स्त्री हक्कांच्या संघर्षासाठी
शांततेचा नोबेल

ओस्लो- महिलांच्या हक्कांसाठी अवरित कार्य करणा-या एलेना जॉन्सन सरलीफ,लेमा बोवी व तवक्कुल कर्मण या तीन महिलांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर झाला.
"जोपर्यंत स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच हक्क व संधी मिळत नाहीत, तोपर्यंत या समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही" असे पुरस्कार समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या हक्क आणि सुरक्षिततेसाठी अहिंसक चळवळीने लढा उभारुन शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल या तिघींचा गौरव केल्याचे शांतता नोबेल पुरस्कार देणा-या समितीने सांगितले.
एलेना सरलीफ या लायबेरीयाच्या राष्ट्रपती आहेत, लेमा बोवी याही लायबेरीयाच्याच नागरिक असून शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. पुरस्कारातील तिस-या भागीदार तवक्कुल कर्मण या येमेनच्या नागरिक आहेत.
सरलीफ (72) यांनी हॉर्वर्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले आहे. आफ्रिका खंडातील त्या पहिल्या महिला लोकनियुक्त राष्ट्रपती असून 2005 मध्ये त्यांची निवड करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लायबेरीयात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण काम केले.सरलीफ यांना पुलित्झर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
लेमॅह बोवी यांनी लायबेरिया मधील ख्रिश्चन आणि मुस्लीम महिलांना एकत्र आणून त्यांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या तिस-या महिला तवाक्कूल करमान या पेशाने पत्रकार आहेत. येमेन मधील विखुरलेल्या महिला पत्रकारांच्या संघटीत करून त्यांना मानवी हक्क मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. करमान या राजकारणातही सक्रीय असून त्यांनी येमनचे अध्यक्ष अब्दुल्ला सलेह यांना पदच्युत करण्यासाठी झालेल्या संघर्षामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
No comments:
Post a Comment