Pages

Wednesday, May 18, 2011

महिलांच्या ताब्यात .......

महिलांच्या ताब्यात एकतृतीयांश संसद
सकाळ न्यूज नेटवर्क Wednesday, May 18, 2011 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात मायावती आणि दिल्लीत शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जी व जयललिता यांच्या शपथविधीनंतर देशात एकाच वेळी चार महिला मुख्यमंत्री असण्याचा नवीन विक्रम झाला आहे. लोकसभेच्या तब्बल 168 जागा या राज्यात येतात त्यामुळे एकतृतीयांश संसद या चार महिलांच्या ताब्यात गेली आहे.
उत्तर प्रदेशात 80, पश्‍चिम बंगालमध्ये 42, तमिळनाडूत 39, तर दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात आतापर्यंत 13 महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या. यात ममता बॅनर्जी चौदाव्या मुख्यमंत्री असतील. बंगालमध्ये डाव्यांची 34 वर्षांची एकाधिकारशाही त्यांनी संपविली. स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात अडकलेल्या तरीही जनतेमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दाच नसल्याचा दावा करणाऱ्या द्रमुकची तमिळनाडूतील सद्दी जयललिता यांनी संपुष्टात आणली.
प्रतिगामी मानसिकता व जातीवादामुळे टीका उत्तर प्रदेशवर केली जाते. मात्र कॉंग्रेस नेत्या सुचेता कृपलानी यांच्या रूपाने देशातील पहिली महिला मुख्यमंत्री याच राज्याने दिली. 1963 ते 1967 या कालावधीत त्या मुख्यमंत्री होत्या. ओरिसामध्येही नंदिनी सत्पथी (1972-74 आणि 1974-76) यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले. गोव्यात 1973 मध्ये दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर त्यांची कन्या शशिकला काकोडकर यांनी दुसऱ्या मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली. 1979 पर्यंत त्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या. आसाममध्ये कॉंग्रेसच्या नेत्या सय्यदा अन्वर तैमूर 1980-81 या कालावधीत मुख्यमंत्री होत्या. तमिळनाडूत जे. जयललितांच्या आधी त्यांचे राजकीय गुरू आणि अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन एक महिन्याहून कमी काळासाठी (7 ते 30 जानेवारी 1988) मुख्यमंत्री होत्या. जून 1991 मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांना मार्च 2002 ते मे 2006 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.
सर्वाधिक म्हणजेच चारवेळा मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींना मिळाला आहे, तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आहे.पंजाबमध्येही कॉंग्रेसच्या राजिंदर कौर भट्टल 1996-97 मध्ये वर्षभरासाठी मुख्यमंत्री राहिल्या.
बिहारमध्ये 1997 मध्ये पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावे लागल्यामुळे त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या रूपाने बिहारला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली.
महिलांना मुख्यमंत्रिपद देण्यात दिल्लीही अपवाद नाही. भाजप नेत्या सुषमा स्वराज 13 ऑक्‍टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शीला दीक्षित (1998-2003, 2003 ते 2008 आणि 2008 पासून ते आजपर्यंत) आहेत. मध्य प्रदेशमध्येही भाजप नेत्या उमा भारतींच्या माध्यमातून महिलेस मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या डिसेंबर 2003 ते ऑगस्ट 2004 या कालावधीत मुख्यमंत्री होत्या. सती प्रथेमुळे बदनाम राजस्थानातही 2003 ते 2008 मध्ये वसुंधराराजे यांच्या रूपाने महिला मुख्यमंत्री झाली.
पुरोगामी राज्ये पिछाडीवर
बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या "बिमारू' राज्यांबरोबरच ओरिसा, आसाम, गोवा या राज्यांनी महिलांना सर्वोच्चपदी बसविले. मात्र, पुरोगामी म्हणून टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये महिलांना अशी संधी कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ईशान्येकडील राज्ये, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड याही राज्यांचा त्यात समावेश आहे.

Tuesday, May 17, 2011

भारतीय संविधानाने जपलेली मानवी....

भारतीय संविधानाने जपलेली मानवी प्रतिष्ठा
भारतीय संविधानाच्या अनुच्छद 1 अन्वये संघराज्याचे नाव इंडिया अर्थात भारत असे असूनही पूर्वि व सद्याही हिंदूत्ववादी विचारसरणी सर्वोच्चस्थानी मानणारे संघराज्य ""हिंदूस्थान'' म्हणूनच संबोधतात. दिल्ली/राजच्या क्षेत्रात मंत्री म्हणून शपथ घेतांना भारतीय संविधान जे कायद्य़ाव्दारे स्थापित झाले त्यानुसार शपथ घेतात, परंतु कार्यपध्दतीचा अवलंब करताना त्यांना भारत या सर्वसमावेषक शब्दाचा विसर पडून स्वत:च्या धर्माचा उल्लेख करून हिंदूस्थान म्हणतात. जसे हिंदू धर्मीय इतर धर्मीयांचा उल्लेख उणेपणाने करतात तिच कसोटी इतर भारतीय नागरिकांनी मनाशी बाळगून आपला संघराज्याचा उल्लेख हिंदूस्थान ऐवजी भारत असा करतात तेव्हा यात निश्चित मोठेपणा असून तेथे सुज्ञ भारतीय नागरिक आहेत असे म्हटले तर त्यात अतिशोक्तीनाही असे म्हणने योग्य ठरेल.
भारत या शब्दाला फार मोठा इतिहास आहे, कारण पूर्वी समाज हा टोळी टोळीने राहत असे त्यापैकी भारत, तुर्वाष, दृष्य, यदू, पुरू आणि अनु ह्या टोळ्या होत्या असे ऋग्वेदात देखील पहावयास मिळते. सुदासाचा बाप दिवोदास याला भारत लोकांचा माणूस म्हणत असत. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या शब्द प्रयोगातील रचने बाबत ऋग्वेदातील पुराव्याचा आधार घेऊन त्याबाबत सखोल चिंतन करून संघराज्यास ऋषभाच्या 100 पुत्रापैकी वडील असणाऱ्या भरत याच्या नावावरून या अति सुंदर भूमिला भारत भूमी हे नाव मिळाले, हे सिध्द केले कारण थोर राजाच्या दैदिप्यमान कुळात शुद्र सुदास याचा जन्म झालेला होता हे बाबासाहेबांनी शुद्रापूर्वी कोण होते या त्यां
च्या ग्रंथात सर्वबाबींचा उहापोह केलेला आहे तेव्हा आपल्या संघराज्याचे नाव कोणत्यामनाने हिंदूस्थान उच्चारण्या ऐवजी भारतीय संविधानाच अनुच्छेद क्रं 1 अन्वये इंडिया अर्थात भारत असे स्वाभिमानाने उच्चारणे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय सत्ता.
हिंदू ग्रंथानूसार वर्णव्यवस्था अस्तित्वात असतांना समानता कशाला म्हणतात याची बाराखडी प्रमाणे तोंड ओळख करून घेण्याची आवश्यकता देखील कुणाला वाटली नाही, त्यामुळे ते जे वर्तन करतील तीच पूर्व दिशा ठरायची. गौतम धर्म सुमातील आध्याय 10 सुत्रे 50, 58, 59 आणि आध्याय 12, सुत्रेे 1-7 अन्वये समानता पाहणे जसा काही गुन्हाच ठरायचा. शुद्राने वरिल जातींची सेवाच करावी, त्याच्या मोबदल्यात जे मिळेल त्यावर त्याने गुजरान करावी. वरिष्ठ जातींनी खाऊ न जे अन्न शिल्ल्क राहिले असेल तेच अन्न शुद्रांनी खावे. एखाद्या वेळी जर शुद्राने त्रैवर्णिकातील लोकांची जाणून बुजून हेटाळणी कली किंवा त्यांना मारहान केलीतर शुद्रांचे अवयव छाटून टाकावेत, समानेतेच्या भावनेने शुद्र जर इतरांसोबत संभाषण करेल, किंवा रस्त्याने चाललेतर त्याला ठार मारावे अशा प्रकारच्या अज्ञा धर्मगं्रथात असायाच्या व त्यावेळी हिंदूधर्मग्रंथच प्रमाण असायचे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असमानतेवर आधारलेल्या सर्व धर्मग्रंथाचा धिक्कार करून भारतीय राज्य घटनेच्याअनुच्छेद क्रं . 14 अन्वये समानतेचा हक्क बहाल करून राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. हे समानतेचे तत्त्व सर्वांना लागू केल्यामुळे कायद्यापुढे राजा व रंक दोन्ही सारखेच असाल्याचे सिध्द करून स्वत:चा जन्म दिनांक 14 व त्यातील 14 व्या रत्नाचे महत्त्व भारतीय नागरिकांना पटवून दिले.
हिंदूधर्मगंरथानूसार / शास्त्रानूसार वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले असल्यामुळे धर्म, वंश, जात, जन्मस्थान यामुळे उच्च निच्चयता पाळली जात असे त्यामुळे नागरिकांत भेदभाव असायचा सार्वजनिक स्थळे, पाणवठे, उपहारगृहे, सार्वजनिक करमणूकीची स्थाने, स्थाने, रस्ते, स्नानघाट इ. ठिकाणी नागरिकांस समानतेने, स्वातंत्र्याने नैसर्गिक नियमानूसार वावरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास धर्मशास्त्रातील आज्ञेनूसार प्रतिबंध करण्यात आल्यामुळे मानवी प्रतिष्ठा पायदळी तुडविण्यात कर्मठ विचारवादी धन्यता मानीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील धर्मगं्रथाची री ओढणाऱ्या कर्मठांची नाहडी परिक्षा करुन भारतीय संविधानाच्या 15 अनुच्छेदाच्या माध्यमातून धर्म-वंश-जात-जन्मस्थान यास श्रेष्ठ समजणाऱ्यांच्या नाडीत अँटीबायोटीक औषधाचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांच्यातील विषाणूंचही वाढ खुंटवून कायद्यान्वये सार्वजनिक उपहारगृहे, विहिरी, तलाव, इतर पाणवठे, रस्ते, करमणूकीची स्थाने, दुकाने सर्व भारतीय नागरीकांसाठी खुले करून दिलेत. त्यामुळे खुलेआम होणार भेदभाव नष्ट होऊन भारतींय नागरीकांची मानवी प्रतिष्ठा वाढीस लागलेली आहे.
भारतीय भूमित अनेक संत, महात्मे, धर्मपारायण करणारे, धर्मग्रंथ निर्माते, धर्मसंस्थापक जन्मास आलेत संपूर्ण आयुष्य धर्म कार्यांत केल्याच्या स्मृती मागे निर्वाण पावले, परंतु त्यांचा उपदेश आत्मा आणि ईश्र्वर भक्तीच्या परिधा बाहेर न आल्याने त्यांची दृष्टी गांवकुसाबाहे राहणाऱ्या बहिष्कृतांवर होणाऱ्या अन्यायावर कधिच पडळीनाही, जर पडलीच असेल तर अपवादात्मक प्रसंगी व अपवादात्मक व्यक्तीच्या रूपाने आजही इतिहासाची पाने चालून पाहिली तर आन्यायााचा आलेख हा उंचावत गेल्याचे पुरावे जिवंतपणाची साक्ष देवून जातात. त्यामुळे बहिष्कार समाज हा नैसर्गीक दृष्टया जिवंत असूनही म्हतावस्थेत जीवन जगत होता. कारण त्यांना अस्पृश्य संबोधल्यामुळे त्यांचा इतर समाजांशी मानविय दृष्टीकोनातून संबंध तुटलेला होता. त्यामुळे तो समाज अस्पृश्यतेच्या साखळदंडाने जोखडून ठेवलेला होता, याच अस्पृश्य समाजात जन्मलेला डॉ. भिमराव रामजी आंबेडकर या महामानवाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रं. 17 अन्वये भारतीय समाजाला अस्पृश्यतेची लागण झालेल्या मनावर कायमची जालीम औषधोपचार करून अस्पृश्यता पाळणे, तिचे समर्थन करणे इ. बाबतीत कायद्यानूसार शिक्षणास अपराधाची तरतूद करूनअस्पृश्यता कायमची नष्ठ केली त्यामुळे तर सद्य परिस्थितीत स्वत:स उच्च् वर्णीय समजणाऱ्याने एखाद्यास जातीवाचक शब्दाने अपमानीत केल्यास ऍट्रासिटी सारख्या कायद्याचा आधार घेवून त्यास निळ्या आभाळाकडे समानतेचे पाहाण्यचा दृष्टीकोन लक्षात आणून दिल्याने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंंबेडकर व भारतीय संविधान यांचे मोठेपण लक्षात आल्यावाचून रहात नाही.
"मजहब वहि सिखाता आपसमें बैर रखना' याचा निश्चित असा अर्थ, धर्म एक दुसऱ्यात रामत्व पाहण्यासाठी शिकवित नाही असा होत असल्यामुळे धर्म म्हणजे काय? हे तपासून पाहण्यासाठी त्या धर्माचे तत्त्वज्ञान ज्या धर्मग्रंथात साठविलेले आहे व त्या तत्त्वज्ञानाच पकड सर्वसामान्य जनतेवर असल्याने ती जनता त्या धर्मग्रंथातील आज्ञे प्रमाणे एक दुसऱ्या सोबत जे वर्तन करते त्यावर निश्चितच अवलंबून आहे. धर्मएकमेकांत शमत्व ठेवण्यास शिकवित नाही असे मोघमपणाने जर ग्राहय धरले तर मग मनुस्मृती मधील आज्ञेव्दारे जेथे शुद्रांचे राज्य असेल तेथे राहूनच, आधार्मीक लोकांच्या मेळाव्यात राहू नये. अत्यंत लोकांपासून दूर दूर रहावे. शुद्राला बुध्दी विद्या ज्ञान देवू नये. त्याला उष्टेसुध्दा देवू नये किंवा यज्ञातील अन्न देवू नये, धर्मोपदेश करू नये. जर एखाद्या शुद्राने द्रोहवश जातीच्या नावाने कोेण्या ब्राम्हणाला काही म्हटलेतर अग्निमध्ये लाल केलेली दहाबोटे लांबीची सळई त्याच्या तोंडात घालावी. जर एखाद्या शुद्रगर्वोध्दत होवून ब्राम्हणांना धर्मोपदेश करण्याचा उध्दटपणा करतील तर राजोन त्याच्या तोेंडात व कानात उकळते तेल टाकून घ्यावे. अज्ञा प्रकाराच्य अमाानविध आज्ञा धर्मग्रंथात आचरणाता आणण्यासाठी का? म्हणून दिल्यात याबाबत आजतायागत कुणीही विचार केलेला दिसन नाही परंतु याच्या उलट, धर्मग्रंथातील आोप्रमाणे वागायचे व पोपटपंची प्रमाणे "मजहब नहि सिखात आपसमें बैर रखना' ही ओळ देखील गळाबसे पर्यंत आळवित रहायचे यातून एकच स्पष्ट होते की, शुद्र ही देखील मानसेच असून त्यांच्या सोबत मानवीय वृत्तीतून वागण्याचा धर्मगं्रथातील तत्त्वज्ञाने उपदेश केलेले दृष्टीस पडत नाही. धर्माचा उद्देश सर्व माणसे सुखी व्हावीत असा असून प्रत्येक व्यक्क्तीस धर्माप्रमाणे आचरण करुन सुज्ञ व्हावे असा असूनही धर्मग्रंथातून विशिष्ट समाजाचेे हित जोपासून इतरांवर अन्याय केल्याने ते अज्ञानी, निर्ध, धर्म असूनही धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा नसल्याने युगानुयुगे पाखंडी म्हणूनच जगळीत. याच समाजात निसर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा युगपुरूष जन्माला घातला व नियतीचा खेळ खेळून त्यांच्याच हातून धर्मगं्रथाना प्रमाण न मानता देशाचे सर्वोत्तपरीने हित साधणारे भारतीय संविधान लिहून घेण्यात आले असून त्यातील अनुच्छेद क्रं . 25 प्रमाणे धर्मस्वातंत्र्याचा हक्क बहाल करून त्यान्वये सार्वजनीक सुव्यव्यस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदीच्या अधिनतेने सद्सद्विवेक बुध्दीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्वच व्यक्ती सारखाच हक्कदार असल्याची देण दिलेली असून अनुच्छेद क्रं. 26 अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या अधिनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यंाच्या पैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजना करीता संस्थाही स्थापना करून त्या स्वखर्चाचे चालविण्याचा, धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा हक्क बहाल केला आहे.
गतकाळात बऱ्याच चुका झाल्या आहेत कारण त्यावेळी सर्वांसाठी एकच आचारसंहिता असलेला, स्वातंत्र्य, समता, बंधुभावाने ओतप्रोत भरलेला ग्रंथ नव्हता, आज घडीला आपल्याकडे राजापासून तर रंकापर्यंत सर्वांना नैसर्गीक दृष्टीकोनातून समानतेने पाहणारा भारतीय संविधान हा गं्रथ आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की, काळाच्या पडद्याआड गेलेल्या चुका विसरून जाऊन गीतकार शांताराम वाघमारे यांच्या कालच्या घडल्या, घडूनी दडल्या आज नको त्या चुका, रथा समतेचा हाका या गिताच्या ओळी अगदि मनापासून गुणगुणत राहिल्यास निश्तिच भारतीय माणसांची मने प्रसन्न राहून निर्मळ, स्वच्छंद पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे प्रवाहीत राहतील........
-पट्टेबहादुर वसंत

सत्यशोधक मार्क्सवादी चळवळ

सत्यशोधक मार्क्सवादी चळवळ
इतिहासलेखन म्हणजेे केवळ घटनांची वा सनावळयांची जंत्री नव्हे, इतिहास म्हणजे घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी करणे आणि ही मांडणी अधिक वास्तवदर्शी करण्यासाठी विशिष्ट अशा सम्यक अन्वेषणपध्दतीची गरज असते. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील इतिहासलेखनाबाबत लिहितात संबंधित इतिहासविषयावर इतिहासाने किती संदर्भ पुस्तके अभ्यासली आहेत यावर त्याचे पांडित्य व अधिकार ठरविला जातो. ते आवश्यक आहेच पण हे शेवटी कच्चा माल गोळा करणे आहे. त्यावर निष्कर्षात्मक प्रक्रिया इतिहासज्ञाने कोणत्या अन्वेषणपध्दत केली आहे. याकडे अभ्यासकांचेही दुर्लक्ष होते. किंबहुना वापरलेली अन्वेषणपध्दत संबंधित इतिहास विषयांचे सम्यक विवरण करू शकते की नाही ? याकडेच दुर्लक्ष होते. इतिहासज्ञाची अन्वेषण पध्दत जर सम्यक नसेल, तर तो संबंधित इतिहास विषयावर आपली मते लादतो किंवा आपल्या मतांना छेद देणाऱ्या ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करतो.
मार्क्सवादाने
इतिहासाची मंाडणी ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधाराने केली. खाजगी मालमत्तेच्या उदयापासून जगाचा इतिहास हा शोषक - शासक व शोषित- शासित यांच्यातील वर्गसंघर्षाचा इतिहास आहे हे मार्क्सवादाचे प्रधान प्रतिपादन आहे. पारंपरिक मार्क्सवादी इतिहासतज्ञ शोषण- शासनाची एकमेव भौतिक संस्था वर्ग हीच मानतात. त्यामुळे भारतीय संदर्भातील बुध्दपूर्व वर्ण व बुध्दोत्तर जात या संस्था देखील वर्गाचीच रूपे आहेत व या संस्था शोषणाच्याा भौतिक संस्था नसून त्यांचे स्वरूप केवळ मानसिक आहे असे ते आग्रहाने प्रतिपादन करतात. भारतीय समाजात बुध्दपूव काळात वर्णसंघर्ष व बुध्दोत्तर काळात जातीसंघर्ष झाल्याचे नाकारून केवळ वर्गसंघर्ष झाल्याचे ते प्रतिपादन करतात.
म. फुल्यांनी भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी केली. त्यांच्या वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दतीनुसार भारतीय इतिहासातील संघर्ष ब्राह्मणाची उच्चजाती व शुद्रातिशुद्र जातीजमाती यांचा राहिला आहे.
शरद पाटील यांनी मार्क्सची वर्गलक्षी अन्वेषण पध्दत व फुले - आंबेडकरांची वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दत या दोघांनाही विधायक नकार देउन बहुप्रवाही अन्वेषणपध्दतीची मांडणी केली. या अन्वेषणपध्दतीच्या आधारे भारतात शोषण- शासनाच्या वर्गेतर संस्थाबाबत त्यांनी मांडणी केली. भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाचे पुढील सुत्र त्यांनी मांडले. वसाहतपूर्व भारतीय समाजात वर्ग नावाची संस्था नव्हती. तर भारतीय सामंत शासक वर्ग लष्करी व पुरोहित जातींचा बनलेला होता तर शासित वर्ग हा शुद्र शेतकरी, कारूनारू जाती व जमाती यांनी बनलेला हेाता. त्यामुळे मध्ययुगीन भारतीय संघर्ष हा या दोन जातीगटांतील जातीसंघर्ष होता हे वास्तव शरद पाटील पुुढे आणतात.
ब्राह्मणी इतिहास लेखन प्रवाहाने मध्ययुगीन संघर्ष हा हिदूं- मुस्लिम यांच्यातील धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे असे प्रतिपादन केले. मार्क्सवाद- फुले- आंबेडकरवाद प्रणित बहुप्रवाही अन्वेषण पध्दती मध्ययुगातील राजकीय संघर्षाचे स्वरूप हिंदू व मुस्लिम यांच्यातील धार्मिक व राजकीय संंघर्षाचे नाही हे वास्तव पुढे आणते. मध्ययुगीन भारतीय सामंत राज्यकर्त्यांचा सोपान हा स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण यांपासून बनलेला होता. मध्ययुगातील प्रधान सत्ता ही तुर्कमुगलांची होती. तर या सत्तेचे दुय्यम स्तरावरील भागीदार हे स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण हे होते मध्ययुगीन समाजातील प्रमुख संघर्ष शासक- शेाषक तुर्क - मोगल व ब्राह्मणवादी उच्चजाती एका बाजूला व त्यांच्या विरोधात शासित- शोषित हिंदू- मुस्लिम धर्मीय शेतकरी- कारागीर - शूद्रातिशूद्र जाती असा होता हे माफुआंचे प्रतिपादन आहे.
शरद पाटलांनी शिवाजीला एका बाजूला पुरोहित वर्ग वर्चस्वाविरोधात व दुसऱ्या बाजूला वतनदारांविरोधात द्याव्या लागलेल्या संघर्षाची मांडणी केली आहे.
सतीशचंद्र यांच्या मीडिव्हल इंडिया: सोसायटी, दि जागीरदारी क्रायसिस ऑफ दि व्हिलेज या ग्रंथाचा हवाला देउन शरद पाटील सांगतात की मोगल साम्राज्याचे अरिष्ट हे जातीव्यवस्थेचे अरिष्ट होते. मोगल साम्राज्य कोसळायचे कारण हे पडीत जमीनी अफाट असूनही स्थानिक बिगरशेतकरी जाती मिरासदार जातींच्या जातपंचायतीच्या परवानगीअभावी त्या जमीनी कसू शकत नव्हत्या. अशा काळात शिवाजीचे क्रांतीकार्य म्हणजे त्याने अस्पृश्य जाती व आदिवासी जमातींना शेतकरी जाती बनविले. ग्रॅंट डफ यांच्या महारट्टाज या ग्रंथाचा दाखला देउन ते लिहितात की कुणबी व मावळातील कोळी इ. आदिवासी शिवाजीच्या निशाणाखाली मराठा बनण्यासाठी जमा झाली. कोळयांना सांगण्यात आले त्यांनी अस्थायी शेती सोडून स्थीर शेती केली तर त्यांना मराठा कुणबी बनता येईल.
मध्ययुगात वतनदार हे रयतेकडून जमीन महसूल गोळा करून राजाकडे पेाहचवण्याचे काम करीत. शिवाजीने या वतनदारांना वेसण घालण्याचे काम केले असे शरद पाटील प्रतिपादीत करतात. वतनदारांनी रयतेला नागवू नये, जोरजुलूम करू नये यासाठी मलिकंबरने त्यांचेवर जरब बसवली होती. हे वतनदार ब्राह्मण वतनदारांशिवाय जनतेवर जुलूम करू शकत नसत. त्यामुळे मलिकंबरच्या कमी आकारणी असलेल्या जमीनधारापध्दतीच्या अंमलबजावणीतून वतनदार व ब्राह्मण वतनदार यांचे हितसंबंध धोक्यात आले हेाते असे समाजशास्त्रीय विश्लेषण शरद पाटील यंानी पुढे आणले आहे.
शिवाजीचे सैन्य हे बिगरशेतकरी जातींपासून बनले होते. शिवाजीच्या अभेद्य शक्ती असलेल्या किल्ल्यांवरील शिबंद्या अस्पृश्य - आदिवासींनी बनल्या होत्या. अतिशूद्र जातींना शेतकरी वा क्षत्रिय जाती बनवण्याची ही कृती वतनदार जातींच्या हितसंबंधांना व एकूणच जातिव्यवस्थेला तडे देणारी हेाती.
भारतीय समाजव्यवस्थेचा कालपट हा स्त्रीसत्ताक गणसमाज, वर्णसमाज, जातीसमाज ते जातवर्गसमाज असा स्थीत्यंतरीत झाला आहे हे शरद पाटलांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आहेे. स्त्रीसत्ताक समाज पुरूषांनी अनियंत्रित होता. वर्णजातलिंगभेदविरहितता या समाजाचे वैशिष्टय होते. त्यामुळे स्त्रीप्राधान्यातच वर्णजातलिंगभेदविरहितता असत ही त्या काळात वर्णजातिसंस्थेला विरोध करण्यासाठी उदयाला आलेल्या तंत्र-पंथाची पायाभूत धारणा होती.
तंत्र हा वर्णजाती संस्थेच्या विरूध्द कार्यरत असलेला स्त्रीप्रधान आचारविचार पंथा होता. शिवाजीच्या जातीसंघर्षाची प्रेरणा ही तंत्रसाधनेच्या स्वीकारात होती. इ.स.च्या 6 व्या शतकात जातिव्यवस्थेने अधिक कर्मठ रू धारण केले असतांना तंत्र पंथाने वैदिक धर्माविरोधी जोरदार प्रचाराची भूमिका घेतली होती. शिवाजी बहजून जातींबद्दल व स्त्रियांबद्दल कळवळा दाखवू शकला हे या अब्राह्मणी धर्मांतरामुळेच असे मत शरद पाटील व्यक्त करतात.
शिवाजीचा जातिव्यवस्थेविरोधी संघर्ष सुधारित मालिकांबरी धारा लागू ेली हेाती. तेव्हापासून सुरू झाला होता. या संघर्षाची परिणती ही अंतिमत: शिवाजीच्या शाक्त राज्याभिषेकात झाली. हा राज्याभिषेक म्हणजे सजातीय विवाहाप्रमाणे एक विधी नव्हता तर अब्राह्मणी जात्यंतक शाक्त धर्म स्वीकारण्याची दीक्षा होती. विजातीय विवाह करूनच या पंथाची दिक्षा घेतली जात असे. शाक्त राज्याभिषेकाचा हा अन्वयार्थ शरद पाटील यांच्या प्राच्याविद्येतील पांडित्यामुळे लावू शकले. प्राच्यविद्येच्या अभावात गोविंद पानसऱ्यांसारखे अभ्यासक मात्र ब्राह्मणी इतिहासकारांच्या अन्वयार्थालाच पुष्टी देणारे अर्थ प्रतीत करतात.
प्रधान मंडळाच्या दहशतवादाला झुगारून शिवाजीने दुसरा राज्याभिषेक केला हेाता. राज्याभिषेकानंतरच छ. शिवाजी जातिव्यवस्थेविरोधातील संघर्ष तीव्र करू शकते. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा बाळगतो हे प्रभावळीच्या ब्राह्मण सुभेदाराला पाठविलेल्या पत्रातील आव्हानपर वचन हे शाक्त राज्याभिषेकापूर्वीचे नाही. या राज्याभिषेकापूर्वी शिवाजीला ब्राह्मण अदंडय मानणे भाग पडले होते हे त्याने प्रभावळीच्या सुभेदारास पाठविलेल्या राज्याभिषेकापूर्वीच्या पत्रावरून दिसते.
वर्णव्यवस्था व स्त्रीदास्यविरोधाची पंरपरा असलेल्या शाक्त तंत्रामुळे शिवाजीला ब्राह्मणी धर्माविरूध्द व जातिव्यवस्थेविरूध्द बंड करण्याची प्रेरणा मिळाली होती. उच्चजातीच्या दृष्टीने हा अक्षम्य गुन्हा होता व म्हणून सोयराबाईला हाताशी धरून शिवाजीवर विषप्रयोग केला गेला असे प्रतिपादन शरद पाटील करतात.
शरद पाटलांची शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाची मांडणी ही माफुआंच्या राजकीय मांडणीला पूरक आहे. जात्यंतक क्राती ही वर्गांतक क्रांतीपेक्षाही कठीण आहे व ती प्रबोधनाच्या क्रांतीशिवाय अशक्य आहे हे प्रतिपादन आंबेडकरांप्रमाणेच माफुआंचे देखील आहे. भारतीय जात्यांतक लोकशाही क्रांतीची तयारी अब्राह्मणी प्रबोधन क्रांतीने करावी लागेल या भूमिकेतून शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाचे महत्त्व शरद पाटील प्रतिपादीत करतात.
मागील वर्षी सबरंग या संस्थेतर्फे शिवाजी महाराजांवर तयार केलेले पाठयपुस्तक मुंबईतील काही शाळांमध्ये अभ्यासक्रमात होते. त्या पाठयपुस्तकाती शिवाजीच्या जातीसंघर्षाविषयक मांडणीवर आक्षेप घेउन व त्याचा उल्लेख शूद्र म्हणून केल्याबद्दल शिवसेनेने हिंसक आंदेालन केले होते. शिवसेनेचा आक्षेप हा शिवाजीच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेला नव्हता तर जातीसंघर्षाला होता ! त्यामुळे शिवाजीला प्रतिक्रांतीकारी हिंदुत्ववाद्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठीचे प्रबोधन शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाच्या मांडणीतून होईल. उदारमतवाद्यांच्या परधर्मसहिष्णुवादी शिवाजी या सिमीत मांडणीतून नव्हे ! त्यामुळे शरद पाटील यांची मांडणी पानसरे व इतर सर्व उदारमतवाद्यांच्या मांडणीपेक्षा अधिक वास्तवदर्शी आहे आणि म्हणूनच सध्याची लोकशाही क्रांतीची कोंडी फोडणारी देखील!
दिलीप चव्हाण

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास
आर्याचा शिरकाव महाराष्ट्रात केव्हा झाला हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. पाणिनी,कात्यायन आणि पातंजली यांच्या ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून डॅा.भांडारकरंानी असे अनुमान काढले आहे की,भारतीय आर्यांना इ.स.पूर्व सातव्या शतका पर्यंत विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे ज्ञान नव्हते. इ.स.पूर्व सातव्या शतकाच्या सुमारास आर्य विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे सरकू लागले असावेत.साधारणपणे इ.स.पूर्व 350 च्या सुमारास त्यांना दक्षिणेकडील तंजावर -मदुरैपर्यंतच्या सर्व प्रदेशाची माहिती झाली असली पाहिजे.
ब्राम्हणी धर्मशास्त्रात घातलेल्या बंधनामुळे कदाचित आर्यांचा प्रवेश महाराष्ट्रात लवकर झाला नसावा. बैाध्दायनाच्या धर्मसूत्राप्रमाणे आनर्त अंग,मगध,सौराष्ट,दक्षिणापथ,उपवृत, सिंध आणि सौवीर ह्या देशातील लोक संकरापासून निर्माण झाले आहेत.जो
कोणी आर,कारल्कर,पूंद्र,सौवीर,वंग, कलिंग किंवा प्रणून ह्या देशातून पर्यटन करील त्याने पुनस्तोम सर्वपृष्टीचे प्रायश्चित्त घ्यावे.विज्ञानेश्वर किंवा
याज्ञवल्क्य ह्याने धर्मसुत्रकार देवलाच्या खालील सूत्राचा उल्लेख केला आहे.
जो कोणी सिंध,सौवीर,सौराष्ट,सरहद्दीवरचे प्रांत,अंग,वंग, कलिंग आणि आन्ध्र देशातून पर्यटन करील त्याने आपली मुंज परत करावी.
ज्याप्रमाणे आर्य किंवा ब्राम्हणी संस्कृती महाराष्ट्रात निश्चित केव्हा आली हे सांगणे कठीण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव केव्हा व कसे मिळाले हेही सांगणे कठीण आहे.भाषावार राज्यांची विभागणी होऊन 1 मे 1960 रोजी जे हल्लीचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, तसे राजकीय दृष्ट्या एकसंघी महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात नव्हते. पाली वाङ्मयात अपरांत, अवन्ती, विदिशा,कोसल,अस्सक, अलक, दक्षिणापथ, आन्ध्र, महारठ्ठ, कोकणपथ इत्यादी देशाचा नामनिर्देश आहे.
काव्य-मीमांसेमध्ये अपरांत म्हणजे देवसभा ह्या नगराच्या पश्चिमेकडील प्रदेश असे म्हटले आहे देवसभा म्हणजे कोणते शहर ह्याची ओळख अजून पटली नाही. डॅा.भांडारकरांच्या मताप्रमाणे अ
परांत म्हणजे उत्तर कोकण.परंतु अपरांत म्हणजे उत्तर कोकण,नासिक, गुजरात, सौराष्ट, राजस्थान आणि सिंध या देशांचा मिळून झालेला असा एक प्रदेश असावा असेही बऱ्याच विव्दानांचे मत आहे.अवन्ती प्रदेश विंध्य पर्वताच्या दक्षिणेस खानदेशापर्यंत असावा विदिशा म्हणजे हल्लीचे विदर्भ. विनयपिटकाच्या महावग्गसुत्तामध्ये दक्षिणपथाचा उल्लेख आहे .अवंती प्रदेशातून दक्षिणेकडील गोदावरीच्या खोऱ्यास दक्षिणपथ म्हणत असावे असे वाटते. सुत्तनिपाताच्या पारायण वग्गात असे म्हटले आहे की, कोसल देशवासी बावरी ब्राम्हण दक्षिणपथात गेला आणि तेथे अस्सक राज्यात अलक राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागला.ह्यावरून सिद्ध होते की,गोदावरी नदीच्या आसपासच्या प्रदेशास त्या काळी दक्षिणपथ म्हणत असत.गोदावरी अस्सक आणि अलक राज्यांच्या मधून वाहत होती.अलक गोदावरीच्या उत्तरेस आणि अस्सक दक्षिणेस होता.
सिलोनमध्ये लिहिलेल्या पाली भाषेतील दीपवंस आणि महावंस या बैाध्दांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात महारठ्ठ देशाचा उल्लेख आहे. पाली भाषेतील महारठ्ठ याचे संस्कृतात महाराष्ट्र असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे.महावंस हा ग्रंथ इ.स.पाचव्या शतकात लिहिला गेला.दीपवंस त्याच्या बऱ्याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की,स्थविर मोग्गलीपुत्त तिस्स याने(तिसऱ्या) संगीताचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देशसमूहाला धम्म स्थापनेसाठी कार्तिक महिन्यात स्थाविरांना पाठविले. कोणकोणत्या धर्मउपदेशकांना कोठेकोठे पाठविले याची सविस्तर माहिती महावंसामध्ये आढळते त्यात महारठ्ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशाला पाठविले असा उल्लेख आहे.
अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. अहिहोळ लेख शके 556 म्हणजे इ.स. 634 चाआहे ह्यू-एन-त्संगने आपल्या प्रवासवर्णनात ज्या मो-हो-लो-च्छि या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजेच महाराष्ट्र असे विव्दानांचे मत आहे ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र इ.स. 641-42 मध्ये होता.
भूगोलशास्त्रज्ञ टोलेमीने आपल्याग्रंथात महाराष्ट्राला अरीयके असे म्हटले आहे. टोलेमीने इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रीया विश्वविद्यालयात खगोलशास्त्र आणि भूगोल शिकवीत होता. कर्नाटकातील कलगदगी येथील लोक आजही महाराष्ट्राला अरी असे संबोधतात असे ठाणे जिल्ह्याच्या बॉम्बे गॅझेटीयरमध्ये लिहिले आहे.
काही लोकांनी राष्ट्रकूटावरून महाराष्ट्राचे महाराष्ट्र नाव पडले असे म्हटले आहे. पण ते बरोबर वाटत नाही. एकतर राष्ट्रकूटांच्या कितीतरी अगोदर महाराष्ट्र असे नाव पडले होते हे सिद्ध झाले आहे. तसेच कोणत्याच
व्युत्पत्तिशास्त्रानुसार राष्ट्रकूटाचे महाराष्ट्र होत नाही.
मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. पण त्यापूर्वीच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची माहिती मिळत नाही. सम्राट अशोकाच्या पाचव्या धम्माज्ञेचे शिलालेख सौराष्ट्रातील गिरनार, कटकजवळील धौली, जंगम जिल्ह्यातील जौगढ, हिमालयाजवळ खालसी, अफगाणिस्तानावरील शाहबाझगढी आणि पाकिस्तानातील मानसेहरा येथील खडकांवर कोरलेले आढळतात. त्या शिलालेखांत आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी आणि धम्माचे प्रतिपालन करण्यात प्रजेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोकाने ज्या निरनिराळ्या प्रदेशात धम्माधिकारी पाठविले, त्यात रस्तिक, पेटेनिक आणि अपरांत या देशांचा उल्लेख आहे. डॉ. भांडारकरांच्या मते, अपरांत म्हणजे उत्तर कोकण. त्याची प्रांतिक राजधानी सुप्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा होती. पेटेनिक म्हणजे हल्लीच्या पैठण शेजारील प्रदेश आणि रस्तिक म्हणजे रथी किंवा महारथी लोक राहत असलेला प्रदेश असावा.
महाराष्ट्रातील लेण्यात ठिकठिकाणी सापडणारे रसिक आणि भोज लोकांचे संदर्भ डॉ. आळतेकरांनी शोधून काढले आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि समाजरचनेवर नवीन प्रकाश पडेल. नाणेघाट येथील लेण्यात महारथी त्रनाकयीरा आणि त्याची मुलगी-सातकर्णी राजाची राणी नयनीका यांचे पुतळे एकमेकांशी कोरलेले आहेत असे लिहिलेले आहे. कार्ल्यांच्या लेण्यात महारथी गोतीपुत्त अगिमितनाक आणि महारथी वसिथीपुत्त सोमदेव यांचा निर्देश केलेला आहे. महारथी वसिथीपुत्त सोमदेवाने कार्ल्याच्या लेणीला एक गाव इनाम दिल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सोमदेवाचा अधिकार तेथील तालुका प्रदेशावर अथवा जिल्ह्यावर असला पाहिजे. आणि गाव इनाम देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असला पाहिजे. कान्हेरीच्या लेण्यात महारथी नागमूलनिकाचे नाव आढळते, ती एका महाभोज राजाची बहीण आहे, असे म्हटले आहे. कार्ल्याला असलेल्या एका सिंहस्तंभावर तो स्तंभ महारथी अगिमितनाक याने दान केला आहे, असा उल्लेख आहे. कान्हेरीला असलेल्या एका शिलालेखात एका देणगीदार स्त्रीचे नाव नागमूलनिका असून तिच्या मुलाचे नाव स्कंधनाक आहे, असे म्हटले आहे.
डॉ. आळतेकर म्हणतात की, इ.स. पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अगोदर असलेली रथी आणि महारथींची राज्ये, आंध्राचे राज्य, महाराष्ट्रावर आल्यावर संपुष्टात आली असली पाहिजेत. ते पुढे म्हणतात की, भोज आणि रथिक लोकांच्या नावापुढे "नाक' हे संबोधन लावलेले आढळते त्यावरून रथिक आणि भोज लोक हे स्थानिक "नाग' जमातीचे असावेत किंवा ते नागाची पूजा तरी करीत असावेत.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या बौद्ध लेण्यातील शिलालेखनात नावाच्या पुढे "नाक' हे उपपद असलेल्या नावांची यादी खाली दिली आहे.
कान्हेरी लेण्यातील शिलालेखात - नकनाक अपरनाक, धमनाक, गोलनाक, मित्तनाक.
भाजा येथील शिलालेखात - अंपीनाक, किंवा अहीकीनाक.
कुडा येथील शिलालेखात - वसूलनाक, पुसनाक.
बेडसा येथील शिलालेखात - नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक अपरदेवनाक. याची बायको महाभोजाची मुलगी महारथीनी महादेवी सामादिनिका.
कार्ला येथील शिलालेखात - महारथी अगिमितनाक, मितदेवनाक, उसभनाक.
शिवनेरी येथील लेण्यातील शिलालेखात - वीररसेनाक.
नाशिक येथील लेण्यातील शिलालेखात - राजमंत्री अरहलय-चालीसनाक राजमंत्री अगीयतनाक, कफननाक, रामनाक, वगैरे.
"नाक' हे उपपद नावाच्या शेवटी असल्यामुळे रथी आणि भोज लोक हे स्थागित नाग जमातीचे असावेत किंवा ती नागाची पूजा करणारी जमात असावी या डॉ. आळतेकरांनी काढलेल्या निष्कर्षाला त्यांनी काही आधार दिलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या शतकापर्यंत "नाक' हे उपपद नावाच्या शेवटी लावणारी महार जमात आहे. सातारचे राज्य स्थापण्यास शिदनाक महाराने शाहू महाराजांची बाजू घेतली व अनेक लढ्यात पराक्रम केला. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्याला सांगली जिल्ह्यातील कळंबची जहागिरी दिली. त्याचा नातू शिदनाक याने आणि त्याच्या सैन्याने खर्ड्याच्या लढाईत पठाणांनी केलेल्या हल्ल्यात परशुरामभाऊ पटवर्धनाचा जीव वाचवला. नागेवाडीच्या पाटीलकीचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी नागनाक महाराने छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून मोगलांच्यापासून वाई जवळील वैराटगट जिंकून घेऊन घारादिव्य केले. त्याचप्रमाणे अमृतनाक आणि अंबरनाक महारांनी निझामशाही आणि बिदरच्या बहामनी बादशहांकडून महाराजांच्या बावन्न हक्कांच्या सनदी मिळविल्या.
इ.स. 1818 साली कोरेगाव येथे पेशवाईची शेवटची लढाई झाली. पुणे-अहमदनगर रस्त्यावर भीमानदीच्या किनारी एक रणस्तंभ आहे. त्याचे मुळचे नाव महास्तंभ असे होते. त्या स्तंभावर कोरेगावच्या लढाईत कामाला आलेल्या ज्या शूर महावीरांची नावे आहेत ती "नाक' हे उपपद शेवटी असलेली आहेत. उदा. सोमनाक, कमलनाक, रामनाक, येमनाक, गोदनाक, कोठेनाक, येसनाक इत्यादी.
नाक हे उपपद लावण्याच्या रिवाजावरून पूर्वींचे रथी-महारथी आणि भोज महाभोज म्हणजेच हल्लीचे अस्पृश्य समजले जाणारे लोक असावेत असे वाटते. राजभोज हे आडनाव पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यात ठिकठिकाणी आढळते.
आंध्रच्या सातवाहनांची आपल्या राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करतांना त्यांना रथी-महारथींनी तसेच भोज-महाभोजांनी बराच विरोध केला असला पाहिजे. म्हणून त्यांना "अरि' म्हणजे शत्रू असे नाव पडले असले पाहिजे. त्यावरूनच अरियके असे नाव रथी-महापरथींच्या प्रदेशाला इ.स. पूर्वी पहिल्या शतकात पडले असले पाहिले आणि म्हणूनच टोलेमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला अरियके असे म्हटले आहे असे वाटते.े
मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य(इ.स.पूर्वी 324 ते इ.स.पूर्वी 300)याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता किंवा नव्हता आणि होत असल्यास महाराष्ट्राच्या कोणत्या भागापर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते ह्याचा निश्चित पुरावा अजुन मिळाला नाही.पण त्याचा नातू सम्राट अशोक(इ.स.पूर्व274 ते 23) ह्याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होत होता ह्याचा निश्चित पुरावा सापडतो.
सम्राट अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्याजील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्याची प्रांतिक राजधानी होती.
मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्पमित्र नावाच्या एका सेनापतीने त्याला कपटाने मारले(इ.स.पूर्वी 184) आणि मौर्याचे राज्य बळकावले.जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते,तरी महाराष्ट्रात त्यांची छोटी छोटी राज्य बराच काळपर्यंत अस्तित्वात होती.चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्यांचा इ.स.625 च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला असा ताम्रपटात उल्लेख आहे.
मा. श. मोरे



Monday, February 7, 2011

कॉम्रेड शरद्‌ पाटील


खरे आयडॉल प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील
किशोर मांदळे
सर्वच चळवळींना अरिष्टात सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते. कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्‌ पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्‌ पाटलांची कोंडी करण्यासाठी जरी मौनाचा कट केला असला तरी परिवर्तनवादी अस्वस्थ तरूणांचे जथे या प्रस्थापितांपासून आता सरकत आहेत. शरद्‌ पाटलांचे साहित्य मिळवून मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. त्यांचे समग्र योगदान त्यांची दार्शनिक महता या छोट्या लेखात सामावणे शक्य नाही म्हणून संक्षेपावरच समाधान मानावे लागेल.
चक्रधर, बसवराजांच्या अब्राह्यणी प्रबोधनानंतर संत तुकारामांच्या नेतृत्वाखालील वारकरी संप्रदायाची प्रबोधन चळवळ विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर तेवढीच प्रभावी चळवळ झाली ती अव्वल इंग्रजी राजवटीत सत्यशोधक समाजाची, जिचे प्रवर्तक होते महात्मा फुले. या चळवळीची महाराष्ट्रात जी प्रभावक्षेत्रे होती त्यात खानदेशातील धुळे परिसर एक प्रमुख केंद्र होते. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावच्या वतनी भामरे (पाटील)कुटुंबावर साहजिकच सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. या ज्ञानलालसी कुटुंबातून आलेले आत्माराम पाटील हे शिक्षणक्षेत्रात डेप्युटी (शाळा तपासनीस) या हुद्यावर कार्यरत होते. सत्यशोधक चळवळींच्या प्रभावाने त्यांनी आपले नाव बदलून तान्हाजी असे घेतले व पत्नीचे नाव मंदोदरी असे ठेवले. या सत्यशोधकी दाम्पत्यापोटी 1925च्या 17 सप्टेंबरला धुळे शहरातच शरद्‌ पाटलांचा जन्म झाला. असामान्य आणि पराकोटीची ज्ञानतृष्णा अगदी लहानवयातच शरद्‌ पाटलांच्या ठायी दिसून आली. "टाईम्स'ने प्रकाशित केलेले "टोटल शेक्सपिअर' त्यांनी समग्र वाचून काढले. तेच मुळी वयाच्या अकराव्या वर्षी. रामायण-महाभारत या महाकाव्यांचे वाचनही त्यांनी या वयातच केले होते. वयाच्या सतराव्या वर्षी धुळ्यातच मॅट्रिक्युलेशन पूर्ण करून ते पेंटींग कोर्ससाठी बडोद्याच्या कलाभवनात दाखल झाले. तेथे एक वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते मुंबईच्या प्रतिष्ठित "जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये दाखल झाले. कलावंताचा पिंड असलेल्या शरद्‌ पाटलांच्या व्यक्तीमत्वात सत्यशोधकी जाणीवेचाही एक प्रखर पोत होता, जो त्यांना 1945 च्या पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ओढून घेऊन गेला. चळवळ्या मंडळींच्या संपर्काने त्यांचा साम्यवादी तत्वज्ञानाशी परिचय झाला. आर्टस्कूलचे शिक्षण मागे पडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात चित्रकार म्हणून काम करू लागले. शरद्‌ पाटील आता जीवनदानी कार्यकर्ते बनलेले कॉम्रेड शरद्‌ पाटील झाले होते.
1947 साली पक्षाने त्यांना धुळ्यात ट्रेड युनियन आघाडीवर पाठविले आणि 1950 ला एक वर्षाची हद्दपारी भोगून ते शेतकरी आघाडीवर कार्यरत झाले. कम्युनिस्ट शिस्तीने काम करतानाच त्यांनी 1956 पर्यंत बहुतांशी मार्क्सवादी साहित्य वाचून काढले होते. वयाची तिशी ओलांडताना ते आदिवासींच्या समस्यांना भिडले व धुळे-नंदुरबारच्या आदिवासीबहुल इलाख्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा व्यापक व भरभक्कम जनतळ उभारला. पुढच्या काळावर भारत-चीन संघर्षामुळे कम्युनिस्टविरोधाचे सावट होते. सरकारनेही कम्युनिस्ट नेतृत्वाची धरपकड चालविली होती. शरद्‌ पाटलांची रवानगी हर्सूल जेलमध्ये झाली. तेथेच त्यांनी पुन्हा एकदा मार्क्सचा दास कॅपिटल टिप्पणांसह तीनवेळा वाचून काढला. मार्क्सचे दुसऱ्या खंडातील एक चुकलेले बीजगणित त्यांनी येरवडा जेलमध्ये असलेल्या कॉ. बी.टी. रणदिवेंना पत्र लिहून कळविले ते याच काळात.
भारतीय समाजाचे, सवार्ंंना स्वच्छपणे दिसणारे जातीव्यवस्थेचे वास्तव फक्त कम्युनिस्ट नवब्राह्यणी नेतृत्वाला दिसत नव्हते व आजही दिसत नाही! पक्षसदस्य नोंदणी तक्त्यात कॉ. शरद्‌ पाटील वर्गाबरोबर जातही लिहून घेत. हाही पक्षामध्ये संघर्षाचा मुद्दा झाला. माकपच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद आता अटळच होते. शूद्राने जेवढे जाणायचे त्यापेक्षा जास्त जाणण्याचे पाखंड नवब्राह्यणी नेतृत्वाच्या नजरेतून सुटण्यासारखे नव्हते. दोन तुरूंगवास भोगून 1966 ला जेव्हा ते संशोधनासाठी बडोद्याला निघाले तेव्हा, चळवळीची हमाली सोडून स्कॉलर बनण्याचा उद्योग करतोय, ही शेरेबाजी त्यांना ऐकावी लागली. संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविल्याशिवाय भारतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पाड लागू शकत नाही. या क्षेत्राचे नियंते प्राय: संस्कृतज्ञ आहेत व या वैदिक पंडितांशीच भविष्यात आपला महासंघर्ष होणार आहे हे जाणून त्यांनी वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षीही संस्कृत-पाणिनी शिकण्याची जिद्द बाळगली. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पहिले वर्ष संस्कृत-पाणिनीचे अध्ययन करण्यातच खर्ची घातले. विद्याभास्कर मणिशंकर उपाध्यायांनी त्यांना प्रवेश दिला खरा. पण, या बुजुर्ग विद्यार्थ्याने उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी मणिशंकरजींनाही रात्र रात्र जागून काढावी लागत असे. कारण, या शंका त्यांना पूर्वीच्या पढीक विद्यार्थ्यांनी मुळीच विचारल्या नव्हत्या.
बडोद्यावरून परतल्यानंतर आदिवासीभागात साक्री येथे चळवळ आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी स्वत:ला जुंपून घेतले.तेव्हापासून, दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे व रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी...हेच त्यांचे प्राक्तन बनले ते आजतागायत. आज वयाच्या पंच्याऐंशीतही त्यांची रस्त्यावरची लढाई आणि पुस्तकांशी झुंजणे सुरूच आहे.
हद्दपारी, तुरूंगवास हिच काय ती "कमाई' असणाऱ्या व सतत प्रज्ञेच्या पातळीवर जगणाऱ्या या दार्शनिकाचा संसार चालविण्याचा "योग' जिने सिद्धीस नेला. त्या आपल्या सहधर्मचारिणीला-सुशिलाताईंनाच त्यांनी, पंधरा वर्षाच्या ज्ञानसाधनेतून निर्मिलेला पहिला खंड (दास-शूद्र-स्लेव्हरी) अर्पण केला आहे.
हा खंड त्यांनी अन्न-आच्छादन-निवाहापासून पुस्तकांपर्यंत सर्व साधनेे जुळवताना विपन्नावस्था व ज्ञानक्षेत्रातील उपेक्षा यांना एकाकीपणे तोंड देत निर्मिला आहे. मात्र त्यांच्या या पहिल्याच कृतीने तत्वज्ञ आणि विचारवंताच्या वर्तुळात निर्माण झालेला दरारा त्यानंतर कोणालाही रोखता आला नाही. मार्क्सवादाची एकप्रवाही वर्गवादी अन्वेषणपद्धत नाकारून त्यांनी वर्णजातीवर्गवादी अन्वेषणपद्धतीने केलेल्या या नव्या मीमांसेची दखल दिग्गजांना घ्यावीच लागली. भारतीय दासप्रथांची व त्यांच्या तत्वज्ञानांच्या उगमांची ही अन्विक्षा जरी 1972 लाच लिहून पूर्ण झाली असली तरी हा खंड प्रकाशित व्हायला एक दशक लागले. वाईचे प्राज्ञ प्रकाशन, प्रा. मे. पुं. रेगे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा यासंबंधात त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. दरम्यान, जातीव्यवस्थेविरूद्ध लढायला नकार देणाऱ्या माकपचा 27 जुलै 1978 ला राजीनामा देऊन कॉ. पाटलांनी स्वतंत्र वाट चोखाळत 15 ऑक्टोबर 1978 ला मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवादावर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. 1982 ला त्यांनी या पक्षाचे मुखपत्र "सत्यशोधक मार्क्सवादी' सुरू केले. एक दशकभर या मासिकाने डाव्या कार्यकर्त्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आजही सत्यशोधक मार्क्सवादीच्या जुन्या अंकांना मागणी आहे. पुढे पाच वर्षांनी पहिल्या खंडाचा दुसरा भागही प्रकाशित झाला. भारतीय इतिहास व तत्वज्ञानाकडे ब्राह्यणी व अब्राह्यणी या मुख्य विभाजनातून पाहण्याचा दंडक घालून देणारे दार्शनिक ही त्यांची ओळख स्थिर होत असतानाच त्यांचा रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष (1986) हा तिसरा भाग प्रकाशित झाला. शंबूक, एकलव्य, सीता, कर्ण, द्रौपदी, विदुर व कृष्ण या मिथकांचा त्यांनी विज्ञानवादी आकलनातून, वास्तवाने केलेला परिहार सर्व परिवर्तनवादी प्रबोधकांनी आवर्जून वाचायला पाहिजे.
पहिल्या खंडासाठी त्यांनी आयुष्याची पंधरा वर्षे खर्ची घातली होती. तर अठरा वर्षांच्या संशोधनातून दुसरा खंड स्वामी-सेवक संबंधावरील, जातीप्रथेच्या उगमविकासाचा जिवंत विषय घेऊन अवतरला-जातीव्यवस्थापक सामंती सेवकत्व (1996) या खंडात अब्राह्यणी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीला "समाजवादी सौत्रांतिकवादी' सौंदर्यशास्त्राची जोड मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात फूट पडून आधीचे निर्णायक एकाकीपण आणखी गहिरे झाले होते. या खंडाच्या अर्पणपत्रिकेेेेेेेतही हा एकाकीपणा बुद्ध वचनाच्या साक्षीने आला आहे.
दुसरा खंड तुर्कपूर्व भारतीय सामंतप्रथेतील दार्शनिक व सौंदर्यशास्त्रीय संघर्षावर प्रकाश टाकतो. भारतीय मार्क्सवादी वर्ण-जात समाजाची अनन्यता झटकून"वर्गाचे ब्रह्य' सोडायला आजही तयार नाहीत. जातीव्यवस्थेसह सर्व विषमता या वर्ग नावाच्या ब्रह्याच्या पोटात असल्याचा त्यांचा लाडका आग्रह आहे. (ब्रह्य नाश पावत नसल्याने मग मुक्ती कशी मिळणार?-इति शरद्‌ पाटील) कॉ. शरद्‌ पाटलांनी मार्क्सवाद एकप्रवाही व म्हणूनच अपुरा असल्याचे सर्वप्रथम लक्षात आणून दिले. शिवाय त्यांनी कर्मठ मार्क्सवाद्यांना बजावले आहे की, मार्क्सवादाला अखेरचा शब्द समजणे हेच मुळी ऐतिहासिक भौतिकवादात बसणारे नाही. मार्क्सवाद हे केवळ जाणीवेचे शास्त्र असल्याने ते अद्वैती आकलनात फसले आहे. मनाच्या द्वैती (जाणीव-नेणिवयुक्त) स्वरूपाच्या प्रमाणशास्त्रात दिग्रागाने (इ.स.चौथे शतक) केलेला उपयोग व दिग्राग स्कूलच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची दखल या खंडात घेण्यात आली आहे. मार्क्सवादाचे प्रतिबिंबक प्रमाणशास्त्र, वर्ग समाजाचेसुद्धा सम्यक आकलन करू शकत नसल्याने ते भारतीय जात-वर्ग समाजाला लावण्याचा खटाटोप कसा निरर्थक आहे ते सांगून त्यांनी, नव्या सौंदर्यशास्त्राचा आग्रह धरला आहे. नेणिवेत ढकलेल्या स्त्रीराज्याच्या समतामूल्यांची उकल हाेऊन ती परिणत साहित्य बनून कादंबरीसारख्या माध्यमातून कशी दृगोचर होतात, हे खुद्द सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या साहित्यातून दिसते. एकाच इयत्तेसाठी चार वर्षे शाळेत काढून व अक्षरओळखही विसरलेल्या नजुबाई ते पहिल्या आदिवासी लेखिका कॉम्रेड नजुबाई हा त्यांचा प्रवास नेणिवेच्या प्रमाणशास्त्राचे यश आहे. "स्त्री-शुद्रांच्या स्वराज्याचा राजा' (1998) हे स्वत: शरद्‌ पाटलांनी लिहिलेले नाटकही या प्रमाणशास्त्राचा वस्तुपाठ आहे. ब्राह्यणी अलंकारशास्त्रही प्रतिबिंबवादी असल्याने ते प्रस्थापितताच निर्माण करील, नवसमाज नव्हे. म्हणून जुने प्रतिबिंबवादी सौंदर्यशास्त्र सोडून नेणिवेचे जास्त भेदक व समर्पक सौंदर्यशास्त्र स्वीकारल्याशिवाय मन बदलता येणार नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. (मने कशी बदलायची हा प्रश्न तत्त्ववेत्यांनी अनुत्तरीत ठेवला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.)
सर्वहारांचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र असल्याशिवाय व लेखकाला जाणीव-नेणिव प्रक्रिया उमजल्याशिवाय तो सर्वश्रेष्ठ निर्मिती करू शकणार नाही. या सौंदर्यशास्त्राचे मिशन व सामर्थ्य मनाचे मुलभूत परिवर्तन हेच आहे व "मी समाजवादी समाजाची निर्मिती करतो आहे' हा आत्मविश्वास त्यामुळे कलावंताला मिळेल एवढा आवाका कॉ. शरद्‌ पाटलांनी या सौंदर्यशास्त्रातून उद्‌घोषित केला आहे.
दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागात त्यांनी शिवाजी-संभाजीच्या जातीअंतक समतावादी, शाक्त हौतात्म्याचा धगधगता विषय हाताळला आहे- शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्यणी? (1991) मध्ययुगीन राजकीय संघर्षाला हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा रंग देण्याचा ब्राह्यणी बनाव तर येथे सप्रमाण उघड केलाच आहे, पण शिवाजी-संभाजीचे हौतात्म्य ही अब्राह्यणी प्रबोधनाची अमोघ अस्त्रे होऊ शकतात, हा विश्वास सर्व परिवर्तनवाद्यांना या पुस्तकाने दिला आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्या ज्या वेगाने संपल्या आहेत त्यावरूनही भारतीय समाजक्रांतीच्या अब्राह्यणी प्रबोधनात या पुस्तकाची प्रस्तुतता स्पष्ट होते.
स्वत:ची प्रबोधनआघाडी सुद्धा नसलेल्या डाव्यापक्षांकडून शरद्‌ पाटलांचे साहित्य समजायला कठीण असल्याचा प्रचार मात्र आवर्जून केला जातो. वास्तविक, त्यांनी केलेला संकल्पनांचा विकास समजून घेतला की हे साहित्य समजायला मुळीच कठीण नाही, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. मार्क्सवाद त्याच्या एकप्रवाही अन्वेषण पद्धतीमुळे वर्ग समाजाशिवाय कशाचाही अभ्यास करू देत नाही. त्यामुळे भारतीय जातवर्ग समाजाच्या आकलनासाठी शरद्‌ पाटलांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला पर्याय नाही. त्यांनी आपल्या अन्वेषण पद्धतीला "विधायक-अब्राह्यणी' म्हटले आहे. कारण, नकारात्मक अब्राह्यणी अन्वेषण हे प्रबोधनाला उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ, राम व कृष्ण यांचे भारतीय इतिहासाला काय योगदान आहे ते स्पष्ट करूनच, ते जनमानसात परमेश्वरपदी कसे पोहोचले ते उलगडून दाखवता येईल. त्यामुळे त्यांचे देवत्व गळून मानवीपण ठळक झाल्याने त्यांच्या भक्तीतून बहुजनसमाज मुक्त होईल व तो भारतीय इतिहासाकडे भौतिकवादी दृष्टीने बघायला सक्षम होईल. शरद्‌ पाटलांच्या "बहुप्रवाही विधायक अब्राह्यणी ऐतिहासिक भौतिकवादी' अन्वेषण पद्धतीचे हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा परिचय त्यांच्या तिसऱ्या खंडात जास्त ठळक होतो. "जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती' (2003) हा तिसरा खंड, भारतीय समाजाचे सरंजामी वास्तव रेखाटतो व धार्मिक मूलतत्ववाद व जातीयवादाला पुढे घालून उजवे पक्ष जी औपचारिक लोकशाही हाताळत आहेत; त्यातील भ्रामक विकास, आरक्षण व शोषितांमधील विद्रोहींना सामावून घेणारी बहुस्तरसत्ताक राजनीती यावर प्रकाश टाकतोच पण, मार्क्सवादाच्या अपुरेपणामुळे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्षांचे लोकशाही क्रांतीचे "ब्रॅण्ड' असे हतबल झाले आहेत, तेही स्वच्छपणे दाखवून देतो. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आग्रह धरताना वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंकडील वरकड जमीन गरीब शेतकरी- शेतमजुरात वाटण्यासाठी जातीअंताचा लढा कसा अटळ आहे, यावरही प्रकाश टाकतो. जगभर समाजवाद उभारणीच्या प्रयत्नांना आलेले अपयश मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टामुळेच कसे आहे ते स्पष्ट करून मार्क्सवादापेक्षा उच्चतर वाद (इझम) आल्याशिवाय समाजवाद उभारणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतो. त्यासाठी बौद्ध दिग्राग स्कूलचे प्रमाणशास्त्र व मार्क्सवादाच्या संयोगातून निर्मिलेल्या नव्या "सौत्रांतिक दर्शना'चा आग्रह धरतो.
भारताचा समग्र इतिहास तीन खंडात लिहिल्यानंतर या महान तत्ववेत्त्याने वयाची चौऱ्यांशी पार करताना "क्रांतीचे तत्वज्ञानात्मक शस्त्रागार' ठरू शकणारा चौथा खंड "प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मॅट्रीऑर्की-गायनोक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' लिहून हातावेगळा केला आहे. सध्या त्याचे मराठी भाषांतर (प्राथमिक समाजवाद, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व आधुनिक समाजवाद) करण्यात ते व्यग्र आहेत. क्रांतीकारी चळवळीसाठी तत्वज्ञान हा कळीचा मुद्दा असतो. आपल्या राजकीय पक्षाचा तात्विक पाया मूलग्राही व विस्तृत असावा या कळकळीतून त्यांनी ही साहित्यनिर्मिती केली आहे. भारतात तरी राजकीय पक्षांच्या संस्थापकांपैकी, प्राच्याविद्यापंडीत कॉ. शरद्‌ पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता कुणाही संस्थापकाने असे साहित्य निर्माण केलेले नाही.
सर्व मार्क्सवादी पंडितांनी मॉर्गन-एंगल्सचे प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे मॉडेल ग्राह्य धरल्याने त्यांचे मातृसत्ता-स्त्रीसत्तेच्या ऐतिहासिक वास्तवतेकडे दुर्लक्ष झाले. मार्क्सवाद्यांच्या डोक्यावरील प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे भूत उतरविण्यासाठी शरद्‌ पाटलांनी स्त्रीराज्याच्या समता- लोकशाहीचा आजच्या समाजवादी लोकशाहीसाठी सापेक्षतेने स्वीकार करण्याचा आग्रह धरला आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेताना वेदांची आर्षभाषा ही सिंधू खोऱ्यातील ऋतींच्या वैराज-स्त्रीराज्याची बोलीभाषा होती, ती युरोपातून आलेली नव्हती हे त्यांनी सिद्ध केले. शेतीचा शोध लावणारी स्त्री क्षेत्र वा क्षत्र असून पुरूष "रेतो-धां' आकाश म्हणून ब्रह्यन्‌ आहे, हे दाखवून देताना त्यांनी, भारतीय इतिहासाची सुरूवात वैदिकी श्रृतीने नव्हे तर (कृषीमायेच्या) तांत्रिकी श्रृतीने होते याकडे लक्ष वेधले, निर्ऋति ही सिंधू संस्कृतीच्या ऋतींच्या पहिल्या ज्ञात स्त्रीसत्तेची देवी होती हेही त्यांनी सिद्ध केले. वैदिक पंडीत एम. ए. मेहंदळे यांच्याशी कॉ. पाटलांचा वर्षभर वाद झाला तो निर्ऋतीच्या व्युत्पत्तीवरच नैर्ऋत व निर्ऋतीची संतान आर्यांकडून पराभूत होऊन दास झाल्यानंतर भारतीय सौंदर्याचा आदर्श काळा (रंग) न राहता गोरा झाला!(खंड2, पा. 174) स्त्रीराज्यांचे शास्तेपद जाऊन पितृवंशक राजपदे कशी अस्तित्वात आली व पुढे वर्णसमाज, जातीसमाज व आजचा जातवर्गसमाज असा भारतीय इतिहासाचा त्यांनी पूर्वीच्या तीन खंडातच संशोधनात्मक मागोवा घेतला आहे. चौथा खंड, भारतीय नवसाम्राज्यशाहीविरोधी जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची लढाई कशी अटळ आहे हे सांगून आधुनिक समाजवाद उभारणीचा क्रांतदर्शी मार्ग दाखवेल.
जागतिक साम्यवादी चळवळीला कॉ. शरद्‌ पाटलांचे योगदान तत्वज्ञानात्मक व मेथडॉलॉजीचेही आहे. तत्वज्ञानात त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवादाची नवी भर घातली आहे तर बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद ही त्यांची मेथडॉलॉजी आहे. समाजवादी सौत्रांतिकवादाची त्यांची निर्मिती मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टातील सौंदर्यशास्त्राचा अपुरेपणा भरून काढेल. लॉजिकचा विकास करताना फॉर्मल-आकारिक तर्कशास्त्राच्या पुळे जाऊन मानवी मन बदलणारे डायलेक्टिकल लॉजिक त्यांनी उद्‌घोषित केले आहे. कॉ. पाटलांच्या मते, भारतीय जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचे नेतृत्व औद्योगिक सर्वहारामधील अवर्ण व जुने अवर्ण सर्वहाराच करू शकतील. या क्रांतीच्या व्यूहरचना व डावपेचात तिच्या या अधिनायकांना भांडवलदारी लोकशाही सांगता करणारा समाजवादी संक्रमणाचाही आराखडा तयार ठेवावा लागेल. अन्यथा, क्रांती उलटून देश पुन्हा जातवर्गीय कर्दमात फसेल. या क्रांतीच्या अधिनायकाचे डोळे व चष्मा सौत्रांतिक मार्क्सवादी पक्षाच असू शकेल.
भारतातील कम्युनिस्ट पक्षांनी जात्यन्तक समतेच्या समाजक्रांतीला अव्हेरण्याचे मूलगामी कारण तत्वज्ञानात्मकच आहे, हे उमजल्यानंतर या महान दार्शनिकाचा माकपचे "थिओरेटिशिऊन' बसवपुन्नया व ई.एम.एस. नंबुदिरीपादांशी प्रदीर्घ वैचारिक संघर्ष झाला आहे. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (1993).
या कृतीमध्ये तो विस्ताराने आला आहे. येथे विस्तारभयास्तव तो समग्र देता येणार नसल्याने त्याची फक्त नोंद करून ठेवतो. पण भारतीय मार्क्सवाद्यांचे ब्राह्यणी नेणिवेचे हे तर्कशास्त्र भुईसपाट करण्यासाठी कॉ. शरद्‌ पाटलांनी आपली उभी हयात खर्च केली आहे आणि हे ऐतिहासिक उत्तरदायित्व मलाच निभयवायचे आहे. ही बोधी ज्यांना ज्या क्षणी प्राप्त झाली तो क्षण त्यांना "भारतीय अब्राह्यणी प्रबोधनाचे महावाक्य' बनवून गेला!
चित्रकार-शिल्पकार, जीवनदानी साम्यवादी नेते, कठोर शिस्तीचे संघटक, राजकीय पक्षाचे संस्थापक, प्राच्यविद्यापंडीत आणि जागतिक साम्यवादी चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान दार्शनिक असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी प्रवास आहे. पण, त्यांची चिरेबंद लेखनशैली व धारदार वक्तृत्व या सर्वावरील कळसाध्याय आहे. रामायण-महाभारतावरील त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या अभिनत वक्तृवशैलीचे सर्व पैलू अविष्कृत झाले आहेत.
सर्वच समतावादी दार्शनिकांना ब्राह्यणी छावणीकडून जे "प्रेम' मिळते ते शरद्‌ पाटलांनाही भरभरून मिळाले. त्यात नवब्राह्यणी मार्क्सवादीही मागे नव्हते. पण, इतिहासातील आपल्या सर्व पूवर्र्सुरींचा दाखला हाताशी असल्याने त्यांनी कुणालाही स्वत:वर मात करू दिली नाही. घोर उपेक्षेचा ज्वर त्यांनी निर्धारपूर्वक अंगावरच काढला. जंबुद्धिपाच्या मातीला, सिंधू खोऱ्याला प्रारंभी समतेचा अंगचाच गंध होता व विषमतावादी छावणीच्या प्रतिचढाईनंतरही ही माती "करूणा आणि मेत्ता' ही मूल्ये प्रसवतच राहिली. वैदिकांनी तिच्या सर्व समतावादी अधिनायकांना बदनाम करून बहुजनांच्या नेणिवेत दफन केले. नेणिवेच्या या वैराण दफनभूमीवर आज दोन हजार वर्षानंतर हा महत्तम दार्शनिक एकटाच गेला. या वैराणभूमीतील नेणिवेचे सर्व प्रस्तर त्याने प्रचंड प्रयासाने अविस्तपणे उकलून काढले. त्यातून चार खंडात विभागलेली साहित्यकृती जन्मली. हे क्रांतीचे शस्त्रागार-महाभांडार घडविणाऱ्या व्यक्तीची दुनिया व आपली व्यवहाराच्या कर्दमात रूतलेली दुनिया यात विलक्षण अंतर पडते. हे अंतर ज्यांना समजले नाही, त्यांना कॉ. शरद्‌ पाटलांचा "स्व-भाव' ही कसा समजावा?
चार खंडाव्यतिरिक्त अब्राह्यणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (1988) यासारख्या त्यांच्या अन्यकृतींचा व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लढ्यांचा जागेभावी या लेखात समावेश करता आलेला नाही. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांस्कृतिक चळवळी, परिषदा व स्वतंत्र आदिवासी (जनस्थान) राज्यासाठी केलेला संघर्ष, तसेच 1970 पासून त्यांनी आदिवासींच्या वनजमिनी त्यांच्या मालकीहक्काच्या व्हाव्यात म्हणून केलेल्या संघर्षामुळे तसा कायदा केंद्र सरकारला करावा लागला. त्या अभूतपूर्व लढ्याचाही येथे तपशील देता आलेला नाही. सुरूवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे या प्रचंड ऊर्जेच्या महाकाय व्यक्तिमत्वाचा सर्वकष वेध घेणे, छोटेखानी लेखात शक्य नाही.
कॉ. शरद्‌ पाटलांच्या साहित्याचे तरूण अभ्यासक संजीवकुमार कांबळे बरेचदा मोबाईलवरून त्यांच्या साहित्याविषयी उत्साहाने बोलत असतात. शरद्‌ पाटलांनी उभ्या केलेल्या मीमांसेबद्दल त्यांना मूलग्राही विश्वास आहे. एकदा ते असेच उत्स्फूर्तपणे बोलून गेले की... बुद्धानंतर त्या श्रेणीचा बुद्ध झाला नाही हे खरे, पण कॉम्रेड शरद्‌ पाटीलच आपले बुद्ध आहेत असे मानले तर.. हा आपला शेवटचा बुद्ध आहे!

Wednesday, November 17, 2010

Tuesday, November 16, 2010

com. sharad patil








बिगर आदिवासींच्या साहित्यात खूप विसंगती


आद्य आदिवासी व स्त्रिसत्तेच्या कादंबरीकार
कॉ.नजूबाई गावित यांचे प्रतिपादन

दि. 31 सप्टेंबर 2010
पुणे/प्रतिनिधी
देशात आणि राज्यातही खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावर साहित्य लिहिलं गेलेलं नाही, परंतु ज्या बिगर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासींबद्दल जे साहित्य लिहिलं त्यात मोठया प्रमाणावर विसंगती आहेत. आदिवासींचं अस्सल साहित्य त्यांच्या कला, नृत्य, वाद्य, कलेत विविध स्तरावर विखुरलेले असल्याचं प्रतिपादन आद्य आदिवासी व स्त्रिसत्तेच्या कादंबरीकार कॉ.नजूबाई गावित यांनी केलं
भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील एकमेव असलेले प्राच्यविद्यापंडित तथा दार्शनिक कॉ. शरद पाटील यांच्या "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या प्रकाशन सोहळया प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी युनिव्हर्सलचे कार्पोरेश(अमेरिका) प्रमुख किशोर देशपांडे, पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रा. प्रदीप गोखले, संस्कृततज्ज्ञ तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे , प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद्‌ पाटील आणि मावळाई प्रकाशनाचे प्रमुख डॉ. सुभाष गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासींच्या सर्व देव-देवता या दगड-गोटयाच्या बनलेल्या आहेत,
आम्ही आत्ताच गुजरातमधील डांगमध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी शबरीचे मंदीर काही लोकांनी बनविले आहे, ते देवूळ आदिवासींचे बिल्कुल नसून पांढरपेशी लोकांचे आहे, त्याचा आणि शबरीचा काहीही संबंध नाही. कारण आमच्या शबरीचा अवतार असा असूच शकत नाही. रामाने शबरीचे बोरे खाल्ले असे वैदिकांनी म्हटले असून ते पूर्णपणे खोटे आहे. ती त्यावेळी तिथल्या स्त्रीसत्ताक राज्याची राणी होती, हे अजूनही लोकांच्या स्मृतीत असल्याच्या कथा ते एकमेकांना सांगतात. जिथं जातीव्यवस्थेमध्ये आम्हाला उच्चवर्णिय चपलाच्या जवळही ठेवत नाहीत, तिथं बोरे खाण्याचा प्रश्न येतो कुठे? रामायण काळ असो की, आजचा काळ इथं अजूनही जातिव्यवस्था "जशीन्‌ तशीच हाय' हे आपण मान्य केले पाहिजे. कॉ. शरद्‌ पाटील यांनी मानव समाजाचा इतिहास सुरुवातील स्त्री सत्तेपासून पितृसत्तेपर्यंत व पुढे वर्ण आणि जातीव्यवस्थेपर्यंत कसा विकसित होत गेला हे आपल्या आयुष्यभराच्या संशोधनातून सांगितलं.
युनिव्हर्सल कार्पोरेशनचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाची सुरुवात सिंह आणि मानवाच्या एका कथेपासून केली. ते म्हणाले की, कॉ. शरद्‌ पाटील यांनी निर्माण केलेले संशोधन हे पाच दशकातील तत्वज्ञानाच्या विकासातील एक महत्वाचा जागतिक टप्पा म्हणून ओळखले जाईल. त्यांनी 30 वर्षांपूर्वी वर्णवाद्यांना दिलेले आव्हान आजतागायत कायम असून त्यांच्याकडून अजूनही या आव्हानाला त्यांना उत्तर देता आले नाही. आपल्या देशात मार्क्सवादी विचारधारा जी एकप्रवाही आहे, ती कॉ. शरद्‌ पाटील यांनी मार्क्सवादी-फुले-आंबेडकरवादी या विचाराच्या संयोगाने बहुप्रवाही केली. त्यानंतर याची मर्यादा लक्षात घेऊन पुढे सौतांत्रिक मार्क्सवादाची निर्मिती केली. यामुळेच त्यांचा हा चवथा खंड त्यांनी चीन, क्युबा, रशिया येथील क्रांतिकारी आणि समाजवादाच्या शोधात असणाऱ्या लोकांना अर्पण केला ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे असे सांगत शरद्‌ पाटील यांचे संशोधन हे जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख कशी निर्माण करते हे स्पष्ट केले.
डॉ. प्रदीप गोखले यांनी "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या पुस्तकाचे विमोचन केले. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत जात्यान्तासाठी नवे तत्वज्ञान कसे विकसित करण्यात आले आहे हे त्यांनी सविस्तर मांडले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संशोधक तथा संस्कृतपंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांनी यावेळी सांगितले की, कॉ. शरद्‌ पाटील यांनी भारतीय समाज रचनेच्या तत्वज्ञानाच्या चिंतनात अतिशय श्रेष्ठ दर्जाचे योगदान दिले असल्याने आपण त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. ते या ग्रंथात सिंधू संस्कृतीतल्या निर्ॠती या आद्यमाता हिचे विवेचन करीत तो स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक परंपरेचा प्रवाह आधुनिक काळाकडे घेऊ येतात. त्यांनी या ग्रंथात ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या विचारप्रवाहाचे वर्णन कॉन्शस आणि अनकॉन्शस हे शब्द नव्याने वापरुन नव्या तत्वज्ञानाचा विकास केला असल्याचं डॉ. साळुंखे यांनी सांगितलं.
मंचकावर मणिपूरमधील आदिवासींच्या मानवी हक्काबाबत गेल्या दहा वर्षांपासून उपोषणला बसलेल्या इरोम शर्मिला चानू व चीनमध्ये लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लिऊ झिबाओ यांच्या प्रतिमा लावल्या होत्या.या दोन्ही व्यक्तींनी लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी उभारलेल्या लढयाची माहिती कॉ. शरद्‌ पाटील यांनी आपल्या मनोगताच्या सुुरुवातीला सांगितली. मंचावर आणि त्यांच्या 4ध्या खंडाच्या पृष्टावर लावलेल्या देवी हरितीबाबत ते म्हणाले की, देवी हरितीचे हे शिल्प इंडो-ग्रिक काळात तयार झाले असून जगातील मातृदेवतेचे हे सर्वात सुंदर असलेले एकमेव शिल्प आहे. हरिती ही निसर्ग देवता आणि भूमाता असल्याचे मी सिध्द केले. आपटयांच्या डिक्शनरीत तीचा उल्लेख नाही. आपल्या देशात मातृसत्ता होती. आद्यधर्मसूत्रकार हारीत याने तिला आपली माता म्हटले होते. हारीतने या भूमातेचे कायदे काय होते याचे वर्णन केले आहे. त्याचे धर्मसूत्र वैदिकांनी लपवून ठेवले असले तरी त्याची विचारधाना त्यांना लपविला आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज दलित साहित्य हे ब्राह्मणी चळवळीला शरण गेलेले असल्याचे सांगत त्यांनी जिथे प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी जिथे बाबासाहेब थांबले तिथून आम्हाला पुढे जायचे की, नाही हा प्रश्न आता प्रत्येकांनी विचारला पाहिजे कारण प्रतिक्रांती आता आक्रमक पावले टाकत आहे. अशावेळी सगळयांनी एकत्र येवून जात्यांतक लोेकशाहीची पूर्वतयारी करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी साडेचार लक्ष एकर जमिनीपैकी सव्वा दोन एकर जमिनी भूमिहिनांना वाटल्या. असेच राज्यात आदिक सरकारने पुणे जिल्ह्यात भूमिहिनांना जमिनी वाटल्या होत्या. आज देशात समाजवादाची नवउभारणी करायची असेल तर देशात दोन कोटी 10 लाख हेक्टर जमीन शिल्लक असून तिच्या फेरवाटपाची मोठी गरज आहे. यासाठी येत्या काळा आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यात भूमिहिनांची परिषद आयोजित करणार आहोत. जात्यांतक लोकशाहीसाठी जमिनीच्या फेरवाटपाचे हे आंदोलन देशभर करावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी पावरी या आदिवासी वादनाचा निनाद परिसरात घुमविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. किशोर मांदळे यांनी केले तर प्रस्ताविक कॉ. रविंद्र घोगरे यांनी केले.