Pages

Tuesday, May 17, 2011

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास
आर्याचा शिरकाव महाराष्ट्रात केव्हा झाला हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. पाणिनी,कात्यायन आणि पातंजली यांच्या ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून डॅा.भांडारकरंानी असे अनुमान काढले आहे की,भारतीय आर्यांना इ.स.पूर्व सातव्या शतका पर्यंत विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे ज्ञान नव्हते. इ.स.पूर्व सातव्या शतकाच्या सुमारास आर्य विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे सरकू लागले असावेत.साधारणपणे इ.स.पूर्व 350 च्या सुमारास त्यांना दक्षिणेकडील तंजावर -मदुरैपर्यंतच्या सर्व प्रदेशाची माहिती झाली असली पाहिजे.
ब्राम्हणी धर्मशास्त्रात घातलेल्या बंधनामुळे कदाचित आर्यांचा प्रवेश महाराष्ट्रात लवकर झाला नसावा. बैाध्दायनाच्या धर्मसूत्राप्रमाणे आनर्त अंग,मगध,सौराष्ट,दक्षिणापथ,उपवृत, सिंध आणि सौवीर ह्या देशातील लोक संकरापासून निर्माण झाले आहेत.जो
कोणी आर,कारल्कर,पूंद्र,सौवीर,वंग, कलिंग किंवा प्रणून ह्या देशातून पर्यटन करील त्याने पुनस्तोम सर्वपृष्टीचे प्रायश्चित्त घ्यावे.विज्ञानेश्वर किंवा
याज्ञवल्क्य ह्याने धर्मसुत्रकार देवलाच्या खालील सूत्राचा उल्लेख केला आहे.
जो कोणी सिंध,सौवीर,सौराष्ट,सरहद्दीवरचे प्रांत,अंग,वंग, कलिंग आणि आन्ध्र देशातून पर्यटन करील त्याने आपली मुंज परत करावी.
ज्याप्रमाणे आर्य किंवा ब्राम्हणी संस्कृती महाराष्ट्रात निश्चित केव्हा आली हे सांगणे कठीण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव केव्हा व कसे मिळाले हेही सांगणे कठीण आहे.भाषावार राज्यांची विभागणी होऊन 1 मे 1960 रोजी जे हल्लीचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, तसे राजकीय दृष्ट्या एकसंघी महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात नव्हते. पाली वाङ्मयात अपरांत, अवन्ती, विदिशा,कोसल,अस्सक, अलक, दक्षिणापथ, आन्ध्र, महारठ्ठ, कोकणपथ इत्यादी देशाचा नामनिर्देश आहे.
काव्य-मीमांसेमध्ये अपरांत म्हणजे देवसभा ह्या नगराच्या पश्चिमेकडील प्रदेश असे म्हटले आहे देवसभा म्हणजे कोणते शहर ह्याची ओळख अजून पटली नाही. डॅा.भांडारकरांच्या मताप्रमाणे अ
परांत म्हणजे उत्तर कोकण.परंतु अपरांत म्हणजे उत्तर कोकण,नासिक, गुजरात, सौराष्ट, राजस्थान आणि सिंध या देशांचा मिळून झालेला असा एक प्रदेश असावा असेही बऱ्याच विव्दानांचे मत आहे.अवन्ती प्रदेश विंध्य पर्वताच्या दक्षिणेस खानदेशापर्यंत असावा विदिशा म्हणजे हल्लीचे विदर्भ. विनयपिटकाच्या महावग्गसुत्तामध्ये दक्षिणपथाचा उल्लेख आहे .अवंती प्रदेशातून दक्षिणेकडील गोदावरीच्या खोऱ्यास दक्षिणपथ म्हणत असावे असे वाटते. सुत्तनिपाताच्या पारायण वग्गात असे म्हटले आहे की, कोसल देशवासी बावरी ब्राम्हण दक्षिणपथात गेला आणि तेथे अस्सक राज्यात अलक राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागला.ह्यावरून सिद्ध होते की,गोदावरी नदीच्या आसपासच्या प्रदेशास त्या काळी दक्षिणपथ म्हणत असत.गोदावरी अस्सक आणि अलक राज्यांच्या मधून वाहत होती.अलक गोदावरीच्या उत्तरेस आणि अस्सक दक्षिणेस होता.
सिलोनमध्ये लिहिलेल्या पाली भाषेतील दीपवंस आणि महावंस या बैाध्दांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात महारठ्ठ देशाचा उल्लेख आहे. पाली भाषेतील महारठ्ठ याचे संस्कृतात महाराष्ट्र असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे.महावंस हा ग्रंथ इ.स.पाचव्या शतकात लिहिला गेला.दीपवंस त्याच्या बऱ्याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की,स्थविर मोग्गलीपुत्त तिस्स याने(तिसऱ्या) संगीताचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देशसमूहाला धम्म स्थापनेसाठी कार्तिक महिन्यात स्थाविरांना पाठविले. कोणकोणत्या धर्मउपदेशकांना कोठेकोठे पाठविले याची सविस्तर माहिती महावंसामध्ये आढळते त्यात महारठ्ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशाला पाठविले असा उल्लेख आहे.
अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. अहिहोळ लेख शके 556 म्हणजे इ.स. 634 चाआहे ह्यू-एन-त्संगने आपल्या प्रवासवर्णनात ज्या मो-हो-लो-च्छि या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजेच महाराष्ट्र असे विव्दानांचे मत आहे ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र इ.स. 641-42 मध्ये होता.
भूगोलशास्त्रज्ञ टोलेमीने आपल्याग्रंथात महाराष्ट्राला अरीयके असे म्हटले आहे. टोलेमीने इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रीया विश्वविद्यालयात खगोलशास्त्र आणि भूगोल शिकवीत होता. कर्नाटकातील कलगदगी येथील लोक आजही महाराष्ट्राला अरी असे संबोधतात असे ठाणे जिल्ह्याच्या बॉम्बे गॅझेटीयरमध्ये लिहिले आहे.
काही लोकांनी राष्ट्रकूटावरून महाराष्ट्राचे महाराष्ट्र नाव पडले असे म्हटले आहे. पण ते बरोबर वाटत नाही. एकतर राष्ट्रकूटांच्या कितीतरी अगोदर महाराष्ट्र असे नाव पडले होते हे सिद्ध झाले आहे. तसेच कोणत्याच
व्युत्पत्तिशास्त्रानुसार राष्ट्रकूटाचे महाराष्ट्र होत नाही.
मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. पण त्यापूर्वीच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची माहिती मिळत नाही. सम्राट अशोकाच्या पाचव्या धम्माज्ञेचे शिलालेख सौराष्ट्रातील गिरनार, कटकजवळील धौली, जंगम जिल्ह्यातील जौगढ, हिमालयाजवळ खालसी, अफगाणिस्तानावरील शाहबाझगढी आणि पाकिस्तानातील मानसेहरा येथील खडकांवर कोरलेले आढळतात. त्या शिलालेखांत आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी आणि धम्माचे प्रतिपालन करण्यात प्रजेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोकाने ज्या निरनिराळ्या प्रदेशात धम्माधिकारी पाठविले, त्यात रस्तिक, पेटेनिक आणि अपरांत या देशांचा उल्लेख आहे. डॉ. भांडारकरांच्या मते, अपरांत म्हणजे उत्तर कोकण. त्याची प्रांतिक राजधानी सुप्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा होती. पेटेनिक म्हणजे हल्लीच्या पैठण शेजारील प्रदेश आणि रस्तिक म्हणजे रथी किंवा महारथी लोक राहत असलेला प्रदेश असावा.
महाराष्ट्रातील लेण्यात ठिकठिकाणी सापडणारे रसिक आणि भोज लोकांचे संदर्भ डॉ. आळतेकरांनी शोधून काढले आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि समाजरचनेवर नवीन प्रकाश पडेल. नाणेघाट येथील लेण्यात महारथी त्रनाकयीरा आणि त्याची मुलगी-सातकर्णी राजाची राणी नयनीका यांचे पुतळे एकमेकांशी कोरलेले आहेत असे लिहिलेले आहे. कार्ल्यांच्या लेण्यात महारथी गोतीपुत्त अगिमितनाक आणि महारथी वसिथीपुत्त सोमदेव यांचा निर्देश केलेला आहे. महारथी वसिथीपुत्त सोमदेवाने कार्ल्याच्या लेणीला एक गाव इनाम दिल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सोमदेवाचा अधिकार तेथील तालुका प्रदेशावर अथवा जिल्ह्यावर असला पाहिजे. आणि गाव इनाम देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असला पाहिजे. कान्हेरीच्या लेण्यात महारथी नागमूलनिकाचे नाव आढळते, ती एका महाभोज राजाची बहीण आहे, असे म्हटले आहे. कार्ल्याला असलेल्या एका सिंहस्तंभावर तो स्तंभ महारथी अगिमितनाक याने दान केला आहे, असा उल्लेख आहे. कान्हेरीला असलेल्या एका शिलालेखात एका देणगीदार स्त्रीचे नाव नागमूलनिका असून तिच्या मुलाचे नाव स्कंधनाक आहे, असे म्हटले आहे.
डॉ. आळतेकर म्हणतात की, इ.स. पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अगोदर असलेली रथी आणि महारथींची राज्ये, आंध्राचे राज्य, महाराष्ट्रावर आल्यावर संपुष्टात आली असली पाहिजेत. ते पुढे म्हणतात की, भोज आणि रथिक लोकांच्या नावापुढे "नाक' हे संबोधन लावलेले आढळते त्यावरून रथिक आणि भोज लोक हे स्थानिक "नाग' जमातीचे असावेत किंवा ते नागाची पूजा तरी करीत असावेत.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या बौद्ध लेण्यातील शिलालेखनात नावाच्या पुढे "नाक' हे उपपद असलेल्या नावांची यादी खाली दिली आहे.
कान्हेरी लेण्यातील शिलालेखात - नकनाक अपरनाक, धमनाक, गोलनाक, मित्तनाक.
भाजा येथील शिलालेखात - अंपीनाक, किंवा अहीकीनाक.
कुडा येथील शिलालेखात - वसूलनाक, पुसनाक.
बेडसा येथील शिलालेखात - नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक अपरदेवनाक. याची बायको महाभोजाची मुलगी महारथीनी महादेवी सामादिनिका.
कार्ला येथील शिलालेखात - महारथी अगिमितनाक, मितदेवनाक, उसभनाक.
शिवनेरी येथील लेण्यातील शिलालेखात - वीररसेनाक.
नाशिक येथील लेण्यातील शिलालेखात - राजमंत्री अरहलय-चालीसनाक राजमंत्री अगीयतनाक, कफननाक, रामनाक, वगैरे.
"नाक' हे उपपद नावाच्या शेवटी असल्यामुळे रथी आणि भोज लोक हे स्थागित नाग जमातीचे असावेत किंवा ती नागाची पूजा करणारी जमात असावी या डॉ. आळतेकरांनी काढलेल्या निष्कर्षाला त्यांनी काही आधार दिलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या शतकापर्यंत "नाक' हे उपपद नावाच्या शेवटी लावणारी महार जमात आहे. सातारचे राज्य स्थापण्यास शिदनाक महाराने शाहू महाराजांची बाजू घेतली व अनेक लढ्यात पराक्रम केला. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्याला सांगली जिल्ह्यातील कळंबची जहागिरी दिली. त्याचा नातू शिदनाक याने आणि त्याच्या सैन्याने खर्ड्याच्या लढाईत पठाणांनी केलेल्या हल्ल्यात परशुरामभाऊ पटवर्धनाचा जीव वाचवला. नागेवाडीच्या पाटीलकीचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी नागनाक महाराने छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून मोगलांच्यापासून वाई जवळील वैराटगट जिंकून घेऊन घारादिव्य केले. त्याचप्रमाणे अमृतनाक आणि अंबरनाक महारांनी निझामशाही आणि बिदरच्या बहामनी बादशहांकडून महाराजांच्या बावन्न हक्कांच्या सनदी मिळविल्या.
इ.स. 1818 साली कोरेगाव येथे पेशवाईची शेवटची लढाई झाली. पुणे-अहमदनगर रस्त्यावर भीमानदीच्या किनारी एक रणस्तंभ आहे. त्याचे मुळचे नाव महास्तंभ असे होते. त्या स्तंभावर कोरेगावच्या लढाईत कामाला आलेल्या ज्या शूर महावीरांची नावे आहेत ती "नाक' हे उपपद शेवटी असलेली आहेत. उदा. सोमनाक, कमलनाक, रामनाक, येमनाक, गोदनाक, कोठेनाक, येसनाक इत्यादी.
नाक हे उपपद लावण्याच्या रिवाजावरून पूर्वींचे रथी-महारथी आणि भोज महाभोज म्हणजेच हल्लीचे अस्पृश्य समजले जाणारे लोक असावेत असे वाटते. राजभोज हे आडनाव पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यात ठिकठिकाणी आढळते.
आंध्रच्या सातवाहनांची आपल्या राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करतांना त्यांना रथी-महारथींनी तसेच भोज-महाभोजांनी बराच विरोध केला असला पाहिजे. म्हणून त्यांना "अरि' म्हणजे शत्रू असे नाव पडले असले पाहिजे. त्यावरूनच अरियके असे नाव रथी-महापरथींच्या प्रदेशाला इ.स. पूर्वी पहिल्या शतकात पडले असले पाहिले आणि म्हणूनच टोलेमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला अरियके असे म्हटले आहे असे वाटते.े
मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य(इ.स.पूर्वी 324 ते इ.स.पूर्वी 300)याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता किंवा नव्हता आणि होत असल्यास महाराष्ट्राच्या कोणत्या भागापर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते ह्याचा निश्चित पुरावा अजुन मिळाला नाही.पण त्याचा नातू सम्राट अशोक(इ.स.पूर्व274 ते 23) ह्याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होत होता ह्याचा निश्चित पुरावा सापडतो.
सम्राट अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्याजील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्याची प्रांतिक राजधानी होती.
मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्पमित्र नावाच्या एका सेनापतीने त्याला कपटाने मारले(इ.स.पूर्वी 184) आणि मौर्याचे राज्य बळकावले.जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते,तरी महाराष्ट्रात त्यांची छोटी छोटी राज्य बराच काळपर्यंत अस्तित्वात होती.चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्यांचा इ.स.625 च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला असा ताम्रपटात उल्लेख आहे.
मा. श. मोरे



Monday, February 7, 2011

कॉम्रेड शरद्‌ पाटील


खरे आयडॉल प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील
किशोर मांदळे
सर्वच चळवळींना अरिष्टात सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते. कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्‌ पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्‌ पाटलांची कोंडी करण्यासाठी जरी मौनाचा कट केला असला तरी परिवर्तनवादी अस्वस्थ तरूणांचे जथे या प्रस्थापितांपासून आता सरकत आहेत. शरद्‌ पाटलांचे साहित्य मिळवून मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. त्यांचे समग्र योगदान त्यांची दार्शनिक महता या छोट्या लेखात सामावणे शक्य नाही म्हणून संक्षेपावरच समाधान मानावे लागेल.
चक्रधर, बसवराजांच्या अब्राह्यणी प्रबोधनानंतर संत तुकारामांच्या नेतृत्वाखालील वारकरी संप्रदायाची प्रबोधन चळवळ विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर तेवढीच प्रभावी चळवळ झाली ती अव्वल इंग्रजी राजवटीत सत्यशोधक समाजाची, जिचे प्रवर्तक होते महात्मा फुले. या चळवळीची महाराष्ट्रात जी प्रभावक्षेत्रे होती त्यात खानदेशातील धुळे परिसर एक प्रमुख केंद्र होते. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावच्या वतनी भामरे (पाटील)कुटुंबावर साहजिकच सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. या ज्ञानलालसी कुटुंबातून आलेले आत्माराम पाटील हे शिक्षणक्षेत्रात डेप्युटी (शाळा तपासनीस) या हुद्यावर कार्यरत होते. सत्यशोधक चळवळींच्या प्रभावाने त्यांनी आपले नाव बदलून तान्हाजी असे घेतले व पत्नीचे नाव मंदोदरी असे ठेवले. या सत्यशोधकी दाम्पत्यापोटी 1925च्या 17 सप्टेंबरला धुळे शहरातच शरद्‌ पाटलांचा जन्म झाला. असामान्य आणि पराकोटीची ज्ञानतृष्णा अगदी लहानवयातच शरद्‌ पाटलांच्या ठायी दिसून आली. "टाईम्स'ने प्रकाशित केलेले "टोटल शेक्सपिअर' त्यांनी समग्र वाचून काढले. तेच मुळी वयाच्या अकराव्या वर्षी. रामायण-महाभारत या महाकाव्यांचे वाचनही त्यांनी या वयातच केले होते. वयाच्या सतराव्या वर्षी धुळ्यातच मॅट्रिक्युलेशन पूर्ण करून ते पेंटींग कोर्ससाठी बडोद्याच्या कलाभवनात दाखल झाले. तेथे एक वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते मुंबईच्या प्रतिष्ठित "जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये दाखल झाले. कलावंताचा पिंड असलेल्या शरद्‌ पाटलांच्या व्यक्तीमत्वात सत्यशोधकी जाणीवेचाही एक प्रखर पोत होता, जो त्यांना 1945 च्या पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ओढून घेऊन गेला. चळवळ्या मंडळींच्या संपर्काने त्यांचा साम्यवादी तत्वज्ञानाशी परिचय झाला. आर्टस्कूलचे शिक्षण मागे पडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात चित्रकार म्हणून काम करू लागले. शरद्‌ पाटील आता जीवनदानी कार्यकर्ते बनलेले कॉम्रेड शरद्‌ पाटील झाले होते.
1947 साली पक्षाने त्यांना धुळ्यात ट्रेड युनियन आघाडीवर पाठविले आणि 1950 ला एक वर्षाची हद्दपारी भोगून ते शेतकरी आघाडीवर कार्यरत झाले. कम्युनिस्ट शिस्तीने काम करतानाच त्यांनी 1956 पर्यंत बहुतांशी मार्क्सवादी साहित्य वाचून काढले होते. वयाची तिशी ओलांडताना ते आदिवासींच्या समस्यांना भिडले व धुळे-नंदुरबारच्या आदिवासीबहुल इलाख्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा व्यापक व भरभक्कम जनतळ उभारला. पुढच्या काळावर भारत-चीन संघर्षामुळे कम्युनिस्टविरोधाचे सावट होते. सरकारनेही कम्युनिस्ट नेतृत्वाची धरपकड चालविली होती. शरद्‌ पाटलांची रवानगी हर्सूल जेलमध्ये झाली. तेथेच त्यांनी पुन्हा एकदा मार्क्सचा दास कॅपिटल टिप्पणांसह तीनवेळा वाचून काढला. मार्क्सचे दुसऱ्या खंडातील एक चुकलेले बीजगणित त्यांनी येरवडा जेलमध्ये असलेल्या कॉ. बी.टी. रणदिवेंना पत्र लिहून कळविले ते याच काळात.
भारतीय समाजाचे, सवार्ंंना स्वच्छपणे दिसणारे जातीव्यवस्थेचे वास्तव फक्त कम्युनिस्ट नवब्राह्यणी नेतृत्वाला दिसत नव्हते व आजही दिसत नाही! पक्षसदस्य नोंदणी तक्त्यात कॉ. शरद्‌ पाटील वर्गाबरोबर जातही लिहून घेत. हाही पक्षामध्ये संघर्षाचा मुद्दा झाला. माकपच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद आता अटळच होते. शूद्राने जेवढे जाणायचे त्यापेक्षा जास्त जाणण्याचे पाखंड नवब्राह्यणी नेतृत्वाच्या नजरेतून सुटण्यासारखे नव्हते. दोन तुरूंगवास भोगून 1966 ला जेव्हा ते संशोधनासाठी बडोद्याला निघाले तेव्हा, चळवळीची हमाली सोडून स्कॉलर बनण्याचा उद्योग करतोय, ही शेरेबाजी त्यांना ऐकावी लागली. संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविल्याशिवाय भारतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पाड लागू शकत नाही. या क्षेत्राचे नियंते प्राय: संस्कृतज्ञ आहेत व या वैदिक पंडितांशीच भविष्यात आपला महासंघर्ष होणार आहे हे जाणून त्यांनी वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षीही संस्कृत-पाणिनी शिकण्याची जिद्द बाळगली. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पहिले वर्ष संस्कृत-पाणिनीचे अध्ययन करण्यातच खर्ची घातले. विद्याभास्कर मणिशंकर उपाध्यायांनी त्यांना प्रवेश दिला खरा. पण, या बुजुर्ग विद्यार्थ्याने उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी मणिशंकरजींनाही रात्र रात्र जागून काढावी लागत असे. कारण, या शंका त्यांना पूर्वीच्या पढीक विद्यार्थ्यांनी मुळीच विचारल्या नव्हत्या.
बडोद्यावरून परतल्यानंतर आदिवासीभागात साक्री येथे चळवळ आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी स्वत:ला जुंपून घेतले.तेव्हापासून, दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे व रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी...हेच त्यांचे प्राक्तन बनले ते आजतागायत. आज वयाच्या पंच्याऐंशीतही त्यांची रस्त्यावरची लढाई आणि पुस्तकांशी झुंजणे सुरूच आहे.
हद्दपारी, तुरूंगवास हिच काय ती "कमाई' असणाऱ्या व सतत प्रज्ञेच्या पातळीवर जगणाऱ्या या दार्शनिकाचा संसार चालविण्याचा "योग' जिने सिद्धीस नेला. त्या आपल्या सहधर्मचारिणीला-सुशिलाताईंनाच त्यांनी, पंधरा वर्षाच्या ज्ञानसाधनेतून निर्मिलेला पहिला खंड (दास-शूद्र-स्लेव्हरी) अर्पण केला आहे.
हा खंड त्यांनी अन्न-आच्छादन-निवाहापासून पुस्तकांपर्यंत सर्व साधनेे जुळवताना विपन्नावस्था व ज्ञानक्षेत्रातील उपेक्षा यांना एकाकीपणे तोंड देत निर्मिला आहे. मात्र त्यांच्या या पहिल्याच कृतीने तत्वज्ञ आणि विचारवंताच्या वर्तुळात निर्माण झालेला दरारा त्यानंतर कोणालाही रोखता आला नाही. मार्क्सवादाची एकप्रवाही वर्गवादी अन्वेषणपद्धत नाकारून त्यांनी वर्णजातीवर्गवादी अन्वेषणपद्धतीने केलेल्या या नव्या मीमांसेची दखल दिग्गजांना घ्यावीच लागली. भारतीय दासप्रथांची व त्यांच्या तत्वज्ञानांच्या उगमांची ही अन्विक्षा जरी 1972 लाच लिहून पूर्ण झाली असली तरी हा खंड प्रकाशित व्हायला एक दशक लागले. वाईचे प्राज्ञ प्रकाशन, प्रा. मे. पुं. रेगे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा यासंबंधात त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. दरम्यान, जातीव्यवस्थेविरूद्ध लढायला नकार देणाऱ्या माकपचा 27 जुलै 1978 ला राजीनामा देऊन कॉ. पाटलांनी स्वतंत्र वाट चोखाळत 15 ऑक्टोबर 1978 ला मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवादावर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. 1982 ला त्यांनी या पक्षाचे मुखपत्र "सत्यशोधक मार्क्सवादी' सुरू केले. एक दशकभर या मासिकाने डाव्या कार्यकर्त्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आजही सत्यशोधक मार्क्सवादीच्या जुन्या अंकांना मागणी आहे. पुढे पाच वर्षांनी पहिल्या खंडाचा दुसरा भागही प्रकाशित झाला. भारतीय इतिहास व तत्वज्ञानाकडे ब्राह्यणी व अब्राह्यणी या मुख्य विभाजनातून पाहण्याचा दंडक घालून देणारे दार्शनिक ही त्यांची ओळख स्थिर होत असतानाच त्यांचा रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष (1986) हा तिसरा भाग प्रकाशित झाला. शंबूक, एकलव्य, सीता, कर्ण, द्रौपदी, विदुर व कृष्ण या मिथकांचा त्यांनी विज्ञानवादी आकलनातून, वास्तवाने केलेला परिहार सर्व परिवर्तनवादी प्रबोधकांनी आवर्जून वाचायला पाहिजे.
पहिल्या खंडासाठी त्यांनी आयुष्याची पंधरा वर्षे खर्ची घातली होती. तर अठरा वर्षांच्या संशोधनातून दुसरा खंड स्वामी-सेवक संबंधावरील, जातीप्रथेच्या उगमविकासाचा जिवंत विषय घेऊन अवतरला-जातीव्यवस्थापक सामंती सेवकत्व (1996) या खंडात अब्राह्यणी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीला "समाजवादी सौत्रांतिकवादी' सौंदर्यशास्त्राची जोड मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात फूट पडून आधीचे निर्णायक एकाकीपण आणखी गहिरे झाले होते. या खंडाच्या अर्पणपत्रिकेेेेेेेतही हा एकाकीपणा बुद्ध वचनाच्या साक्षीने आला आहे.
दुसरा खंड तुर्कपूर्व भारतीय सामंतप्रथेतील दार्शनिक व सौंदर्यशास्त्रीय संघर्षावर प्रकाश टाकतो. भारतीय मार्क्सवादी वर्ण-जात समाजाची अनन्यता झटकून"वर्गाचे ब्रह्य' सोडायला आजही तयार नाहीत. जातीव्यवस्थेसह सर्व विषमता या वर्ग नावाच्या ब्रह्याच्या पोटात असल्याचा त्यांचा लाडका आग्रह आहे. (ब्रह्य नाश पावत नसल्याने मग मुक्ती कशी मिळणार?-इति शरद्‌ पाटील) कॉ. शरद्‌ पाटलांनी मार्क्सवाद एकप्रवाही व म्हणूनच अपुरा असल्याचे सर्वप्रथम लक्षात आणून दिले. शिवाय त्यांनी कर्मठ मार्क्सवाद्यांना बजावले आहे की, मार्क्सवादाला अखेरचा शब्द समजणे हेच मुळी ऐतिहासिक भौतिकवादात बसणारे नाही. मार्क्सवाद हे केवळ जाणीवेचे शास्त्र असल्याने ते अद्वैती आकलनात फसले आहे. मनाच्या द्वैती (जाणीव-नेणिवयुक्त) स्वरूपाच्या प्रमाणशास्त्रात दिग्रागाने (इ.स.चौथे शतक) केलेला उपयोग व दिग्राग स्कूलच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची दखल या खंडात घेण्यात आली आहे. मार्क्सवादाचे प्रतिबिंबक प्रमाणशास्त्र, वर्ग समाजाचेसुद्धा सम्यक आकलन करू शकत नसल्याने ते भारतीय जात-वर्ग समाजाला लावण्याचा खटाटोप कसा निरर्थक आहे ते सांगून त्यांनी, नव्या सौंदर्यशास्त्राचा आग्रह धरला आहे. नेणिवेत ढकलेल्या स्त्रीराज्याच्या समतामूल्यांची उकल हाेऊन ती परिणत साहित्य बनून कादंबरीसारख्या माध्यमातून कशी दृगोचर होतात, हे खुद्द सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या साहित्यातून दिसते. एकाच इयत्तेसाठी चार वर्षे शाळेत काढून व अक्षरओळखही विसरलेल्या नजुबाई ते पहिल्या आदिवासी लेखिका कॉम्रेड नजुबाई हा त्यांचा प्रवास नेणिवेच्या प्रमाणशास्त्राचे यश आहे. "स्त्री-शुद्रांच्या स्वराज्याचा राजा' (1998) हे स्वत: शरद्‌ पाटलांनी लिहिलेले नाटकही या प्रमाणशास्त्राचा वस्तुपाठ आहे. ब्राह्यणी अलंकारशास्त्रही प्रतिबिंबवादी असल्याने ते प्रस्थापितताच निर्माण करील, नवसमाज नव्हे. म्हणून जुने प्रतिबिंबवादी सौंदर्यशास्त्र सोडून नेणिवेचे जास्त भेदक व समर्पक सौंदर्यशास्त्र स्वीकारल्याशिवाय मन बदलता येणार नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. (मने कशी बदलायची हा प्रश्न तत्त्ववेत्यांनी अनुत्तरीत ठेवला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.)
सर्वहारांचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र असल्याशिवाय व लेखकाला जाणीव-नेणिव प्रक्रिया उमजल्याशिवाय तो सर्वश्रेष्ठ निर्मिती करू शकणार नाही. या सौंदर्यशास्त्राचे मिशन व सामर्थ्य मनाचे मुलभूत परिवर्तन हेच आहे व "मी समाजवादी समाजाची निर्मिती करतो आहे' हा आत्मविश्वास त्यामुळे कलावंताला मिळेल एवढा आवाका कॉ. शरद्‌ पाटलांनी या सौंदर्यशास्त्रातून उद्‌घोषित केला आहे.
दुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागात त्यांनी शिवाजी-संभाजीच्या जातीअंतक समतावादी, शाक्त हौतात्म्याचा धगधगता विषय हाताळला आहे- शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्यणी? (1991) मध्ययुगीन राजकीय संघर्षाला हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा रंग देण्याचा ब्राह्यणी बनाव तर येथे सप्रमाण उघड केलाच आहे, पण शिवाजी-संभाजीचे हौतात्म्य ही अब्राह्यणी प्रबोधनाची अमोघ अस्त्रे होऊ शकतात, हा विश्वास सर्व परिवर्तनवाद्यांना या पुस्तकाने दिला आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्या ज्या वेगाने संपल्या आहेत त्यावरूनही भारतीय समाजक्रांतीच्या अब्राह्यणी प्रबोधनात या पुस्तकाची प्रस्तुतता स्पष्ट होते.
स्वत:ची प्रबोधनआघाडी सुद्धा नसलेल्या डाव्यापक्षांकडून शरद्‌ पाटलांचे साहित्य समजायला कठीण असल्याचा प्रचार मात्र आवर्जून केला जातो. वास्तविक, त्यांनी केलेला संकल्पनांचा विकास समजून घेतला की हे साहित्य समजायला मुळीच कठीण नाही, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. मार्क्सवाद त्याच्या एकप्रवाही अन्वेषण पद्धतीमुळे वर्ग समाजाशिवाय कशाचाही अभ्यास करू देत नाही. त्यामुळे भारतीय जातवर्ग समाजाच्या आकलनासाठी शरद्‌ पाटलांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला पर्याय नाही. त्यांनी आपल्या अन्वेषण पद्धतीला "विधायक-अब्राह्यणी' म्हटले आहे. कारण, नकारात्मक अब्राह्यणी अन्वेषण हे प्रबोधनाला उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ, राम व कृष्ण यांचे भारतीय इतिहासाला काय योगदान आहे ते स्पष्ट करूनच, ते जनमानसात परमेश्वरपदी कसे पोहोचले ते उलगडून दाखवता येईल. त्यामुळे त्यांचे देवत्व गळून मानवीपण ठळक झाल्याने त्यांच्या भक्तीतून बहुजनसमाज मुक्त होईल व तो भारतीय इतिहासाकडे भौतिकवादी दृष्टीने बघायला सक्षम होईल. शरद्‌ पाटलांच्या "बहुप्रवाही विधायक अब्राह्यणी ऐतिहासिक भौतिकवादी' अन्वेषण पद्धतीचे हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा परिचय त्यांच्या तिसऱ्या खंडात जास्त ठळक होतो. "जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती' (2003) हा तिसरा खंड, भारतीय समाजाचे सरंजामी वास्तव रेखाटतो व धार्मिक मूलतत्ववाद व जातीयवादाला पुढे घालून उजवे पक्ष जी औपचारिक लोकशाही हाताळत आहेत; त्यातील भ्रामक विकास, आरक्षण व शोषितांमधील विद्रोहींना सामावून घेणारी बहुस्तरसत्ताक राजनीती यावर प्रकाश टाकतोच पण, मार्क्सवादाच्या अपुरेपणामुळे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्षांचे लोकशाही क्रांतीचे "ब्रॅण्ड' असे हतबल झाले आहेत, तेही स्वच्छपणे दाखवून देतो. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आग्रह धरताना वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंकडील वरकड जमीन गरीब शेतकरी- शेतमजुरात वाटण्यासाठी जातीअंताचा लढा कसा अटळ आहे, यावरही प्रकाश टाकतो. जगभर समाजवाद उभारणीच्या प्रयत्नांना आलेले अपयश मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टामुळेच कसे आहे ते स्पष्ट करून मार्क्सवादापेक्षा उच्चतर वाद (इझम) आल्याशिवाय समाजवाद उभारणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतो. त्यासाठी बौद्ध दिग्राग स्कूलचे प्रमाणशास्त्र व मार्क्सवादाच्या संयोगातून निर्मिलेल्या नव्या "सौत्रांतिक दर्शना'चा आग्रह धरतो.
भारताचा समग्र इतिहास तीन खंडात लिहिल्यानंतर या महान तत्ववेत्त्याने वयाची चौऱ्यांशी पार करताना "क्रांतीचे तत्वज्ञानात्मक शस्त्रागार' ठरू शकणारा चौथा खंड "प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मॅट्रीऑर्की-गायनोक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' लिहून हातावेगळा केला आहे. सध्या त्याचे मराठी भाषांतर (प्राथमिक समाजवाद, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व आधुनिक समाजवाद) करण्यात ते व्यग्र आहेत. क्रांतीकारी चळवळीसाठी तत्वज्ञान हा कळीचा मुद्दा असतो. आपल्या राजकीय पक्षाचा तात्विक पाया मूलग्राही व विस्तृत असावा या कळकळीतून त्यांनी ही साहित्यनिर्मिती केली आहे. भारतात तरी राजकीय पक्षांच्या संस्थापकांपैकी, प्राच्याविद्यापंडीत कॉ. शरद्‌ पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता कुणाही संस्थापकाने असे साहित्य निर्माण केलेले नाही.
सर्व मार्क्सवादी पंडितांनी मॉर्गन-एंगल्सचे प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे मॉडेल ग्राह्य धरल्याने त्यांचे मातृसत्ता-स्त्रीसत्तेच्या ऐतिहासिक वास्तवतेकडे दुर्लक्ष झाले. मार्क्सवाद्यांच्या डोक्यावरील प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे भूत उतरविण्यासाठी शरद्‌ पाटलांनी स्त्रीराज्याच्या समता- लोकशाहीचा आजच्या समाजवादी लोकशाहीसाठी सापेक्षतेने स्वीकार करण्याचा आग्रह धरला आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेताना वेदांची आर्षभाषा ही सिंधू खोऱ्यातील ऋतींच्या वैराज-स्त्रीराज्याची बोलीभाषा होती, ती युरोपातून आलेली नव्हती हे त्यांनी सिद्ध केले. शेतीचा शोध लावणारी स्त्री क्षेत्र वा क्षत्र असून पुरूष "रेतो-धां' आकाश म्हणून ब्रह्यन्‌ आहे, हे दाखवून देताना त्यांनी, भारतीय इतिहासाची सुरूवात वैदिकी श्रृतीने नव्हे तर (कृषीमायेच्या) तांत्रिकी श्रृतीने होते याकडे लक्ष वेधले, निर्ऋति ही सिंधू संस्कृतीच्या ऋतींच्या पहिल्या ज्ञात स्त्रीसत्तेची देवी होती हेही त्यांनी सिद्ध केले. वैदिक पंडीत एम. ए. मेहंदळे यांच्याशी कॉ. पाटलांचा वर्षभर वाद झाला तो निर्ऋतीच्या व्युत्पत्तीवरच नैर्ऋत व निर्ऋतीची संतान आर्यांकडून पराभूत होऊन दास झाल्यानंतर भारतीय सौंदर्याचा आदर्श काळा (रंग) न राहता गोरा झाला!(खंड2, पा. 174) स्त्रीराज्यांचे शास्तेपद जाऊन पितृवंशक राजपदे कशी अस्तित्वात आली व पुढे वर्णसमाज, जातीसमाज व आजचा जातवर्गसमाज असा भारतीय इतिहासाचा त्यांनी पूर्वीच्या तीन खंडातच संशोधनात्मक मागोवा घेतला आहे. चौथा खंड, भारतीय नवसाम्राज्यशाहीविरोधी जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची लढाई कशी अटळ आहे हे सांगून आधुनिक समाजवाद उभारणीचा क्रांतदर्शी मार्ग दाखवेल.
जागतिक साम्यवादी चळवळीला कॉ. शरद्‌ पाटलांचे योगदान तत्वज्ञानात्मक व मेथडॉलॉजीचेही आहे. तत्वज्ञानात त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवादाची नवी भर घातली आहे तर बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद ही त्यांची मेथडॉलॉजी आहे. समाजवादी सौत्रांतिकवादाची त्यांची निर्मिती मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टातील सौंदर्यशास्त्राचा अपुरेपणा भरून काढेल. लॉजिकचा विकास करताना फॉर्मल-आकारिक तर्कशास्त्राच्या पुळे जाऊन मानवी मन बदलणारे डायलेक्टिकल लॉजिक त्यांनी उद्‌घोषित केले आहे. कॉ. पाटलांच्या मते, भारतीय जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचे नेतृत्व औद्योगिक सर्वहारामधील अवर्ण व जुने अवर्ण सर्वहाराच करू शकतील. या क्रांतीच्या व्यूहरचना व डावपेचात तिच्या या अधिनायकांना भांडवलदारी लोकशाही सांगता करणारा समाजवादी संक्रमणाचाही आराखडा तयार ठेवावा लागेल. अन्यथा, क्रांती उलटून देश पुन्हा जातवर्गीय कर्दमात फसेल. या क्रांतीच्या अधिनायकाचे डोळे व चष्मा सौत्रांतिक मार्क्सवादी पक्षाच असू शकेल.
भारतातील कम्युनिस्ट पक्षांनी जात्यन्तक समतेच्या समाजक्रांतीला अव्हेरण्याचे मूलगामी कारण तत्वज्ञानात्मकच आहे, हे उमजल्यानंतर या महान दार्शनिकाचा माकपचे "थिओरेटिशिऊन' बसवपुन्नया व ई.एम.एस. नंबुदिरीपादांशी प्रदीर्घ वैचारिक संघर्ष झाला आहे. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (1993).
या कृतीमध्ये तो विस्ताराने आला आहे. येथे विस्तारभयास्तव तो समग्र देता येणार नसल्याने त्याची फक्त नोंद करून ठेवतो. पण भारतीय मार्क्सवाद्यांचे ब्राह्यणी नेणिवेचे हे तर्कशास्त्र भुईसपाट करण्यासाठी कॉ. शरद्‌ पाटलांनी आपली उभी हयात खर्च केली आहे आणि हे ऐतिहासिक उत्तरदायित्व मलाच निभयवायचे आहे. ही बोधी ज्यांना ज्या क्षणी प्राप्त झाली तो क्षण त्यांना "भारतीय अब्राह्यणी प्रबोधनाचे महावाक्य' बनवून गेला!
चित्रकार-शिल्पकार, जीवनदानी साम्यवादी नेते, कठोर शिस्तीचे संघटक, राजकीय पक्षाचे संस्थापक, प्राच्यविद्यापंडीत आणि जागतिक साम्यवादी चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान दार्शनिक असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी प्रवास आहे. पण, त्यांची चिरेबंद लेखनशैली व धारदार वक्तृत्व या सर्वावरील कळसाध्याय आहे. रामायण-महाभारतावरील त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या अभिनत वक्तृवशैलीचे सर्व पैलू अविष्कृत झाले आहेत.
सर्वच समतावादी दार्शनिकांना ब्राह्यणी छावणीकडून जे "प्रेम' मिळते ते शरद्‌ पाटलांनाही भरभरून मिळाले. त्यात नवब्राह्यणी मार्क्सवादीही मागे नव्हते. पण, इतिहासातील आपल्या सर्व पूवर्र्सुरींचा दाखला हाताशी असल्याने त्यांनी कुणालाही स्वत:वर मात करू दिली नाही. घोर उपेक्षेचा ज्वर त्यांनी निर्धारपूर्वक अंगावरच काढला. जंबुद्धिपाच्या मातीला, सिंधू खोऱ्याला प्रारंभी समतेचा अंगचाच गंध होता व विषमतावादी छावणीच्या प्रतिचढाईनंतरही ही माती "करूणा आणि मेत्ता' ही मूल्ये प्रसवतच राहिली. वैदिकांनी तिच्या सर्व समतावादी अधिनायकांना बदनाम करून बहुजनांच्या नेणिवेत दफन केले. नेणिवेच्या या वैराण दफनभूमीवर आज दोन हजार वर्षानंतर हा महत्तम दार्शनिक एकटाच गेला. या वैराणभूमीतील नेणिवेचे सर्व प्रस्तर त्याने प्रचंड प्रयासाने अविस्तपणे उकलून काढले. त्यातून चार खंडात विभागलेली साहित्यकृती जन्मली. हे क्रांतीचे शस्त्रागार-महाभांडार घडविणाऱ्या व्यक्तीची दुनिया व आपली व्यवहाराच्या कर्दमात रूतलेली दुनिया यात विलक्षण अंतर पडते. हे अंतर ज्यांना समजले नाही, त्यांना कॉ. शरद्‌ पाटलांचा "स्व-भाव' ही कसा समजावा?
चार खंडाव्यतिरिक्त अब्राह्यणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (1988) यासारख्या त्यांच्या अन्यकृतींचा व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लढ्यांचा जागेभावी या लेखात समावेश करता आलेला नाही. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांस्कृतिक चळवळी, परिषदा व स्वतंत्र आदिवासी (जनस्थान) राज्यासाठी केलेला संघर्ष, तसेच 1970 पासून त्यांनी आदिवासींच्या वनजमिनी त्यांच्या मालकीहक्काच्या व्हाव्यात म्हणून केलेल्या संघर्षामुळे तसा कायदा केंद्र सरकारला करावा लागला. त्या अभूतपूर्व लढ्याचाही येथे तपशील देता आलेला नाही. सुरूवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे या प्रचंड ऊर्जेच्या महाकाय व्यक्तिमत्वाचा सर्वकष वेध घेणे, छोटेखानी लेखात शक्य नाही.
कॉ. शरद्‌ पाटलांच्या साहित्याचे तरूण अभ्यासक संजीवकुमार कांबळे बरेचदा मोबाईलवरून त्यांच्या साहित्याविषयी उत्साहाने बोलत असतात. शरद्‌ पाटलांनी उभ्या केलेल्या मीमांसेबद्दल त्यांना मूलग्राही विश्वास आहे. एकदा ते असेच उत्स्फूर्तपणे बोलून गेले की... बुद्धानंतर त्या श्रेणीचा बुद्ध झाला नाही हे खरे, पण कॉम्रेड शरद्‌ पाटीलच आपले बुद्ध आहेत असे मानले तर.. हा आपला शेवटचा बुद्ध आहे!

Wednesday, November 17, 2010

Tuesday, November 16, 2010

com. sharad patil








बिगर आदिवासींच्या साहित्यात खूप विसंगती


आद्य आदिवासी व स्त्रिसत्तेच्या कादंबरीकार
कॉ.नजूबाई गावित यांचे प्रतिपादन

दि. 31 सप्टेंबर 2010
पुणे/प्रतिनिधी
देशात आणि राज्यातही खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावर साहित्य लिहिलं गेलेलं नाही, परंतु ज्या बिगर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासींबद्दल जे साहित्य लिहिलं त्यात मोठया प्रमाणावर विसंगती आहेत. आदिवासींचं अस्सल साहित्य त्यांच्या कला, नृत्य, वाद्य, कलेत विविध स्तरावर विखुरलेले असल्याचं प्रतिपादन आद्य आदिवासी व स्त्रिसत्तेच्या कादंबरीकार कॉ.नजूबाई गावित यांनी केलं
भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील एकमेव असलेले प्राच्यविद्यापंडित तथा दार्शनिक कॉ. शरद पाटील यांच्या "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या प्रकाशन सोहळया प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी युनिव्हर्सलचे कार्पोरेश(अमेरिका) प्रमुख किशोर देशपांडे, पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रा. प्रदीप गोखले, संस्कृततज्ज्ञ तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे , प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद्‌ पाटील आणि मावळाई प्रकाशनाचे प्रमुख डॉ. सुभाष गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासींच्या सर्व देव-देवता या दगड-गोटयाच्या बनलेल्या आहेत,
आम्ही आत्ताच गुजरातमधील डांगमध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी शबरीचे मंदीर काही लोकांनी बनविले आहे, ते देवूळ आदिवासींचे बिल्कुल नसून पांढरपेशी लोकांचे आहे, त्याचा आणि शबरीचा काहीही संबंध नाही. कारण आमच्या शबरीचा अवतार असा असूच शकत नाही. रामाने शबरीचे बोरे खाल्ले असे वैदिकांनी म्हटले असून ते पूर्णपणे खोटे आहे. ती त्यावेळी तिथल्या स्त्रीसत्ताक राज्याची राणी होती, हे अजूनही लोकांच्या स्मृतीत असल्याच्या कथा ते एकमेकांना सांगतात. जिथं जातीव्यवस्थेमध्ये आम्हाला उच्चवर्णिय चपलाच्या जवळही ठेवत नाहीत, तिथं बोरे खाण्याचा प्रश्न येतो कुठे? रामायण काळ असो की, आजचा काळ इथं अजूनही जातिव्यवस्था "जशीन्‌ तशीच हाय' हे आपण मान्य केले पाहिजे. कॉ. शरद्‌ पाटील यांनी मानव समाजाचा इतिहास सुरुवातील स्त्री सत्तेपासून पितृसत्तेपर्यंत व पुढे वर्ण आणि जातीव्यवस्थेपर्यंत कसा विकसित होत गेला हे आपल्या आयुष्यभराच्या संशोधनातून सांगितलं.
युनिव्हर्सल कार्पोरेशनचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाची सुरुवात सिंह आणि मानवाच्या एका कथेपासून केली. ते म्हणाले की, कॉ. शरद्‌ पाटील यांनी निर्माण केलेले संशोधन हे पाच दशकातील तत्वज्ञानाच्या विकासातील एक महत्वाचा जागतिक टप्पा म्हणून ओळखले जाईल. त्यांनी 30 वर्षांपूर्वी वर्णवाद्यांना दिलेले आव्हान आजतागायत कायम असून त्यांच्याकडून अजूनही या आव्हानाला त्यांना उत्तर देता आले नाही. आपल्या देशात मार्क्सवादी विचारधारा जी एकप्रवाही आहे, ती कॉ. शरद्‌ पाटील यांनी मार्क्सवादी-फुले-आंबेडकरवादी या विचाराच्या संयोगाने बहुप्रवाही केली. त्यानंतर याची मर्यादा लक्षात घेऊन पुढे सौतांत्रिक मार्क्सवादाची निर्मिती केली. यामुळेच त्यांचा हा चवथा खंड त्यांनी चीन, क्युबा, रशिया येथील क्रांतिकारी आणि समाजवादाच्या शोधात असणाऱ्या लोकांना अर्पण केला ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे असे सांगत शरद्‌ पाटील यांचे संशोधन हे जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख कशी निर्माण करते हे स्पष्ट केले.
डॉ. प्रदीप गोखले यांनी "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या पुस्तकाचे विमोचन केले. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत जात्यान्तासाठी नवे तत्वज्ञान कसे विकसित करण्यात आले आहे हे त्यांनी सविस्तर मांडले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संशोधक तथा संस्कृतपंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांनी यावेळी सांगितले की, कॉ. शरद्‌ पाटील यांनी भारतीय समाज रचनेच्या तत्वज्ञानाच्या चिंतनात अतिशय श्रेष्ठ दर्जाचे योगदान दिले असल्याने आपण त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. ते या ग्रंथात सिंधू संस्कृतीतल्या निर्ॠती या आद्यमाता हिचे विवेचन करीत तो स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक परंपरेचा प्रवाह आधुनिक काळाकडे घेऊ येतात. त्यांनी या ग्रंथात ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या विचारप्रवाहाचे वर्णन कॉन्शस आणि अनकॉन्शस हे शब्द नव्याने वापरुन नव्या तत्वज्ञानाचा विकास केला असल्याचं डॉ. साळुंखे यांनी सांगितलं.
मंचकावर मणिपूरमधील आदिवासींच्या मानवी हक्काबाबत गेल्या दहा वर्षांपासून उपोषणला बसलेल्या इरोम शर्मिला चानू व चीनमध्ये लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लिऊ झिबाओ यांच्या प्रतिमा लावल्या होत्या.या दोन्ही व्यक्तींनी लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी उभारलेल्या लढयाची माहिती कॉ. शरद्‌ पाटील यांनी आपल्या मनोगताच्या सुुरुवातीला सांगितली. मंचावर आणि त्यांच्या 4ध्या खंडाच्या पृष्टावर लावलेल्या देवी हरितीबाबत ते म्हणाले की, देवी हरितीचे हे शिल्प इंडो-ग्रिक काळात तयार झाले असून जगातील मातृदेवतेचे हे सर्वात सुंदर असलेले एकमेव शिल्प आहे. हरिती ही निसर्ग देवता आणि भूमाता असल्याचे मी सिध्द केले. आपटयांच्या डिक्शनरीत तीचा उल्लेख नाही. आपल्या देशात मातृसत्ता होती. आद्यधर्मसूत्रकार हारीत याने तिला आपली माता म्हटले होते. हारीतने या भूमातेचे कायदे काय होते याचे वर्णन केले आहे. त्याचे धर्मसूत्र वैदिकांनी लपवून ठेवले असले तरी त्याची विचारधाना त्यांना लपविला आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज दलित साहित्य हे ब्राह्मणी चळवळीला शरण गेलेले असल्याचे सांगत त्यांनी जिथे प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी जिथे बाबासाहेब थांबले तिथून आम्हाला पुढे जायचे की, नाही हा प्रश्न आता प्रत्येकांनी विचारला पाहिजे कारण प्रतिक्रांती आता आक्रमक पावले टाकत आहे. अशावेळी सगळयांनी एकत्र येवून जात्यांतक लोेकशाहीची पूर्वतयारी करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी साडेचार लक्ष एकर जमिनीपैकी सव्वा दोन एकर जमिनी भूमिहिनांना वाटल्या. असेच राज्यात आदिक सरकारने पुणे जिल्ह्यात भूमिहिनांना जमिनी वाटल्या होत्या. आज देशात समाजवादाची नवउभारणी करायची असेल तर देशात दोन कोटी 10 लाख हेक्टर जमीन शिल्लक असून तिच्या फेरवाटपाची मोठी गरज आहे. यासाठी येत्या काळा आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यात भूमिहिनांची परिषद आयोजित करणार आहोत. जात्यांतक लोकशाहीसाठी जमिनीच्या फेरवाटपाचे हे आंदोलन देशभर करावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी पावरी या आदिवासी वादनाचा निनाद परिसरात घुमविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. किशोर मांदळे यांनी केले तर प्रस्ताविक कॉ. रविंद्र घोगरे यांनी केले.

Monday, October 4, 2010

राममंदिराच्या विनाशक वादाची.......

राममंदिराच्या विनाशक वादाची सोडवणूक
कॉ. शरद्‌ पाटील, धुळे
राजकीय सत्तांतर(पाक्षिक) 14 जानेवारी 2001



सीता रामास-
"" न कथंचन सा कार्या गृहीतधनुषा त्वया
बुध्दिर्‌ वैरं विना हन्तुं राक्षसान्‌ दण्डकाश्रितान्‌!''
(""दंडकारण्यात राहणाऱ्या राक्षसांचा वध वैरावाचून करण्याची ती बुध्दी हातात धनुष्य धारण करुन, आपण कधीही आणू नका'')
3 जानेवारी 2001च्या "सकाळ'च्या पहिल्या पानावर "राममंदिराची प्रतिकृती आज अलाहाबादला आणणार' या शीर्षकाची बातमी आणि उपान्त्य पानावर पंतप्रधान वाजपेयींच्या राममंदिरावरील लेखाचा त्यांच्याच सांगण्यावरुन केलेला अनुवाद आहे. या लेखात बाजपेयींनी रामचाी धर्मातीत महत्ता दाखविण्यासाठी इक्बालची रामरबतक कविता उध्दृत केली आहे.
इक्बाल उर्दूचा महाकवी असला, तरी तो अश्रफ असल्यामुळे वाल्मिकी व व्यास या महाकवीप्रमाणे ब्राह्मणी कवी होता. तर एका बाजूला तो पाकिस्तानवादी होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या राष्ट्रगीतातील "हे आबरुहे गंगा वो दिन है याद तुझको, उतरा तेरे किनारे जब कारवॉं हमारा' हा चरण त्याचे ब्राह्मण्य दाखवतो. भारत व पाकिस्तानचा इतिहास आक्रमक आर्य गंगेकाळी उतरल्यापासून सुरु होतो काय? आर्यांचे आगमन भारताबाहेरुन न होता गंगेच्या पूर्वखोऱ्यातून झाले, हा "शोध' संघपरिवाराच्या "व्हाइस ऑफ इंडिया'च्या "आर्यन इव्हेजन थिअर अँड इंडियन नॅशनलिझम'(1993) या प्रकाशनाचे लेखक श्रीकांत तेलगेरी यांनी लावला आहे. भारत व पाकिस्तानचा इतिहास वैदिक श्रुतीच्या ब्राह्मणी ॠग्वेदाऐवजी सिंधू संस्कृतीच्या आद्य स्त्रीराज्याची राणी व तांत्रिक अब्राह्मणी ॠग्वेदाची उद्‌गाती निर्ॠती इच्यापासून सुरु होतो. हे मी "दास शुद्राची गुलामगिरी' व "प्राचीन भारताचा सिंधोत्रीचा संघर्ष' यात दाखवले आहे.
अयोध्येला वादगस्त जागेपासून अगदी जवळच्या वर्कशॉपमध्ये राममंदिराचे सर्व भाग तयार करुन ठेवलेले आहेत, इफ्तार मेजवानीस बाजपेयींचे ""राममंदिर हे सोमनाथमंदिराप्रमाणे राष्ट्रीय भावनेचे प्रतीक आहे'' हे विधान आणि त्यावरील संसदीय वादळी चर्चा ही मंदिरबांधणी आधीची चाचपणी होती. एप्रिल 2001 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत डाव्या आघाडीचा पराभव, मेमध्ये राममंदिराची बांधणी, त्यावर देशभर अभूतपूर्व धार्मिक दंगली, सरहद्दी व देशाचे गंभीरतम प्रश्न पुढे करुन दुसरी आणीबाणी आणि "प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट' या मिसापेक्षा जालीम कायद्यान्वये दडपशाही! पण, तोफखान्याचा पहिला भडीमार राममंदिराच्या बांधणीने होणार असल्याने या वादाची वास्तविकता समजून घेऊन तो युध्द पातळीवर सोडवला पाहिजे.
स्त्रियात्तमा विरुध्द पुरुषोत्तम
महाभारत इतिहासाचे साधन तर रामायण कल्पित काव्य मानले गेल्याने आणि लोकमानसाने काय, जातिविरोधी डॉ. राम मनोहर लोहियानींही राम व कृष्ण यांना देशाचे श्रेष्ठतम महापुरुष मानल्याने महाकाव्यांच्या प्रमेयात्मकतेचा फायदा घेऊन भाजप व संघपरिवाराने अयोध्या, काशी मथुरेच्या मंदिराचे प्रश्न उचलेले. मात्र रामायणाबद्‌दल प्रमेयात्मकताही नसल्यामुळे त्यांनी कृष्णापेक्षा रामाला अग्रक्रम दिला. पण रामायणही इतिहासाचे विश्र्वसनीय साधन असल्याची संशोधनाअंती माझी खात्री झाली आहे. महाराष्ट्राचा खरा इतिहास नाशिकची पंचवटी ते त्र्यंबकेश्वरपर्यंत सीमा असलेल्या जनस्थान या स्त्रीराज्यापासून सुरु होतो. राजकुलात रावण ज्येष्ठतम असूनही त्याने स्त्रीराज्याच्या समय या तोंडी कायद्यानुसार धाकटी बहीण शूर्पणखा हिला राणीपदावर अभिषिक्त केले आणि आपल्या धाकटया सख्या भावासह त्याने लंकेकडे निर्गमन केले. मी डिसेंबरच्या मध्यात त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो आणि तेथली अभिषेक मंगल पुष्करिणी वा पुष्कर पाहून जनस्थानाची ती राजधानी असल्याची माझी खात्री झाली. काळाला न जुमानता टिकून राहणारे स्त्रीराज्याचे चिन्ह म्हणजे पुष्कर(अजमेरजवळचे पुष्कर क्षेत्र हे राणी उर्वशीची राजधानी होते, हे ॠग्वेद 7.33.11 वरुन स्पष्ट होते. वैदिक राजवंश तिच्यापासून सुरु होतो.) दशरथाने कैकेयीला राज्यशुल्क म्हणून दिलेले वर पाळण्यासाठी आर्य रामाने राजपद त्याग करुन वनवास पत्करला. या महतीत रावण या अनार्य मराठा महाबलीने "समया'नुसार वनवास पत्करला हे विसरलेे जाते. शूर्पणखा या नावाचा ब्राह्मणी अर्थ "सुपडयाएवढे नखे असलेेली अक्राळविक्राळ राक्षसी' असाच घेतला जातो. अथर्ववेदातील भातावरील मंत्रानुसार शूर्प म्हणजे खळयात भात उपनायचे सुपडे. शेतीचा शोध जगभर स्त्रीने लावल्यामुळे या नावाचा काव्यमय अर्थ आहे "सुपडे अलगद नखांवर धरुन भात उपनणारी!'
रामाने दंडकारण्यातील जनस्थानात प्रवेश करण्याआधी ब्राह्मण वसाहतकारांना राक्षसनिर्दालनाचे वचन दिले. निरपराध राक्षसांचा संहार न करायची सीतेने रामाला जी विनंती केली ती लेखाच्या प्रारंभी दिली आहे.( सीता ही विदेहांची पदच्यूत व बहिष्कृत राणी अहल्या भूमाता इची मुलगी होती. हे लक्षात घेतले जात नाही.पुरुषोत्तम रामाने ती धुडकावून उलट तिचा त्याग करायची धमकी दिली.
""अप्प्यहं जीवितंजह्यांत्वां वा, सीते, सलक्ष्मणाम्‌!
न तु प्रतिज्ञां संसृत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः!! 3.10.18!!
जनस्थानात प्रवेश केल्यानंतर रामाने युध्द शास्त्राच्या लॉजिस्टिवनुसार सरहद्दीवरचे पंचवटीचे स्थान निवडून संरक्षित झोपडी बांधली. होमरच्या ग्रीक महाकाव्यांनी स्त्रीराज्याच्या राण्या सुसंस्कृत व अतिथ्यशील दाखवल्या याचे कारण तो ब्राह्मण नव्हता हे आहे. शूर्पणखा त्यांचे कुशल विचारण्यासाठी ताटकेप्रमाणे एकटीच आली, यावरुन तिचाही मानस आक्रमक नव्हता, हे स्पष्ट होते. उलट रामाने कुरापत काढून लक्ष्मणाकरवी तिचे नाककान कापून तिला हाकलून दिले, यावरुन त्याचा आक्रमक हेतू स्पष्ट होतो.("जय श्रीराम'ची घोषणा देणाऱ्या शिवसेनेने त्याच नाशिक जिल्ह्यातील आभोण्याच्या ख्रिश्चन आदिवासी महिला मेळाव्यावर हल्ला केला, यावरुन त्यांनी रामाची स्त्रीविरोधी परंपरा चालविलेली आहे असे दिसते!) नंतर त्याने व सशस्त्र ॠषींनी गोदावरीतून चालून आलेल्या राक्षससैन्यांची कत्तल केली. ही स्त्रीराज्ये समताधिष्ठित होती म्हणून रामाने त्यांचा नाश चातुर्वर्ण्यहितार्थ केला. विश्वामित्राने ताटकेला ठार मारायचा जो आदेश दिला त्यावरुन निर्विवादपणे स्पष्ट होते
""न हि ते स्त्रीवधकृते ...... नरोत्तमा!
चातुवर्ण्याहितार्थ हि कर्तव्य राजसुनना''!! बालकाण्ड, शु. 17!!
रावणाने सीताहरण बहिणीच्या विद्रपीकरणाचा सूड म्हणून केले असे सांगणारे शरद जोशी हे एकमेव ब्राह्मण असावेते! पण, रामाविरुध्द रावणाला महात्मा ठरवणे ह नकारात्मक ब्राह्मणेतरी प्रबोधन ठरते. रामाचे राज्य शूद्रप्रथाधिष्ठित होते तर रावणाचे दासप्रथाधिष्ठित. विधायक अब्राह्मणी प्र्रबोधनाच्या समतावादी नायिका ताटका, शूर्पणखा व सीता होत्या, तर समतावादी नायक शूद्र शंबूक.
धर्मनिरपेक्षता ः ब्राह्मणी व अब्राह्मणी
भाजप संघपरिवाराने राममंदिराचा प्रश्न काढल्यानंतर डाव्या पक्षांची भूमिका पाकिस्तान व शिखिस्तानाबाबत घेतलेल्या भूमिकाप्रमाणे अल्पसंख्य धर्मानुनयाची राहिलेली आहे. मार्क्सवादी इतिहासतज्ज्ञांनी तर अयोध्या मध्ययुगापूर्वी अस्तित्वात नव्हती आणि बाबरच्या सेनाधिकाऱ्यांने मशीद बांधली तेथे राममंदीर नव्हते, असे सिध्द करायचा आटापिटा चालविला! बुध्दोत्तर काळात इसवीसनापूर्वी होऊन गेेलेल्या भास या आद्यनाटककारची "प्रतिमा' व "अभिषेक'ही नाटके रामावर आहेत. आणि त्यात अयोध्येचा वारंवार उल्लेख आहे, हा निर्विवाद पुरावाही दुर्लक्षिला गेला. रामाचे मुल्यमापन जरी अब्राह्मणी अन्वेषणपध्दतीने केलेले असले, तरी ती रामाने भारतीय समाजविकासाला केलेले योगदान दुर्लक्षीत नाही. स्त्रीसत्ताक व मातृवंशक त्रैवर्ण्य समाजापेक्षा जास्त उत्पादक असलेल्या चातुर्वर्ण्य समाजाचा रामाने केलेला प्रसार हे राजवाडयांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच क्रांतिकारी कार्य होते. त्यामुळे तो जनमानसात प्रभू या कोटीला गेला. त्याची दरवर्षी रामनवमी साजरी करणारा समाज त्याच्या जन्मभूमीत महामंदिर बांधणार नाही हे कसे शक्य आहे? आणि जे तुर्की जेते सोमनाथ मंदिर उद्‌ध्वस्त करतात ते राममंदिर पाडून तेथे मशीद बांधणार नाहीत हे प्रितप्रादन हास्यास्पद आहे. शिवाजी आग्य्राहून निसटून गेल्यानंतर औरंगजेबाने सूडापोटी काशीचे विश्वनाथ मंदिर व मुसलमानही विद्यार्जन करती असलेली शिक्षणसंस्था आणि मथुरेचे केशवमंदिर पाडून मशिदी बांधल्या असे खुद्द डॉ. सैयद अथर अब्बास रिझवी त्यांच्या प्रा. हबीबांनी प्रास्तावित केलेल्या "मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेन्ट्‌स इन नॉर्दर्न इंडिया इन सिक्स्टीन्थ अँन्ड सेव्हन्टीन्थ सेन्चरीज'(1965) या प्रमाणभूत गं्रथात नमूद करतात. तुर्की शासकांना हिंदू प्रजेवर राज्य करायचे होते, धर्म लादायचा नव्हता हे जरी खरे असले, तरी त्यांनी धार्मिक दुरभिमानाची कृत्ये केलीच नाहीत असे या सूत्रापोटी म्हणणेे अनैतिहासिक ठरते. आर्यापासूनचे सर्व जेेते कमीअधिक प्रमाणात हिंसक व विध्वंसक राहिलेले आहेत. जितांना पूज्य असलेल्या वास्तूंचा विध्वंस त्यांचे नैतिक धैर्य खचवण्यासाठी जेते करीत आलेले आहेत. शशांकासारख्या ब्राह्मणी राजांनी बौध्द भिक्षूंची कत्तल व बौध्द महावस्तूंचा नाश याच हेतूने केला.
बहुसंख्य धर्मियांच्या वाजवी भावना दुखावून अल्पसंख्यधर्मियांच्या गैरवाजवी भावनांनची तरफदारी करणे हा जो धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लावला जातो, त्यामुळे भाजप व संघपरिवाराचे फावते. म्हणून ही धर्मनिरपेक्षता ब्राह्मणीच म्हणावी लागते.
तुर्की शास्त्यांनी केलेल्या धार्मिक अत्याचारांना आजचे मुसलमान जबाबदार नसले, तरी या अत्याचाराचें वाजवी निराकरण करायची जबाबदारी आजचे मुसलमान नाकारु शकत नाहीत. शशांकाने 6 व्या शतकात बोधी वृक्ष तोडून बुध्दमंदिरातील बुध्दमुर्तीच्या जागी महेश्वरमूर्ती बसवून ते ब्राह्मण महंताच्या हवाली केले होते. ते बौध्दांच्या हवाली करायची नवबौध्दांची मागणी जर न्याय्य ठरु शकते, तर राममंदिरावरील अत्याचारांच्या निराकरणाची मागणी संघपरिवाराने केली म्हणून ती धर्मवेढी ठरु शकत नाही. बाबरी मशीर पाडायचे समर्थन पंतप्रधान बाजपेयीही करु शकत नाहीत. आणि काशी व मथुरेच्या मशिदी पाडून अनुक्रमे विश्वनाथ आणि केशव मंदिरांची पुनर्उभारणी करावी असे संघपरिवारही म्हणू शकत नाही, हे अवशिष्ट धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव दाखवते. पण न्याय दिला गेला पाहिजे एवढेच नाही, तर तो दिला गेल्याचे दिसले पाहिजे. या आधुनिक न्यायतत्वानुसार हिंदूंना न्याय दिला गेल्याचे दिसले पाहिजे. म्हणून सर्व संबंधित पक्षांनी व दोन्ही धर्माच्या नेत्यांनी एकत्र बसून एकमताचा निर्णय घेणे व तो सरकारकने अंमलात आणणे निकडची आहे. हा वाद धुमसत ठेवला तर धर्मनिरपेक्षतेचा अवशिष्ठ प्रभाव नष्ट होऊन हा वाद सोडवणे अशक्य हाेईल. औरंगाबादच्या नामांतराचे उदाहरण येथे उचित ठरेल. शिवसेनेने सुचविलेेलेे औरंगबादचे संभाजीनगर हे नामांतर मलिकंबराबाद असे करावे असे सुचवून त्यासाठी मोहिम करायची मागी केली तेव्हा मी "लोकमत'मध्ये लेख लिहून संभाजीचा औरंगादच्या उभारणीशी संबंध नसल्याने त्याचे नामांतर हिंदू-मुसलमानाच्या प्रबोधनाची व ऐक्याची होईल असे मांडले.
प्रा. रहमानींना "लोकमत'मध्येच दोन लेख लिहून औरंगझेब धार्मिक बाबतीत अकबरापेक्षाही कसा पुरोगामी होता हे दाखविण्यसाठी मुघल सैन्यात अकबराच्या काळापेक्षा औरंगझेबाच्या काळात हिंदूंची संख्या जास्त असल्याचे उदाहरण दिले. ते सप्रमाण खोडून काढणारा माझा लेख "लोकमत'न े प्रसिध्द केला नाही.हिंदूची मते जातील म्हणून औरंगाबादच्या संबंधित पक्षांनी नामांतराची मोहीम हाती घेतली नाही. हायकोर्टान े स्टे दिल्याने हा वाद तहकू ब झालेला असला, तरी तो पुन्हा उसळू शकतो, हे विसरता कामा नये, कारणे औरंगझेबाने महाराष्ट्राचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी संभाजीला अमानुषपणे मारले, ही वस्तुस्थिती या वादामागे आहे.
अपूर्ण

Sunday, October 3, 2010

devi nirrutee


  • विश्वरुपे निर्ॠते
  • "विश्वरुपे निॠते , तुला प्रणाम असो,
    हे लोहमय पाश मोकळे कर;
    यम व यमीसह तू
    या सर्वोच्च स्वर्गावर आरोहण कर.
    देवी निर्ॠते , तू ज्या पाशांनी
    न सोडण्यासाठी याचा गळा बांधलास,
    ते मी जणू काय आयुष्याच्या मध्याह्नीपासून मोकळे करीत आहे;
    मग बंधमुक्त होऊन जग व अन्नग्रहण कर.
    जिच्या क्रूर मुखात मी
    पाशविमोचनार्थ होम करतो,
    ज्या तुला "भूमि' म्हणून जन जाणतात,
    त्या तुला "निर्ॠते' म्हणून मी सर्वतोपरी ओळखतो.
    ना हवन ना यज्ञ करणाऱ्याला तू शोध,
    चोर व डाकूंच्या रस्त्याने तू जा;
    आम्हाला सोडून दुसऱ्याला तू शोध, तो तुझा रस्ता आहे,
    देवी निर्ॠते , तुला प्रणाम असो.
    देवी निर्ॠतेला वंदन करणारा मी,
    पिता जसा पुत्राला, तसा मी तिला माझ्या शब्दांनी थकवून सोडतो;
    विश्वातल्या सर्व जातमात्रांना ती जाणते,
    आणि डोक्याडोक्याला मात्र ही उद्‌गाती ओळखते.
    (गण-) धनाची निधान व संग्राहक,
    विश्वातली यच्ययावत्‌ (चराचर)रुपे जाणणारी सर्वज्ञ,
    सत्यधर्मा सविता देवाप्रमाणे,
    इंद्रासारखी, ती चौरस्त्यावर उभी राहाते''
    तैत्तिरीय संहिता 4.2.5

  • संदर्भः दास शुद्राची गुलामगिरी, भाग-1
    कॉ. शरद पाटील


Thursday, September 30, 2010

नवरात्रोत्सव कृषीमायेचा


भूमातेतून उदरातून हळूहळू उगवणा-या धान्याची पुजा ही भूमातची, देवीची पुजा म्हणून केली जाते. हा उत्सव  कृषिमायेचा उत्सव असल्याने कृषी आणि देवीशी संबंधित गाणे गाऊन तो साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी हे उगवलेले धान शेतात नेऊन टाकतात. यामुळे शेतीची भरभराट होते.





नवरात्र : कृषीमायेचा उत्सव

आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्याची एक आठवण या उत्सवामागील मूळ प्रेरणा आहे. त्यामुळे राज्यातच नाही तर देशातील कानाकोपºयात हा उत्सव केवळ स्त्रिया साजरा करत असतात. अलीकडे  या उत्सवाचे चित्रच बदलून गेले आहे. घट स्थापनेपेक्षा या उत्सवात अनेक नवे फॅड आल्यामुळे मूळ उत्सव आणि त्याचे गांभीर्य लोपत चालल्याचे दिसते. कृषीमायेची आराधना करणारी आणि तिचे स्तवन करणारी परंपरा घटस्थापनेच्या प्रतिकांमध्ये थोडीशी शिल्लक होती. ती सध्याच्या नवनवीन फॅडमुळे ती भविष्यात पूर्णपणे लोप पावण्याची भीती वाटते. 

देशात हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध परंपरा असल्या तरी सवार्चा मूळ उद्देश कृषीमायेचे गुणगाण करणे, तिचे स्तवन करुन शेतीच्या शोधाची आठवण करणे असाच आहे. आपल्या राज्यात याला घट स्थापना म्हणून ओळखतो. नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यात सर्वच जाती-जमातींच्या महिला या काळात नऊ दिवस आपापल्या घरातील देवळी किंवा माजघरात घट बसवितात. यात शेताच्या शेजारी असलेल्या वारुळाची, नदीच्या कडेची, अथवा शेताच्या बांध्यावरची माती आणून त्यात विविध प्रकारचे धान्य पेरले जाते. या धान्याशेजारी तांब्याच्या घट बसून रोज वेगवेगळी फुले, आणि विशेषत: कवड्यांची माळ व दिवा लावून त्याची पूजा केली जाते. परडी (तांदूळ, दाळ, पीठ, मिरची, कांदे, डाळ, तेल आदी ठेवलेली एक टोपली) आणि कवड्यांच्या माळेला त्यात खूप महत्व असते. 

घटाची सर्व पूजा स्त्रियांकडूनच केली जाते. गळ्यात कवड्यांची माळ आणि हातात परडी घेऊन प्रत्येक स्त्री किमान पाच घर तरी जोगवा मागतात. त्यानंतरच घरातील घटाची पुजा सुरू होते. पुरूष मंडळीचा त्यात काहीही सहभाग नसतो. भंडाºयााने कपाळ माखलेला आणि गळ्यात कवड्यांची माळ असलेला देवीचा भगत किंवा आराध्यांकडून रात्रीला गायन आणि नृत्याचे कार्यक्रम साजरे केले जातात. गुजरातमधील गरबा हा एक त्याचाच प्रकार आहे, परंतु अलीकडे त्याचे बाजारीकरण झाले आहे. मात्र, तरीही गुजरातमधील आदिवासी भागातील महिला अजूनही कृषीमायेचे ऋण गाणारे गीत गातात. 

पश्चिम महाराष्ट्रात दसºयाच्या दिवशी गावागावातील धनगर समाजातील लोक पालखी काढतात. त्यात देवीच्या स्तवन किंवा परसू बाळाचे नऊ खंडकरी, खंडोबा, विरोबा, मल्हारी, म्हसोबा आदींच्या लग्नांच्या, पराक्रमांच्या कथा सांगून भंडार उधळत बेभानपणे नाचले जात. 
या काळात आदिवासी आणि दलित स्त्रिया रात्रीला देवीच्याच पूजेचा एक भाग म्हणून चौपटाचा खेळ खेळतात. चौपटाच्या खेळात घरातील सर्वात ज्येष्ठ महिलांकडून या खेळाची सुरूवात करण्याची प्रथा आहे. आदिवासी भागात या काळात हा खेळ अजूनही खेळला जातो. चौपट हे स्त्रिसत्ताक राज्यांमध्ये  धान्याच्या समान वाटपाचे प्रतिक असते. 
भूमातेतून उदरातून हळूहळू उगवणाºया धान्याची पूजा ही भूमातची, देवीची पुजा म्हणून केली जाते. हा उत्सव कृषिमायेचा उत्सव असल्याने कृषी आणि देवीशी संबंधित गाणे गाऊन तो साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी हे उगवलेले धान शेतात नेऊन टाकतात. यामुळे शेतीची भरभराट होते. आणि पिक मोठया प्रमाणात येतात अशी धारणा आहे. काही जमाती शेतासोबतच ते नदीच्या पात्रातही सोडतात. नऊ दिवसानंतर ग्रामीण भागात अजूनही हे चित्र पहावयास मिळते. 


शेतीचा शोध स्त्रियांनी लावला

जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे भारतीयच नाही तर जगभरातील पुराणशास्त्रांमध्ये मान्य करतात. शेतीच्या शोधात पुरूषांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नव्हते. शरद् पाटील म्हणतात, ‘स्फ्य नावाच्या कठीण टोक असलेल्या काठीने जमिनीत पेरणी, निंदणी व कापणीची सर्व कामे करत. पुरूष मागासलेल्या हत्यांनी व आगीने जमिनीचा तुकडा साफ करत. भरघोस हंगामाचे फळ मिळविण्यासाठी वैदिक कृषि-मायेचा विधी म्हणून सीता-यज्ञ केले जात होते. ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षापर्यंत हे यज्ञ केवळ स्त्रिया करत होत्या. तो स्त्रियांचाच सण होता. वैदिक कृषिदेवता सीता इचे स्तवन केल्यानंतरच पेरणीला प्रारंभ केला पाहिजे असे आदशे कौटिल्य (२.४०) देत असल्याचे दाखले प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांनी दिले आहेत.

शरद् पाटील म्हणतात, 'शेतीचा मायाविधी असलेल्या तंत्रात कुलचा अर्थ स्त्री असा होतो. अथर्ववेदाची एक ऋचा सांगते की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता व उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषिमायेचा विधी करी. शक्ती वा मातृदेवतेचे भक्त असलेल्या शाक्तांना त्यांचे धर्मग्रंथ कुलवृक्ष व कुलयोगिनींची पुजा करायची आदेश देतात. अंथरुणातून उठल्याबरोबर शाक्तांनी पार पाडायचा अगदी पहिला विधी म्हणजे कुलवृक्षांना ‘ओम कुलवृक्षेभो नम:’ या मंत्राने वंदन करणे.'

 देशात आणि राज्यातही मातृदेवताची देवळे ही अवैदिक, तंत्राशी वारसा सांगणारी आहेत.  तुळजापूरची मूळ मातंगी आणि भवानी, माहुरची रेणुका, काळुआई, सप्तशृंगी, बारडची पोचीमाय, येरमाळ्यातील येडामाय, चंद्रपूरची महाकाली आदी सगळ्याच मातृदेवता या आकारहीन दगडाच्या आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कोणत्याही गावात त्यांची गावाची रक्षणकर्ती म्हणून अशा आकारहीन मरीआई, पोचिम्माची देवळे असतात. त्याशिवाय प्रत्येकांची एक कुलदेवीही अशाच आकारहीन दगडाने आणि शेंदूर माखलेली माजघरात किंवा घराच्या शेजारील देवळीत बसवलेल्या असतात.

आकारहीन दगडातील देवता



शरद् पाटील म्हणतात, 'निर्ऋती ही जल किंवा नदीदेवता होती. अप्सरेचे मराठी रूप आहे आसरा नदीतील विशिष्ट दगड वा खडकांना आसरा म्हणून ओळखले जाते. तेथे बाळांतीण बाया अजूनही तान्ह्या मुलांना घेऊन जातात आणि त्याला झोळीत घालून झोके द्यायची नक्कल करतात.' प्राचीन काळापासून मातृदेवतांकडे मुलांसाठी ओटी (झोळी) असते. यामुळे रेणुका, मातंगी, मांगम्मा (तिरुपती), धुरपता, महाकाली, आदी देवींची पूजा तिच्या ओटीत खण नारळ टाकल्याशिवाय केली जात नाही. चंद्रपूरच्या धुरपतामायपासून ते हरितीपर्यंतच्या मातृदेवतांच्या बाबतीत आपली मुले देवीच्या झोळीत टाकून त्यांचे रक्षण करण्याची मागणी महिला करताना दिसतात.


देवीचे पुजारी बारा बलुतेदार

आपल्या राज्यात अजूनही ब-याच ठिकाणी मातृदेवींची पूजा करण्याचा मान देवकरीण, पोतराज, आराधी, महायोगिनी, गुरव, मांगीण पुजारी यांनाच आहे. मातृदेवतांचा संबंध शैवांशी, शाक्तांशी आणि  तंत्राशी संबंधित असल्याने त्यांची पूजा यांच्याकडून केली जात होती. हे सर्व शिवाचे उपासक होते. कालांतराने अनेक देवींच्या अख्यायिका विकृत स्वरूपात करण्यात आल्यामुळे त्यांचे मूळ गांभीर्य खूप कमी अंशात शिल्लक आहे. शैवांशी संबंधित असलेल्या देवींकडून असूराची हत्या करण्याच्या कथा त्यातून निर्माण झालेली महिशासूरमर्दिनी आदी रूपे याचाच एक भाग आहेत.

त्यांनाच तो मान होता. महाराष्ट्रात सात मातांची सात देवळे आहेत. सर्वात मोठी बहीण सप्तशृंगीचे देऊळ नाशिक जिल्ह्यात आहे चैत्री पौर्णिमेला तिची भरणारी यात्रा सर्वात मोठी असते. सगळ्यात धाकटी बहिण एकविरा (एक वीर असलेली ) हिचे एक देऊळ धुळ्याला स्मशानभूमीशेजारी आणि दुसरे लोणावळा जवळ कार्ला लेणीच्या प्रवेशद्वारावरआहे.या दोन्हीची पुजा गुरव जातीचे भोपे करतात. ठाणे जिल्ह्यातील महालक्ष्मी या आदिवासी देवीचे वंशपरंपरा पुजारीपण खुद्द आदिवासी वारल्यांचेच कुटुंब करत आहे.
चंद्रपूरची धुरपता (महाकाली)चीही पूजा मांगीण जातीची देवकरीण आणि पोतराज करतो. तर तुळजाभवानीचा पुजारी कुणबी, मराठा आहे. शिवकाळार्पयत आपल्या राज्यात योगींनींचे आणि शाक्त पिठांचे केंद्र हे बहिष्कृत वस्त्यांतून चालत होते, याचे दाखले शरद् पाटील यांनी दिले आहेत. 


संजीव भागवत, 
मुंबई