महिला कॉन्स्टेबल आत्महत्या:
एपीआय शेखलासह हवालदाराला पोलिस कोठडी
प्रतिनिधी | Sep 11, 2012, 15:45PM IST
औरंगाबाद- लैंगिक छळाला कंटाळून महिला कॉन्स्टेबल संध्या मोरेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाय.एन. शेखसह मुख्य हवालदार एस.व्ही. बोंडलेला कोर्टाने 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संध्या धर्मा मोरे (22, रा. करमाड, मूळ रा. धुळे) हिने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी संध्याने लिहिलेली दोन पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, त्याआधारेच शेख आणि बोंडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून संध्या करमाड पोलिस ठाण्यात कार्यरत होती. 2007 च्या बॅचमध्ये ती पोलिस दलात भरती झाली. तिचे लग्न दीड वर्षापूर्वी झाले असून तिचे पती संदीप कदम दिल्ली येथे सैन्यात जवान आहेत. ती करमाड पोलिस ठाण्यासमोरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहत होती. तिचे वडील धर्मा मोरे (रा.धुळे) तिला भेटण्यासाठी शनिवारी आले होते. रविवारी ते धुळ्याकडे रवाना झाले. त्यानंतर तिने सकाळी दहा वाजता पोलिस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर तेथे बाचाबाची झाल्यानंतर ती तडक घरी गेली व तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. घटनेनंतर पोलिस अधीक्षक ईशू संधू यांनी शेख याला तत्काळ निलंबित केले होते.

No comments:
Post a Comment