Pages

Wednesday, September 26, 2012

   आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार   


  • आदिवासी जमात' हे वर्णन ज्या ज्या लोकसमूहांना लावण्यात येते. त्या सर्व जमाती आधुनिक काळात, आधुनिकतेची विविध साधने उपयोगात आणीत जगत आहेत. आधुनिक स्वरूपाचे परिवर्तन या जमातीत होताना दिसते. या सर्व गोष्टी विचारात घेता,`आदिमता 
  • म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था' असे मान्य केले तर मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था अवशेषात्मकतेने ज्या समूह जीवनात प्रकटने तसेच वांशिकदृष्टय़ा पृथक (वेगळे) अस्तित्व ज्या समूहाचे जाणवते. त्या समूहांना आदिम असे म्हणता येईल.
  • आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार आहेत. अगदी प्राचीनातील प्राचीन संस्कृती या आदिम संस्कृतीतूनच निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाचा सहज आणि वैखिक आविष्कार आदिम जीवनात झालेला दिसतो, म्हणून तर भूतमात्रांशी जिव्हाळा आणि त्यांच्याशी अतूट नाते राखत जीवन जगायचे असते, हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालेले असते. आदिवासी हे सांस्कृतिकदृष्टय़ा नागर समाजापेक्षा प्रगत आहेत. माणुसकी, सहकार्याची भावना, त्रियांना समान वागणूक या गोष्टी आदिवासी समाजातच दिसतात. म्हणूनच सांस्कृतिकदृष्टय़ा आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज नाही, उलट आदिवासी संस्कृतीही सर्व जगाला आदर्शभूत ठरणारी आहे. कुसूम  अलाम आपल्या कवितेत म्हणतात-
  • `माणसाला माणूसपण बहाल करण्याची शक्ती 
  • आदिम संस्कृतीचा मूलत्रोत आहे'
  • वर्षानुवर्षे आदिवासी निसर्ग सान्निध्यात, दर्याखोर्यात, जंगलात, अतिदुर्गम भागात राहात असल्यामुळे भौतिक सुविधा त्याच्यापर्यंत तितक्या झपाटय़ाने पोहोचू शकल्या नाहीत. आज एका बाजूला देशाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत, पण दुसर्या बाजूने देशाला स्वातंत्र्य मिळून 62वर्षे पूर्ण होऊनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, सरकारी योजना या भौतिक सुविधा आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत. दुर्गम भागात राहात असल्यामुळे आदिम समाज नागर समाजापासून दूर राहिला. भौतिक परिवर्तनापासून हा समाज वंचित राहिला, म्हणूनच आदिवासी समाज मागासलेला आहे, तो भौतिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने मात्र तो विश्वाला दिशादर्शक ठरणारा आहे.

Monday, September 24, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.
भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले.
महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय 
सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना अशक्य !
 
दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. म्हणजेच समाजाने महिलांसाठी सर्मपित केलेला एक दिवस. या दिवशी महिलांचा विकास, त्यांचे सशक्तीकरण या विषयांवर अनेक चर्चा होतात, त्यांच्या विकासासाठी मोठया-मोठया घोषणा होत असतात. परंतु या सगळया प्रयत्नांनंतरही महिलांच्या परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही. यासाठी महिलांनीच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशक्तीकरण कसे होईल ते पाहिले पाहिजे.       
आपल्या कुंभार समाजातील महिला वर्षानुवर्ष घरच्या कुंभार उद्योगात सहकारी म्हणुन काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे की, त्यांच्या सहकार्यामुळेच अनेक वर्ष कुंभार कारागीर आपला व्यवसाय करीत आहेत.सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील स्त्रीच कुटुंबाचा गाडा हाकत असते. मुला-बाळांचे संगोपन, वृध्द मंडळींची देखभाल, घरातील कर्त्या पुरूषांच्यामागे (पती) खंबीरपणे उभे राहणे व महत्वाच्या बाबीत निर्णय घेणे. ही कामे प्रामुख्याने स्त्रीयांनाच करावी लागतात. तरी देखील तिच्या कार्याला नगण्य समजले जाते. म्हणुन आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महिलांना स्वतः सजग राहण्याची गरज आहे. जितक्या मोठया संख्येने महिला आत्मनिर्भर होतील, रोजगार किंवा नोकरी करतील तितक्याच त्या शक्तीशाली होतील. या दिशेने आपण जे पाऊल टाकले आहे, त्यात प्रामुख्याने "महिला बचत गट' हा मुख्य मार्ग समोर आहे. ज्यामुळे महिलांना रोजगार व सन्मान मिळण्यास पर्यायाने त्यांचे सशक्तीकरण होण्यास निश्चितच मदत मिळेल.

Thursday, September 20, 2012


अगतिक स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न  

जयमती दळवी , 

सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या स्वरूपसुंदर शरीराचा शेवट करून घेणाऱ्या नजमाची बातमी वाचली. विविध वर्तमानपत्रांतून या घटनेवर आलेले लेख वाचले आणि मन विषण्ण झाले. ही घटना खरी तर १९७७ सालची; पण आजही ती विषण्णता कमी न होता त्यात भरच पडते आहे. अशा अनेक नजमांचा शेवट थोडय़ाफार फरकाने असाच होत आलेला आहे.. होतो आहे.. आणि असाच पुढेही होत राहणार का? देहविक्रयाच्या नरकातून त्यांची कधीच सुटका होणार नाही का? त्यांना नरकात ढकलणारे दोषी की नरकात पडणाऱ्या त्या स्वत:च दोषी, हे आपण सोफ्यावर बसून आरामात बातम्या वाचणाऱ्या वाचकांनी का ठरवावे? हक्क तरी आहे का आपला? ‘वेश्या’ हा शब्दही तोंडातून काढणे म्हणजे तोंड विटाळून घेणे असे आपल्यातले काही महाभाग समजतात. ‘त्या तसल्या बायका’ असा त्यांचा (कधी केलाच तर) तिरस्कारयुक्त उल्लेख ते करतात. इतकी त्यांना या व्यवसायाबद्दल घृणा वाटते. त्याला व्यवसाय म्हणावे का, हीसुद्धा एक शंका! पण मालाच्या विक्रीबद्दल पैसे घेऊन उदरभरणासाठी केलेला तोही एक व्यवसायच!

मातृत्वाचं मोल 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

तिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्‍वाची माता केलं. ज्यांना आईच्या मांडीचं कधी सुख मिळालं नाही, त्यांना त्यानं माउलीच्या पदरात टाकलं! 
--------


मरिया 15-16 वर्षांची एक किशोरी. तरी ध्यानाच्या कलेत पारंगत. ती ध्यानमग्न असताना तिला दैवी साक्षात्कार झाला. देवाचा दूत तिच्या पुढ्यात उभा राहिला. त्या दैवी दर्शनानं ती शहारली. तो तिला म्हणाला, ""हे कृपापूर्ण स्त्रिये, कल्याण असो. प्रभू तुझ्याबरोबर असो.'' या जगावेगळ्या अभिवादनानं ती गोंधळात पडली. तिला आधार देत देवदूत म्हणाला, ""मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाचा कृपाप्रसाद झाला आहे. तू गर्भवती होशील...तुला पुत्र होईल...'' 
""मी तर कुमारिका आहे. माझं लग्न ठरलं आहे; परंतु झालेलं नाही...हे कसं शक्‍य आहे?'' 
मरियेनं नम्रतेनं विचारलं, ""त्याची चिंता तू करू नकोस. तुला देवाचा अनुग्रह होऊन तुझ्या उदरी देवपुत्र जन्म घेईल...देवाला काहीच अशक्‍य नाही... 

""जशी देवाची इच्छा..'' मरिया उद्गारली. 
""तथास्तु'' असं बोलून देवदूत अंतर्धान पावला. 
मरिया ध्यानातून बाहेर आली...कौमार्यावस्थेत बाळाची चाहूल लागणं समाजाला बिलकूल मान्य नव्हतं. अशा स्त्रीसाठी धर्म-कायद्यानं धोंडमाराची शिक्षा निश्‍चित केली होती. 
।। जिजाऊसाहेब ।।

इंद्रजित सावंत
Sunday, May 13, 2012 AT 03:15 AM (IST)

माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच... 

"जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्‍चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच; शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत असे. 

हे तर महिला दुर्बलीकरणच!

अंतरा देव सेन

सरकारने आणखी एक चूक केली आहे. त्याने एक विचित्र वाटणारा प्रस्ताव मांडला आहे. आता हाऊसवाईफ या नात्याने घरातील कामे करणार्‍या पत्नीला त्या कामासाठी वेतन देण्याची पाळी त्यांच्या पतीराजांवर येणार आहे.'पण हे काही वेतन म्हणता येणार नाही', असा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी केला आहे.'तुम्ही त्याला वेतन म्हणू नका. त्याची संभावना मानधन किंवा अन्यप्रकारे करता येईल.' पण या खुलाशावरून मंत्रिमहोदयांची अस्वस्थता उघड झाली आहे. स्त्री ही गृहलक्ष्मी असते. ती तिच्या पतीची हृदयस्वामिनी असते. तिच्या मुलांसाठी ती सुपरवूमन जशी असते, तसेच सुख देणारी परीसुद्धा असते. ती तिच्या सासूच्या आ™ोत राहणारी कर्तव्यदक्ष सून असते. तसेच घरात आणि बाहेरसुद्धा स्वत:चा वचक निर्माण करणारी मेमसाबदेखील असते. तिला सरकार आता घरेलू कामगाराचे रूप देणार आहे का? ती निव्वळ वेतन घेऊन काम करणारी कर्मचारी ठरणार आहे का?