आहोत
.
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
३३
टक्के
आरक्षण
मिळून
दीड
दशकाहून
अधिक
काळ
उलटून
गेल्यानंतर
स्त्री
आरक्षणातून
काय
साधते
आणि
काय
साधत
नाही
,
या
दोन्हींचा
ताळेबंद
आज
उपलब्ध
आहे
.
सर्वच
राजकीय
पक्षांना
राजकीय
घराण्यातील
पत्नी
,
बहिण
,
वहिनी
,
मुलगी
,
आई
यांच्याशिवाय
इतर
लायक
उमेदवार
सापडतच
नाहीत
(!)
हा
सार्वत्रिक
अनुभव
आहे
.
निवडून
आलेल्या
अनेक
स्त्रियांना
केवळ
कागदोपत्रीच
अधिकार
मिळतात
आणि
प्रत्यक्षात
त्यांच्या
घरातील
पुरुषच
सत्ता
सांभाळतो
,
हेही
अनेक
उदहारणातून
सिद्ध
झाले
आहे
.
सुयोग्य
-
सक्षम
स्त्री
उमेदवार
घडवण्यासाठी
आवर्जून
प्रयत्न
करावेत
एवढी
सवड
बहुदा
राजकीय
पक्षांकडे
नसावी
.
आपण
शिबिरे
भरवतो
,
असे
दावे
जे
राजकीय
पक्ष
करतात
त्यांच्या
उमेदवारांच्या
यादीतही
राजकीय
घराण्यातील
महिलांचाच
भरणा
अधिक
दिसतो
.
बंडखोरी
टाळण्याच्या
'
कम्पलशन
'
पोटी
असे
निर्णय
घ्यावे
लागल्याचे
लटके
समर्थनही
अशावेळी
सुटकेसाठी
उपलब्ध
असते
.
डॉक्टरांची
मुले
डॉक्टर
,
नटांची
मुले
नट
होण्याला
जर
विरोध
होत
नसेल
तर
आमच्याच
राजकारण
प्रवेशावर
एवढा
गदारोळ
कशासाठी
,
असेही
आता
राजकीय
घराण्यातील
काही
तरुण
नेते
म्हणू
लागले
आहेत
.
शिवाय
या
सर्वात
हळूहळू
बदल
होईल
,
असे
आशीर्वाद
देऊनही
थोरथोर
नेते
मोकळे
होऊ
लागले
आहेत
.
समताधिष्ठित
समाजनिर्मितीसाठी
पूरक
असलेला
कोणताच
बदल
आपोआप
झाल्याचा
दाखला
इतिहासात
नाही
.
त्यामुळे
हा
बदलही
हळूहळू
आणि
आपोआप
होईल
,
याची
अपेक्षा
बाळगत
राहणे
फारसे
हितावह
ठरणार
नाही
.
कौटुंबिक
पार्श्वभूमीवर
राजकारणात
आलेल्या
स्त्रियांचे
राजकीय
प्रशिक्षण
होईल
.
त्या
इतर
स्त्रियांच्या
राजकीय
प्रशिक्षणाची
जबाबदारी
उचलतील
आणि
मग
झिरपणीच्या
सिद्धांतानुसार
सत्ता
हळूहळू
झिरपत
सर्वसामान्य
स्त्रियांपर्यंत
पोहोचेल
,
अशा
भरवशावर
स्वस्थ
रहाणे
,
हेही
परिवर्तनवादी
निष्ठेला
शोभेलसे
निश्चितच
नाही
.
३३
टक्के
आरक्षणाच्या
तरतुदीच्या
अमलबजावणीनंतर
गेल्या
१७
-
१८
वर्षांत
कौटुंबिक
पार्श्वभूमीमुळे
राजकारणात
आलेल्या
कोणत्याच
स्त्रीला
आत्मभान
आले
नसेल
असे
मानणे
अन्
-
ऐतिहासिक
ठरेल
.
आपल्या
शब्दाला
-
मताला
आपल्या
पक्षात
काहीच
महत्त्व
नाही
,
याची
जाणीव
होणे
,
त्यातून
पुढे
आत्मभान
येणे
आणि
त्यापुढे
संघर्षाला
सिद्ध
होणे
या
निरनिराळ्या
अवस्था
आहेत
.
त्या
अवस्थांमधून
जाण्यासाठी
आवश्यक
असलेले
भावनिक
आणि
राजकीय
बळ
राजकारणातील
स्त्रियांकडे
आजमितीला
आहे
का
,
हा
खरेतर
प्रश्न
आहे
.
राजकीय
पार्श्वभूमीमुळे
राजकारणात
सक्रिय
झालेल्या
स्त्री
नेतृत्त्वाला
जगाने
आपल्याकडे
'
कळसूत्री
बाहुली
'
म्हणून
किंवा
'
नामधारी
नेतृत्त्व
'
म्हणून
पाहणे
अपमानास्पद
वाटत
असेल
.
राजकीय
घराण्यातील
काही
जणी
स्वतंत्र
नेतृत्त्व
देण्यासाठी
संघर्ष
करतही
असतील
मात्र
पक्षनिष्ठा
आणि
भगिनीभाव
यांच्या
संघर्षात
जर
वारंवार
पक्षनिष्ठेचीच
सरशी
होत
असेल
तर
आपल्याला
स्त्रियांनी
त्यांची
प्रतिनिधी
का
समजावे
,
हा
प्रश्न
महिला
नेतृत्त्वानेही
स्वत
:
ला
विचारायला
हवा
.
निवडून
आल्यानंतर
पुरुष
नेते
तरी
पक्षनिष्ठेपेक्षा
मूल्याधिष्ठित
भूमिकेला
अग्रक्रम
देतात
का
,
असा
प्रश्न
विचारला
जाऊ
शकतो
.
मात्र
हाच
तर
मूल्याधिष्ठित
राजकारण
आणि
सत्ताकारणातील
फरक
आहे
!
शिवाय
पुरुष
नेतृत्त्व
जे
जे
करतो
तेच
सर्व
जर
स्त्री
नेतृत्त्वानेही
करायचे
असेल
तर
स्त्रियांना
स्वतंत्र
प्रतिनिधित्त्व
कशासाठी
,
असा
प्रश्नही
यातून
उपस्थित
होऊ
शकतो
.
अशा
प्रश्नांना
सामोरे
जात
स्त्री
आरक्षणाच्या
उद्दिष्टांनाच
आपल्याला
मूठमाती
द्यायची
नसेल
तर
स्त्रियांची
प्रतिनिधी
म्हणून
आपल्यावर
असलेल्या
ऐतिहासिक
जबाबदारीचे
भान
स्त्री
नेत्यांना
विसरून
चालणार
नाही
.
राजकारणात
सक्रिय
असलेल्या
स्त्री
नेतृत्त्वाला
राजकीय
आणि
वैचारिक
बळ
पुरविण्याची
तसेच
त्यांच्या
कामकाजावर
नजर
ठेवण्याची
जबाबदारी
स्त्री
संघटनांवर
आहे
.
स्त्रियांमधून
नवे
राजकीय
नेतृत्त्व
घडविण्याचे
आव्हानही
स्त्री
संघटनांनाच
पेलावे
लागणार
,
कारण
निवडणुका
लढवणे
,
आपल्या
प्रतिपक्षाचे
कार्यकर्ते
फोडणे
आणि
आपापल्या
नेत्यांचे
वाढदिवस
साजरे
करणे
यात
गर्क
असलेले
राजकीय
पक्ष
कार्यकर्त्यांच्या
(
स्त्री
अथवा
पुरुष
दोन्ही
)
जडणघडणीसाठी
विशेष
परिश्रम
घेताना
सर्वसाधारणत
:
दिसत
नाहीत
.
काही
स्त्री
संघटना
ही
मेहनत
अनेक
वर्षांपासून
घेतही
आहेत
.
त्यात
अधिक
सातत्य
आणि
जोर
आणावा
लागणार
,
कारण
स्थानिक
स्वराज्य
संस्थांच्या
पातळीवरील
लढाई
हा
केवळ
पहिला
टप्पा
आहे
.
केंद्रीय
आणि
राज्य
विधीमंडळात
स्त्री
आरक्षणाचे
पेच
तर
अधिकाधिक
गुंतागुंतीचे
आहेत
.
स्थानिक
स्वराज्य
संस्थांच्या
पातळीवरील
आरक्षणात
जातीय
विषमतेचे
किमान
भान
तरी
आहे
.
विधीमंडळातील
स्त्री
आरक्षणाच्या
बाबतीत
आरक्षणांतर्गत
आरक्षणासाठीही
संघर्ष
करायचा
आहे
.
अन्यथा
जातीय
विषमतेकडे
डोळेझाक
करत
स्त्रियांची
एकजिनसी
सबगोलंकारी
प्रतीमा
रेटण्यासाठी
प्रस्थापित
व्यवस्था
तयार
आहेच
.
या
पार्श्वभूमीवर
नेहमी
निवडणूक
लढविणाऱ्या
उमेदवारांकडून
ताई
-
माई
-
अक्का
,
विचार
करा
पक्का
,
xxxx
वर
मारा
शिक्का
,
अशी
घोषणा
ऐकणाऱ्या
मतदारांनीच
महिला
उमेदवारांना
आणि
राजकीय
पक्षांना
ताई
-
माई
-
अक्का
विचार
करा
पक्का
,
असे
आवाहन
करायला
हवे
.
निवडणुकीच्या
रिंगणात
उतरलेल्या
या
ताई
-
माई
-
अक्का
जोपर्यंत
आपण
राजकारणात
कशासाठी
आहोत
,
याची
स्वत
:
शीच
प्रामाणिकपणे
उजळणी
करत
नाहीत
,
तोपर्यंत
जनतेला
खरेखुरे
प्रतिनिधित्व
देण्याकडे
त्यांची
वाटचाल
सुरू
होणार
नाही
.
योगायोगाने
मिळालेल्या
संधीचे
सोने
करायचे
की
माती
,
हे
ठरवण्याचा
अवकाश
एक
प्रौढ
व्यक्ती
म्हणून
आणि
स्वतंत्र
नागरिक
म्हणून
भारतीय
संविधानाने
आपल्याला
दिला
आहे
,
याचे
भान
जरी
ठेवले
,
तरी
मोठ्या
बदलाला
चालना
मिळेल
.
(
लेखिका
एसएनडीटी
महिला
विद्यापीठात
राज्यशास्त्राच्या
प्राध्यापिका
आहेत
.)
No comments:
Post a Comment